झाडे नसती तर निबंध मराठी | Zade Nasti Tar Marathi Nibandh

झाडे नसती तर निबंध मराठी – Zade Nasti Tar Marathi Nibandh

काय ? काय ? म्हणालात, झाडे नसती तर… अहो वेडे आहात की काय, श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे । असे कवी कसे काय म्हणतील ? पृथ्वीवर परोपकार शिकविणारे गुरु तर झाडेच. स्वतः उन्हात उभे राहून इतरांना सावली देतात. स्वतः दगडांचा मार सहन करुन मुलांना चिंचा, आंबे, बोरे देतात. मग एवढा त्रास सहन करुन सर्व सजीवांना नवीन जीवन व मार्ग देणारे परोपकारीच नसते तर चांगुलपणा कोठून शिकणार हे स्वार्थी मानव ?

मानवाला घरासाठी व इतर कितीतरी गोष्टींसाठी लाकूड लागते. लहानपणी विटीदांडू ते अंतिम घटकेला चिता लाकडाचीच असते. अशा वेळी काय होईल ? आजारी व्यक्तींना फळांचा रस, फळे, औषधे कोठून मिळतील? आयुर्वेदिक महाविद्यालयांना तर कुलुपच लागेल. अहो, त्यांचा जन्मच होणार नाही.

शुद्ध आणि थंड हवा, थंड हवेची ठिकाणे या सगळ्यांचा अभाव जाणवेल. शुद्ध आणि स्वच्छ प्राणवायू देणारी झाडेच जर नसती तर सृष्टीही निश्चल, निर्जीव वाटेल. नाही हो, ही कल्पनाच सहन न होणारी आहे. आणि काय म्हणे झाडे नसती तर…

https://www.youtube.com/watch?v=r3rr4ZMdg7k
झाडे नसती तर निबंध मराठी – Zade Nasti Tar Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Comment