वसंतराव फुलसिंग नाईक (१ जुलै १९१३ – १८ ऑगस्ट १९७९) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १९६३ ते १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. आजपर्यंत ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच, पूर्ण पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येण्याचे श्रेय त्यांच्याकडे होते. वसंतराव नाईक हे हरितक्रांती आणि श्वेतक्रांतीचे प्रणेते आहेत.

वसंतराव फुलसिंग नाईक माहिती मराठी – Vasantrao Phulsing Naik Information in Marathi
- पूर्ण नाव : वसंतराव फुलसिंग नाईक
- जन्म : १ जुलै १९१३
- मृत्यू : १८ ऑगस्ट १९७९
- कार्यकाल : ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५)
वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी गहुली, ता. पुसद, जि. यवतमाळ येथे झाला.
वसंतराव फुलसिंग नाईक यांची राजकीय कारकीर्द
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. १२ वर्षे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते. त्यांना नेहमी असे वाटत असे की, शेती संपन्न राहिली तरच देश संपन्न राहील. शेती मोडली तर देश मोडेल, महाराष्ट्राला अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी करण्याचे त्यांचे स्वप्न होते.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शेतीच्या विकासासाठी अनेक योजना राबवून अन्नधान्याच्याबाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण बनवला. महाराष्ट्रातील तीन मोठ्या दुष्काळांशी सामना करून त्यांनी हरितक्रांती घडवून आणली, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला त्यांनी प्रोत्साहन दिले.
आरे कॉलनीचा विकास, पशुपालन व कुक्कुटपालन, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन तसेच आर्थिक मदत त्यांनी केली, नव्या शेती तंत्रास चालना मिळावी अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत केली. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना त्यांच्याच काळात सुरू झाली.
वसंतराव फुलसिंग नाईक यांचा मृत्यू
संतराव फुलसिंग नाईक यांचा मृत्यू यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९७९ मध्ये झाला.
पुढे वाचा:
- यशवंतराव चव्हाण यांची माहिती
- मारोतराव कन्नमवार माहिती
- पी. के. सावंत (महाराष्ट्राचे तिसरे व हंगामी मुख्यमंत्री)
- अहिल्याबाई होळकर यांची माहिती
- नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती
- संभाजी राजे राज्याभिषेक दिन माहिती
- भारतीय सेना दिवस माहिती मराठी
- स्वामी विवेकानंद माहिती मराठी
- राजमाता जिजाऊ माहिती मराठी
- लाल बहादूर शास्त्री माहिती मराठी
- शिवाजी महाराज मराठी माहिती
- शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले
- सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती
- सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी
- महात्मा गांधी मराठी माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी
- सावित्रीबाई फुले माहिती मराठी
- समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी
- संत नामदेव यांची माहिती
- संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी
- संत तुकाराम माहिती मराठी
- संत एकनाथ महाराजांची माहिती