तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी

तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी

लोक देवाला शोधण्यासाठी, त्याची मनोभावे प्रार्थना, उपासना करण्यासाठी तीर्थक्षेत्राला जातात; पण देव तीर्थस्थानात राहत नसून सज्जनांच्या हृदयात वसत असतो, हे लोकांना समजायला नको का?

समाजातील अनेक लोक पुण्याच्या लोभापायी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात. पण तेथे देव असतो का? ‘देव देवळात नाही, देव नाही देव्हाऱ्यात’ असे म्हटले जाते ते याच कारणाने. देवाचे अस्तित्व दगडाच्या मूर्तीत नसून ते अंत:करणात असते. सज्जनांच्या ठिकाणी असलेल्या सद्गुणांच्यात असते. म्हणून सज्जनांची पूजा करा. त्यांच्यातील सद्गुणांचा अंगीकार करा. त्यामुळे खऱ्या देवाची प्राप्ती होईल.

संतश्रेष्ठ गाडगेबाबांनी देव देवळात नसून माणसात आहे हे जगाला ओरडून सांगितले. माणसातला परमेश्वर लोकांना दिसत नाही. त्यांना दगडातला परमेश्वर दिसतो. दगडाधोंड्याची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करा. चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, रंजल्यागांजल्यांना जे आपुले म्हणतात, जे अनाथ, अपंगांना हृदयाशी धरतात त्यांना साधू मानून त्यांची पूजा करा. असा या उक्तीतून बोध सांगितला आहे.

तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी

पुढे वाचा:

Leave a Comment