दूरदर्शन निबंध मराठी – Television Essay in Marathi

आज जवळजवळ प्रत्येक घरातल्या दिवाणखान्यात टीव्ही असतोच. टीव्ही हे घरबसल्या मनोरंजनाचे साधन झाले आहे. त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या असतात. ह्या वाहिन्या वेगवेगळ्या वयोगटासाठी असतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आवडीची वाहिनी बघता येते.

बातम्या, लहान मुलांचे कार्यक्रम, चित्रपट, मनोरंजन, साहित्य, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांवर टीव्हीवर काही ना काही चालूच असते.

मला स्वतःला कार्टून पहायला फार आवडते. पूर्वी कार्टून पाहायला मिळावे म्हणून मी आईपाशी खूप हट्ट करीत असे. पण आईने मला समजावून सांगितले की जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. म्हणून टीव्ही कमी वेळ पाहावा.

माझ्या आईला टीव्हीवरील खानाखजाना, आम्ही सारे खवय्ये असे कार्यक्रम पाहायला आवडतात. त्यातले काही पदार्थ ती घरीसुद्धा बनवते.

एपिक, डिस्कव्हरी, हिस्टरी अशा वाहिन्या खूपच माहितीपूर्ण असतात. एपिक वाहिनीवरील रवींद्रनाथाच्या कहाण्या मी आईसोबत बघतो.

तर क्रिकेटचे, फुटबॉलचे आणि टेबलटेनिसचे सामने मी बाबांसोबत पाहातो. नॅशनल जॉग्रफिक वाहिनीमुळे मला जगाची पुष्कळ माहिती मिळते. मला बाबा त्यातली छान छान स्थळे पाहून फिरायला घेऊन जाणार आहेत. म्हणून मला टीव्ही फार आवडतो.

दूरदर्शन निबंध मराठी – Television Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply