नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी: आज आपण सर्वजण भारतमातेचे महान देशभक्त, करिष्माई प्रतिभेने संपन्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. नेताजींसारखे वीर महापुरुष शतकांतून एकदाच जन्माला येतात. त्यांच्याबद्दल जेवढे बोलले जाईल तेवढे कमीच होईल. त्यांच्यासारखा महान माणूस पुन्हा जन्माला आला नाही आणि यापुढेही होणार नाही. असे नेते शतकातून एकदाच पृथ्वीवर अवतरतात. धन्य ती आई, जिने एवढ्या महान पुत्राला जन्म दिला. आणि त्याहूनही धन्य हा आपला देश, जिथे आपण भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे अमर पुत्र निर्माण केले. आम्ही खाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर भाषण दिले आहे ते तुम्ही वाचून त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.

नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी – Subhash Chandra Bose Speech in Marathi
आदरणीय प्राध्यापक, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना सुप्रभात, आझाद हिंद सेनेचे प्रणेते – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त मला भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ ही घोषणा भारतीयांच्या मनात आजही घर केरुन आहे. या घोषणेच्या जोरावर ज्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली ते आपले लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस.
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे प्रॉटिस्टंट युरोपिन शाळेत झाले होते. ही शाळा खिश्चन मिशनऱ्यांच्या मार्फत चालविली जाई. तिथे खिश्चन व खिश्चनेतर विद्यार्थी यामध्ये भेदभाव केला जाई. हा भेदभाव सुभाषचंद्रांना आवडत नसे. ह्या शाळेत ७ वर्षे काढल्यावर ते दुसऱ्या शाळेत गेले आणि तेथूनच ते मॅट्रीक पास झाले. तेथून ते उच्च शिक्षणासाठी प्रेसिडन्सी कॉलेजात गेले. त्या कॉलेजात शिकत असताना एका इंग्रज प्राध्यापकाने ‘you black Indian’ असे एका भारतीय विद्यार्थ्याला म्हणून त्याचा अपमान केला होता.
ह्या घटनेला सुभाषबाबूंनी विरोध केला. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी हरताळ पाळला. त्या प्राध्यापकाने क्षमा तर मागितली नाही उलट या घटनेचा दोष सुभाषबाबूंना देऊन त्यांना कॉलेजातून काढून टाकले. १५ महिने ते त्यानंतर कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी फिरत होते. शेवटी कलकत्ता विद्यापीठाने परवानगी दिल्यावर स्कॉटिश चर्च कॉलेजमधून १९१९ साली. बी ए. झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी ICS होण्या करिता इग्लंडला पाठविले. तेथे ते ICS ही सर्वोच्च परिक्षा उत्तीर्ण झाले.
त्यानंतर मोठ्या पगाराची व अधिकार पदाची नोकरी करायची नाही हे त्यांनी ठरविले होते. त्यांनी ICS पदवी परत केली. कारण नेताजींचे म्हणणे असे होते की “इंग्रजांच्या राज्याशी निष्ठा ठेऊन प्रामाणिकपणे भारताची सेवा करणे शक्य नाही.” ते भारतात परत आले तेव्हा महात्मा गांधीजींचे सत्याग्रह आंदोलन सुरु होते. १९२१ साली असहकार आंदोलनाचे संचलन कसे करावयाचे यासाठी सुभाषबाबूंनी एक स्वयंसेवक दल तयार केले. सरकारने ते बेकायदेशीर ठरवून सुभाषबाबूंना तुरुंगात टाकले. १९२२ मध्ये त्यांनी स्वराज्यदलाची स्थापना केली.
त्या मार्फत केवळ चळवळच नव्हे तर ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाने मुखपत्र प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. सत्याग्रह व फॉरवर्ड ब्लॉकमधील लेखांमुळे त्यांची मंडाले तुरुंगात रवानगी करण्यात आली. तेथे त्यांची प्रकृती खालावली. १९३३ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता केली. १९४० साली कालकोठरी स्मारकासबंधीच्या आंदोलनात त्यांना अटक करण्यात आली. तेथे त्यांची तब्बेत खराब झाल्यामुळे तुरुंगाऐवजी त्यांना नजरबंदीमध्ये ठेवण्यात आले.
१५ जानेवारी १९४१ रोजी ६० पोलिसांच्या नजरबंदीतून सुभाषबाबू गायब झाले. झियाउद्दीन नाम धारण करुन ते अफगणिस्तान, तेथून बार्लिन येथे सटकले. तेथे हिटलरशी भेट घेऊन आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी परदेशातील भारतीयांची आणि युद्धबंदी सैनिकांची सेना तयार करण्याची योजना त्यांनी हिटलरला सांगितली. त्यातूनच ४ जुलै १९४३ मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. आझाद हिंद सेनेच्या ‘दिल्ली चलो’ व ‘जयहिंद’ या घोषणा लोकप्रिय झाल्या. ब्रिटीशांविरुद्धच्या युद्धात आझाद हिंद सेनेने चांगली बाजी भारली. रंगून कोहिमा, इम्फाळ त्यांनी जिंकून घेतले. पण दरम्यान दुसऱ्या महायुद्धात जपान व जर्मनी यांच्या झालेल्या पिछेहाटीमुळे त्यांना मिळणारी मदत बंद झाली. १८ ऑगस्ट रोजी रंगनहून टोकियोला जाताना त्यांच्या विमानाला आग लागून त्यांचा मृत्यू झाला.
पुढे वाचा:
- नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध
- नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी
- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
- लोकमान्य टिळक भाषण मराठी
- गुरुपौर्णिमा भाषण मराठी
- पर्यावरण वर भाषण मराठी
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
- संभाजी राजे राज्याभिषेक दिन माहिती
- भारतीय सेना दिवस माहिती मराठी
- स्वामी विवेकानंद माहिती मराठी
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- राजमाता जिजाऊ माहिती मराठी
- लाल बहादूर शास्त्री माहिती मराठी
- शिवाजी महाराज मराठी माहिती
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले
- सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी माहिती
- सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी
- महात्मा गांधी मराठी माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी
- सावित्रीबाई फुले माहिती मराठी
- समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी
- संत नामदेव यांची माहिती
- संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी
- संत तुकाराम माहिती मराठी
- संत एकनाथ महाराजांची माहिती
प्रश्न.१ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कधी साजरी केली जाते?
उत्तर – 23 जानेवारी
प्रश्न.२ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला?
उत्तर – 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसा येथे झाला.