पर्यावरण वर भाषण मराठी – Speech on Environment in Marathi

Speech on Environment in Marathi : विद्यार्थ्यांना शैक्षणिक भाषणे लिहिण्यात आणि भाषणे देण्यास मदत करण्यासाठी, आम्ही या लेखात पर्यावरण वर एक सुंदर भाषण प्रदान केले आहे.

आम्ही इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये Paryavaran Speech in Marathi लिहिले आहे.

पर्यावरण भाषण मराठी
पर्यावरण भाषण मराठी

पर्यावरण वर भाषण मराठी – Speech on Environment in Marathi

सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला पर्यावरण वर काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला पर्यावरण दिनानिमित्त भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.

पर्यावरण हा या शब्दाचा वरवरचा अर्थ आहे. वरचे आवरण किंवा वरचा पडदा. परंतु या शब्दाचा खरा अर्थ आहे “आपल्या सभोवती असणारे वातावरण !” अर्थात या वातावरणात असलेले सर्व पदार्थ “सर्व वायु, जल संपत्ती, डोंगर – दऱ्या, नद्या – नाले, समुद्र, वृक्ष – वेली, प्राणी या सर्वांचाच समावेश होतो. साऱ्यांमुळेच आपले जीवन अत्यंत सुसह्य आणि आनंदी बनते.

पर्यावरणाशिवाय मानवी – जीवन ही कल्पनाच अशक्य आहे. याच भावनेने परिपूर्ण होऊन आपल्या पूर्वजांनी, पर्यावरणाचे श्रेष्ठत्व जाणले व पंचमहाभूतांना पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश देवत्त्व बहाल केले होते. या देवत्वाला शरण जाऊन, तत्कालीन लोक, मोठ्या श्रद्धेने व भक्तिन भावाने, पंचमहाभुतांची पूजा करीत होते. म्हणूनच लोकांच्या मनांत, पंचमहाभूतांबद्दल अपार श्रद्धा आणि भक्तिभाव वसत होता. त्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे, त्यांचा हास न होऊ देणे, हेच ते आपले आद्य कर्तव्य मानीत असत.

अशा प्रकारच्या श्रद्धायुक्त आणि भक्तीमय पूज्य भावांतून निर्माण झालेली भावना म्हणजेच पर्यावरणाविषयीची आत्मीयता !! याच आत्मीयतेने, अनादिकालापासून ही ‘पवित्र भूमी’ म्हणजेच आपली परमप्रीय भारत माता “सुजलाम सुफलाम – मलयज शीतलाम” अशा अवर्णनीय अवस्थेला पोहचली होती. हो, पोहचली होती, इतकेच नव्हे तर तिच्या सौन्दर्यांची – औदर्यांची बरोबरी करणारा एकही देश, या जगाच्या पाठीवर नव्हता. हे मी अभिमानाने सांगत आहे.

पण – पण, मित्रांनो,आपल्या भूमातेचे हे गत कालीन वैभव आठवताच हे अभिमानाने माझा ऊर भरुन येतो. आणि दुसऱ्याच क्षणी आजची तिची अवस्था पाहून, आपले डोळे पाणावल्याशिवाय रहात माहीत. भूमाता तर जणं आक्रोश करीत म्हणत असते –

“गतकाळाच्या स्वर्णिम आठवांनी
कंठ माझा झालाय अवरुद्ध,
हासाच्या अमंगळ विषाने,
देहाचा कण न् कण झालाय विद्ध !!”

ह्या अवस्थेला माणूसच जबाबदार आहे. स्वार्थांध झालेल्या माणसाने स्वत:च्या सुखासाठी भूमातेचं सौन्दर्य, शान, ऐश्वर्य, सारंऽऽ सारं काही अक्षरश: .ओरबाडले आहे. नद्या – नाले – समुद्र यांच्या पर्यावरण पाण्यांत, रासायनिक द्रव्य – मिश्रीत पाणी, संरक्षण सोडून जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे. सिमेंट काँक्रीटच्या देखण्या व प्रचंड घरांच्या हव्यासापायी, मोठ मोठाले डोंगर – पर्वत उध्वस्त करण्याचा, त्याने जणुं चंगच बांधला आहे. मोठमोठ्या कारखान्यांचं दुषित पाणी नद्या – नाल्यांत – सुमेर चन्द समुद्रात मिसळल्याने, अवघ्या विश्वाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रचंड वृक्ष तोडीने जमीनीची प्रचंड प्रमाणात धूप झाली आहे. पाण्याची पातळी भू-पृष्ठाच्या खूप – खूप खोल – खोल गेली आहे. पर्जन्यमान बेभरवंशाचे आणि असंतुलित झाले आहे. अनेक वृक्ष व वन्य जीव – पशु – पक्षी अगदी नामशेष झाले आहेत. पहिलात माणसाच्या स्वार्थी वृत्तीचा परिणाम !

या भयंकर संकटाचा सामना आपण सर्वांनी वेळीच केला नाही तर ‘बैल गेला अन झोपी गेला !” अशीच आपली अवस्था होईल यात शंकाच नाही ! म्हणूनच प्रत्येकाने व्यक्तिश: सज्ज होऊन पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेतली पाहिजे. नद्या – नाले – ओढे, पर्वत – डोंगर – वृक्षराजी पशु – पक्षी यांचे जिवापाड रक्षण केले पाहिजे. त्यांचा हास हा अखिल मानव जातीचाच नव्हे तर अवघ्या विश्वाचा हास आहे, हे अटळ सत्य स्वीकारुन कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात त्याप्रमाणे

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ।।
या ओठांनी चुंबुन घेईन, हजारदां ही माती,
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे !”

असे श्रेष्ठ विचार जेव्हा प्रत्येकाच्या मनात निर्माण होतील, तेंव्हाच प्रत्येकाची मनोदेवेता पर्यावरणाच्या रक्षणासाठी सज्ज होईल आणि माणसाची दुष्ट – स्वार्थी प्रवृत्ती नष्ट होऊन, सगळ्या विश्वाला सुजलाम, सुफलाम् चे अक्षय वरदान मिळेल ! खरे ना ? आता मित्रांनों, या मंगल कामने बरोबरच या विषयाला पूर्णविराम देऊ या. जयहिंद ! जय पर्यावरण ! जय विश्वमाता !!

Speech on Environment in Marathi-Paryavaran Speech in Marathi
Speech on Environment in Marathi, Paryavaran Speech in Marathi

पुढे वाचा:

Leave a Comment