काळकर्ते शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती : शिवरामपंत हे प्रामुख्याने काळकर्ते म्हणून ओळखले जातात. काळ हे नाव त्यांना इंग्रजीतील टाइम्स ह्या वृत्तपत्रावरून सुचल्याचे दिसते. काळ ह्या शीर्षकातून ध्वन्यर्थाने निष्पन्न होणारे विविध प्रकारचे कार्य – उदा. काळ घडविणे, काळावर प्रभुत्व गाजवणे-शिवरामपंतांनी आपल्या साप्ताहिकातून करून दाखविले.

तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ‘काळ‘ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. शिवराम महादेव परांजपे हे जसे थोर देशभक्त तसेच एक विदग्ध पंडित आणि शैलीकार साहित्यिक होते.

शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती-Shivram Mahadev Paranjape in Marathi
शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती, Shivram Mahadev Paranjape in Marathi

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती – Shivram Mahadev Paranjape in Marathi

जन्म : 27 जून 1864

मृत्यू : 27 सप्टेंबर 1929

शिष्यवृत्ती : 1884 मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी होते .

शिवराम महादेव परांजपे साप्ताहिक

काळ : 1898 मध्ये उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केले. 25 मार्च 1898 रोजी याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

काळ साप्ताहिका संबधी इतर महत्वाची माहिती

 • 1898 मध्ये  काळ नावाचे साप्ताहिक परंजपे यांनी सुरू केल
 • 25 मार्च 1898 ला काळ चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
 • पुण्यातील जुन्या मंडईजवळच्या कानडेंच्या वाड्यातून शि.म.परांजपे यांच्या काळ साप्ताहिकाचा पहिला अंक बाहेर पडला.
 • तेथून बारा वर्षे काळने वृत्तपत्र आणि वाडंःमयाच्या जगतात एक अद्भभूत पराक्रम घडवून आणला.
 • टाइम्सच्या नावावरून त्यांनी आपल्या वर्तमानपत्राला काळ हे समर्पक नाव दिलं असावं.
 • प्रारंभी 600 वर्गणीदार असलेल्या काळचा खप 16 हजार वर्गणीदारांपर्यत गेला.
 • काळ हे साप्ताहिक  लोकमान्यांच्या जहाल विचारांचा पुरस्कार करणारं जरूर होतं,पण त्यात अनुकरण नव्हतं.

1908 मध्ये काळमधील काही मजकुरावर आक्षेप घेत सरकारनं त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. या खटल्यात त्यांना 19 महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. तथापि चार महिने अगोदरच म्हणजे 5 ऑक्टोबर 1909 मध्ये त्यांची सुटका झाली. 1910 मध्ये सरकार ने दहा हजार रूपयांचा जामिन मागितला. शिवराम महादेव परांजपे यांनी तो भरला असता तरी तो जप्त करून पुन्हा आणखी रक्कम मागायची हे सरकारनं ठरविलेलं असल्यानं परांजपे जामिन भरण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळं काळ साप्ताहिक त्यांना बंद करावं.

काळला जेमतेम बारा वर्षांचं आयुष्य लाभलं पण शि.म.परांजपे यांच्याशी काळचं नाव कायमचं जोडलं गेलं. काळकर्ते शि.म.परांजपे अशीच लोकमानसात त्याची ओळख रूढ झाली.

स्वराज्य साप्ताहिक

टिळकांच्या मृत्यूनंतर, 12 ऑगस्ट 1920 रोजी शिवरामपंतांनी स्वराज्य हे नवे साप्ताहिक काढले आणि त्यातून महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला. तथापि काळाची लोकप्रियता ह्या साप्ताहिकाला लाभली नाही. पुढे वृद्धापकाळामुळे हे साप्ताहिक 1927 साली त्यांनी शंकरराव देव ह्यांच्या स्वाधीन केले.

मुळशी सत्याग्रह

पत्रकारिता सांभाळून लोकहिताच्या चळवळींतही त्यांनी वेळोवेळी भाग घेतला. 1 मे 1922 रोजी मुळशी सत्याग्रहात ते सहभागी झाले आणि त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांचा कारावासही भोगला.

शिवराम महादेव परांजपे यांचे लेखन

टीकात्मक लेखन : नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक लेख प्रसिद्ध आहेत.

कादंबरी लेखन :

 • 1918 : गोविंदाची गोष्ट 
 • 1924 : विंध्याचल
 • 1928 : मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास (या पुस्तकात मराठ्यांच्या 1802 ते 1818 मधील चौदा लढायांचा इतिहास दिला आहे आणि मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा केली आहे.)

नाटक :

 • 1897 : संगीत कादंबरी (बाणाच्या कादंबरीवर आधारित)
 • 1898 : मानाजीराव (शेक्सपिअरच्या मॅक्‌बेथवरून रचलेले)
 • 1906 : रामदेवराव (ॲडिसनच्या केटोवर आधारित)
 • 1931 : पहिला पांडव (कर्णाच्या जीवनावरील स्वतंत्र पौराणिक नाटक)
 • प्रदीर्घ काव्य : अहल्याजार

कथालेखन :

 • ‘आम्रवृक्ष’,
 • ‘एक कारखाना’,
 • ‘प्रभाकरपंतांचे विचार’

भाषांतर :

अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्राचे त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले होते.

शिवराम महादेव परांजपे यांचे इतर लेखन

 • साहित्यसंग्रह : याचे एकूण 3 भाग, अनुक्रमे 1922, 1925 आणि 1946 मध्ये आले. यात त्यांचे संशोधनपर आणि रसग्रहणपर असे साहित्यविषयक लेख अंतर्भूत आहेत.
 • प्रणयिनीचा मनोभंग : हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते.

शिवराम महादेव परांजपे यांना मिळालेले सन्मान

रायगड प्रेस क्लबनं काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांच्या चित्राचं एक कॅलिंडर काढलं .त्याचं प्रकाशन 15 डिसेंबर 2013 रोजी नागपूर इथं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. कोकणात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारास काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो.

शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल इतर महत्वाची माहिती

 • ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला.
 • सायमन आयोगाला विरोध करण्यासाठी आणि ‘नेहरू रिपोर्टा’च्या प्रचारासाठीही ते पुढे आले.
 • 1929 मध्ये बेळगाव येथे झालेल्या ‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते.
 • 27 सप्टेंबर 1929 मध्ये मधुमेहाच्या विकाराने ते पुणे येथे निधन पावले.

शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती, Shivram Mahadev Paranjape in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply