शीर्षासन मराठी माहिती – Shirshasana in Marathi

शीर्षासन म्हणजे काय?

‘‘शीर्ष’’ म्हणजे डोके. या आसनात डोक्यावर उभे राहतात म्हणून यास शीर्षासन असे म्हणतात.

शीर्षासन मराठी माहिती, Shirshasana in Marathi
शीर्षासन मराठी माहिती, Shirshasana in Marathi

शीर्षासन करण्याची पद्धत

 1. चटईवर गुडघे मुडपून बसा.
 2. जमिनीवर दोन्ही हात असे ठेवा की, उजव्या हाताची बोटे डाव्या हाताच्या बोटावर येतील.
 3. यावर कपाळ टेकवा.
 4. गुडघे आणि दोन्ही पाय ताठ करा.
 5. दोन्ही डोक्याकडे आणा.
 6. कंबर, कोपर, दंड, डोके आणि मान यांवर तोल सांभाळून गुडघे वाकवा आणि त्याला वर उचलून डोक्यावर भार येऊ द्या.
 7. यानंतर दोन्ही पाय वर उचलून ताठ करा.
 8. पाय ताणून ठेवा.
 9. शीर्षासनाची ही अंतिम अवस्था आहे.
 10. श्वासोच्छवास नियमित करा.
 11. हात, कोपर, बाहू, डोके आणि मान यांवर शरीर तोलून धरा.
 12. शक्य तितके जास्त वेळ या स्थितीत आरामात थांबा.

शीर्षासनाचे आणखी काही प्रकार आहेत

 1. एक प्रकार असा की, हाताला पक्के जमिनीवर ठेवून डोक्यावर उभे राहा.
 2. चांगल्या सरावानंतर दोन्ही पाय तुम्ही बाजूला पसरू शकता किंवा त्यांना काटकोनात ठेवू शकता.
 3. पायाने पद्मासन घालू शकता.

शीर्षासनाचे वैशिष्ट्ये

 1. हे आसन करतेवेळी सुरुवातीस डोक्याचा पुढचा भाग तक्क्यावर किंवा घडी केलेल्या कपड्यावर ठेवू शकता.
 2. कपाळावरचा डोक्याचा भाग जमिनीवर टेकवा नसता इजा होण्याचा संभव असतो.
 3. सुरुवातीस हे आसन काही दिवस भिंतीला टेकून करणे चांगले.
 4. 4/5 दिवसांच्या सरावाने तुम्हाला भिंतीच्या आधाराची गरज भासणार नाही.
 5. अंडरवियर घट्ट असू नये. तिच्या नाड्या घट्ट बांधू नका.
 6. शीर्षासनाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, जर डोक्याच्या मध्यभागावर हे केले तर त्यापासून चांगला फायदा होतो.

शीर्षासन करताना घ्यायची काळजी किंवा सावधगिरी

1) मधुमेह, डोळे आणि कानातील विकार आणि रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी शीर्षासन करू नये.

2) कित्येक लोक 2/3 तास हे आसन करतात. हे योग्य नाही. फार वेळ हे आसन केल्याने त्याचा विपरीत परिणाम डोक्यावर होतो. डोळे दुखतात. दृष्टिदोष निर्माण होतो. डोळ्यात मोतीबिंदू येऊ शकतो. कानात दोष निर्माण होऊन बहिरेपणा येऊ शकतो. मेंदूत विकृती निर्माण होऊ शकते. डोकेदुखी सुरू होऊ शकते. सुरुवातीस 2/4 सेकंद आणि सरावाने 15/20 मिनिटे आसन करणे योग्य.

शीर्षासन चे फायदे मराठी

 1. शीर्षासनाला आसनाचा राजा म्हणतात. ब्रह्मचर्यसंवर्धन व ध्यानाकरिता हे आसन योग्य आहे.
 2. सततच्या सरावाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
 3. केस गळणे किंवा पिकणे यावर उपयुक्त.
 4. दृष्टिदोष, स्वप्नावस्था, मधुमेह, गर्भाशयातील विकार वगैरे दोष निवारण्याकरिता हे उपयुक्त आसन आहे.
 5. अर्धांगवायू आणि मूळव्याध यांवर गुणकारी आहे.
 6. 10/15 मिनिटे हे आसन नियमित केल्याने प्रकृती उत्तम राहते.

शीर्षासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply