सर्वांगासन मराठी माहिती – Sarvangasana Information in Marathi
सर्वांगासन म्हणजे काय?
‘‘सर्वांग’’ म्हणजे ‘‘शरीराचे सर्व अवयव.’’ या आसनामुळे शरीराच्या संपूर्ण अवयवांना व्यायाम होतो म्हणून या आसनास सर्वांगासन म्हणतात.

सर्वांगासन करण्याची पद्धत
- जमिनीवर पाठ टेकवून चटईवर पडा.
- हात आणि पाय सरळ ठेवा.
- दीर्घ श्वास घ्या.
- हाताचे पंजे जमिनीवर दाबून ठेवा.
- हात आणि पाय ताणून पाय उत्तानपादासनाप्रमाणे जमिनीपासून वर उचलून तसेच धरा.
- पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने ठेवा.
- श्वास सोडा आणि पाय डोक्याकडे असे आणा की, पुठ्ठे आणि कमरेचा भाग थोडा वर उचललेला असेल.
- दोन्ही हातांनी पाठीला आधार द्या.
- कोपर जमिनीवर टेकवा.
- बाहू शरीराजवळ असू द्या.
- डोके, मान, खांदे आणि पाठ जमिनीवर टेकवा.
- शरीर, पुठ्ठे आणि पाय ताणून धरा.
- पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने ठेवा.
- हनुवटी छातीवर टेकवा.
- या आसनाची ही अंतिम अवस्था.
- श्वासोच्छवास सामान्य ठेवून त्याच स्थितीत आरामात थांबा.
- पूर्वस्थितीत येतेवेळी तंगड्या किंचित पुढे वाकवा.
- हात सोडून जमिनीवर येऊ द्या.
- पाठ, कंबर आणि शेवटी तंगड्या जमिनीवर आणा.
- शवासन करून विश्रांती घ्या.
सर्वांगासनची वैशिष्ट्य
सर्वांगासन हे एक महत्त्वाचे आसन आहे. कोणत्याही वयातील स्त्री-पुरुषाने या आसनाचा सराव करावा. गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये. वेळ हळूहळू वाढवून हे आसन दहा मिनिटे करता येईल. शेवटच्या अवस्थेत श्वासोच्छवास सामान्य ठेवा.
सर्वांगासनचे फायदे मराठी
- सर्वांगासनाच्या सरावाने मेंदू, फुफ्फुस आणि हृदय सशक्त होण्यास मदत होऊ शकते.
- रक्त शुद्ध होण्यास हे आसन उपयुक्त आहे.
- डोळे, कान आणि मानेतील वेदना कमी होऊ शकतात.
- या आसनामुळे भूक चांगली लागते.
- पचनक्रिया वाढते आणि पोटातील अशुद्ध वायू शरीराबाहेर पडतो.
सर्वांगासन विडिओ मराठी
अजून वाचा:
- भुजंगासन मराठी माहिती
- शलभासन मराठी माहिती
- मयूरासन मराठी माहिती
- धनुरासन माहिती मराठी
- अर्धमच्छेंद्रासन मराठी माहिती
- मत्स्यासन मराठी माहिती
- योग मुद्रा (योगमुद्रासन) मराठी माहिती
- पद्मासन माहिती मराठी
- ध्यान कसे करावे
- योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
- योगाचे फायदे
- सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे?
- लैंगिक आजाराची सुरुवातीची लक्षणे