Sant Chokhamela Information in Marathi: साधारण तेराव्या शतकात महाराष्ट्रात जी संत चळवळ उदयाला आली, त्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संतकवी चोखा मेळा होते. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मंगळवेढा या लहानशा गावी एक गरीब महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जन्माने शुद्र असले तरी शुद्ध कर्म, निर्मळ विचार, रसाळ वाणी, संवेदनक्षम मन व नितांत विठ्ठलभक्ती यामुळे ते संतपदापर्यंत पोहोचले. संत म्हणजे ज्याचे आचार, विचार, कर्म शुद्ध असतात तो.

संत चोखामेळा माहिती मराठी-Sant Chokhamela Information in Marathi
Sant Chokhamela Information in Marathi

संत चोखामेळा माहिती मराठी – Sant Chokhamela Information in Marathi

मूळ नावसंत चोखामेळा महार
जन्मनोंद नाही
मृत्यूई.स. 1338 मंगळवेढा
गावविदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मंगळवेढा
पत्नीसोयराबाई
बहिणनिर्मळा
मुलेकर्ममेळा

चोखोबांच्या वाट्याला आलेली हीनता, आजूबाजूची परिस्थिती, भौतिक व्यवहार, समाजात बोकाळलेली उच्चनीचता यामुळे त्यांच्या मनात आक्रंदन चालले होते. या आक्रंदनातूनच त्यांचे अभंग जन्माला आले. त्यांनी लिहिलेले ३५० अभंग वाचले की त्यांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडत जातो. विश्वात्मकाचा साक्षात्कार प्रकट करणारी त्यांची वाणी होती. चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. पोटासाठी त्यांना मोलमजुरी करावी लागे.

खालच्या कुळात जन्माला आल्यामुळे मिळेल ते उष्टं खरकटं खाऊन जीवन जगावं लागत असे. त्यांच्या जातीच्या बांधवांना मिळणारी हीनदीन वागणूक पाहून ते विठ्ठलाशी मूक संवाद करू लागले, “ हे विठ्ठला, सर्व तुझीच मुले आहेत ना? मग आमच्याच वाट्याला हे भोग का?” त्यांच्या मनातल्या वणव्यातून प्रकट झालेला हा अभंग पाहा –

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ।
बहु भुकेला झालो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो ।
बहु केली आस । तुमच्या दासांचा मी दास ।
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ।।

संत चोखोबाविषयी संत बंका यांनी केलेलं वर्णन किती परिपूर्ण आहे पहा…

चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ
चोखा प्रेमाचा सागर । चोखा भक्तीचा आगर
चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली

वरील अभंगातून चोखोबाच्या आंतरिक गुणांचा ठेवा प्रत्ययाला येतो. चोखोबा मनाने निर्मळ होते, त्यामुळे त्यांच्या अंगी जराही मळ नव्हता. अंतर्बाह्य निर्मळ असलेला हा संत प्रेमाची माउली आणि कृपेची सावली झाला. चोखोबाला प्रेमाचा सागर आणि भक्तीचे आगर असे संबोधण्यात आलं आहे. एवढंच नाही तर संत नामदेव चोखोबाविषयी म्हणतात –

चोखा माझा जीव । चोखा माझा भाव ।
कुलधर्म देव चोखा माझा ।।
काय त्याची शक्ती ।
मोही आले व्यक्ती तयासाठी ।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान ।
तया कधी विघ्न पडो नही ।

हा अभंग आजही जनसमाजात सुपरिचित आहे. वरील अभंगातून चोखोबा किती श्रेष्ठ होते हे आपल्या लक्षात येते. दैवी गुणांनी परिपूर्ण असलेल्या चोखोबाचे फक्त ध्यान केल्याने इतरांची संकटं दूर होतील असं नामदेव म्हणतात.

त्यांचा रात्रंदिवस विठ्ठलाबरोबर चाललेला मूक संवाद त्यांच्या अभंगातून ठायी ठायी आपल्या प्रत्ययाला येतो. ते म्हणतात, “ मी एक महार आहे हे मला मान्य आहे, तरीही मी तुझा भक्त आहे. माझं तनमन मी तुला अर्पण केलं आहे, तेव्हा मी तुझाच झालो आहे. तुझं खरकटं खायलाही मी तयार आहे; पण ही हीनत्वाची वागणूक मला आता सहन होत नाही. अरे विठ्ठला, तुला माझी जराही दया येत नाही का? माझा काय दोष आहे ते तरी सांग?

धाव घेई विठू आता । चालू नको मंद मंद
बडवे मज मारिती । ऐसे काहीतरी अपराध ? ।।

अनेक प्रश्न मनात निर्माण झाले की चाखोबा व्यथित होतात. मनाच्या खोल काळजाच्या गाभ्यापासून मारलेली हाक विठ्ठलाच्या काळजाला भिडल्यावाचून कशी राहील?

चाखोबांना भोगावं लागलेलं दुःख, वेदना, मानसिक छळ, अस्पृश्य म्हणून त्यांची केलेली उपेक्षा त्यांच्या अभंगांतून पदोपदी दिसून येते. भक्तिमार्गाचा संदेश त्यांनी त्यांच्या दलित बांधवांना दिला. “भक्तिमार्गाचा अवलंब करा. भक्तिरस प्राशन करा. आषाढी कार्तिकीला चंद्रभागेच्या तीरावर जो संताचा मेळा भरतो, त्यामध्ये सामील व्हा. चंद्रभागेत आंघोळ करून भक्तीची पताका हातात घ्या. विठ्ठलनामस्मरणाने स्वतःला शुद्ध करा.” अशी ते दवंडी पिटवतात.

समाजामध्ये असलेली वर्णव्यवस्था, परंपरेने लादलेल्या वाईट चालीरीती, त्यामुळे तळागाळातील समाजाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, ते कोणाला सांगणार आणि त्यांचं ऐकणार तरी कोण?

चोखोबांच्या अभंगांतून आतल्या आत चाललेली घुसमट, पदोपदी दिसून येते. प्रापचिक दैन्य, दारिद्र्य तर आपल्या पाचवीलाच पूजले आहे. या सर्वांतून हा जीव मूक्त करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती. हे ते जाणत होते. चोखोबा रात्रंदिवस आत्मशोध घेऊ लागले. त्या शोधातून अभंग जन्माला आले. त्यांचे सुप्रसिद्ध अभंग अनेक आहेत त्यापैकीच एक….

ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ।
चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।।

या अभंगातून ते सांगण्याचा प्रयत्न करतात की, “मी जरी जातीने शूद्र असलो तरी माझ्या ठिकाणी असलेली भक्ती पवित्र आहे. ऊस वाकडा जरी असला तरी त्याच्यामध्ये जो रस असतो, तो गोडच असतो. तशी माझी भक्ती आहे. कोणत्या जातीत जन्माला यावे हे आपल्या हातात नाही; परंतु चांगले कर्म करून मन पवित्र करणे हे तर आपल्या हातात आहे.

साधी सरळ शब्दरचना, मधुर वाणी, पवित्र मन आणि नितांत भक्ती यामुळे चोखोबांचे अभंग पाहता पाहता समाजात रुजले. खालील अभंगात किती खरेपणा आहे पहा –

आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण ।
वेदांचे वचन, कळे न आम्हां ।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाव तुझे ।।

आम्हाला वेद पुराणाचे अर्थ समजत नाहीत, कारण आम्ही पंडित नाही; परंतु हे केशवा, माझा भोळा भाव तू जाणतो आहेस. किती सहजता त्यांच्या अभंगातून आपल्या प्रत्ययाला येते. ते स्वतःला विठ्ठलाचा बलुतेदार समजतात. ते त्वेषाने म्हणतात…

जन्माला विटाळ, मरता विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंती ।
आदिअंती अवघा विटाळ सायला ।
सोहळा तो झाला कोणा न कळे ।।
चोखा म्हणे मज नवल वाटते !
विटाळापरते आहे कोणा ।।

वरील रचनेतून मायबाप विठ्ठलाला ते म्हणतात, “हे विठ्ठला, माझ्या देवा, मला सांगा आमचा हा विटाळ कधी संपेल?” म्हणजे याचा अर्थ आहे की, समाजातील जातिव्यवस्था कधी बदलेल? या समाजात जन्माला आलो तेव्हापासून मी अस्पृश्य ठरलो व मरतानाही हा विटाळ घेऊनच मरणार का?” आत्मउद्धार करण्याचा मार्ग आपल्यासाठी फक्त भक्तिमार्गच आहे ते त्यांनी पदोपदी त्यांच्या उपेक्षित बांधवांना सांगितले. भक्तिमार्गाचा संदेश सोप्या साध्या शब्दांत सर्वांना समजेल, उमजेल अशा रसाळ शब्दांत त्यांनी इतरांना समजावून सांगितला, त्यामुळे वैचारिक बदल घडवून आणण्याचे खूप मोठे काम चोखोबांनी केले.

हरिकिर्तनाचे दाटी। तेथे चोखा घाली मिठी ।। असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं. जिथे सत्संग असतो, परमेश्वराचे नामस्मरण होते, तेथे चोखोबाचे अस्तित्व जाणवते.

आम्ही दिलेल्या Sant Chokhamela Information in Marathi माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मित्रानो तुमच्याकडे जर संत चोखामेळा यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर Sant Chokhamela Information in Marathi in Short या Article मध्ये Upadate करू, मित्रांनो हि Information About Sant Chokhamela in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर Sant Chokhamela Full Information in Marathi असा देखील करू शकता.

पुढे वाचा:

Leave a Reply