साखरेचा पाक कसा बनवायचा? | Sakhrecha Pak Recipe in Marathi

साखरेचा पाक कसा बनवायचा? – Sakhrecha Pak Recipe in Marathi

साखरेचा पाक कसा बनवायचा-Sakhrecha Pak Recipe in Marathi
साखरेचा पाक कसा बनवायचा, Sakhrecha Pak Recipe in Marathi

पाकाला शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यापेक्षा कल्हईचे भांडे घ्यावे.

साखरेचा कच्चा पाक

चार वाट्या साखरेला दोन वाट्या पाणी घेऊन, त्यात साखर घालून, विस्तवावर ठेवावे. साखर विरघळून उकळी आल्यावर ताटात थेंब टाकून पाहावा. तो थेंब बोटाला चिकटता उपयोगी नाही, इतपत पाक झाला, म्हणजे तो कच्चा पाक झाला.

साखरेचा एकतारी पाक

वरील पाक तसाच पुढे उकळत ठेवावा. ताटात थेंब टाकून तो दोन बोटांमध्ये धरावा व बोटे अलग केल्यावर बारीक तार आल्यास तो एक-तारी पाक झाला, असे समजावे.

साखरेचा दोनतारी पाक

वरील पाक तसाच पुढे शिजत ठेवावा. ताटात थेंब टाकून तो दोन बोटांमध्ये धरल्यास तो बोटाला जास्त चिकट लागला व बोटे अलग केल्यास दोन-तीन तारा आल्या, तर दोनतारी पाक झाला, असे समजावे.

साखरेचा पक्का पाक

वरील पाक तसाच पुढे शिजत ठेवावा. बुडबुडे येऊ लागल्यावर ताटात थेंब टाकून पाहावा. त्याची टणक गोळी बनली, म्हणजे पक्का पाक तयार झाला, असे समजावे.

साखरेचा पाक

पुढे वाचा:

Leave a Comment