प्रजासत्ताक दिन निबंध : २०२२ हे वर्ष भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल. भारत दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला तो दिवस म्हणजे २६ जानेवारी. दुसर्या शब्दांत, २६ जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली.
२६ जानेवारी १९५० रोजी स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास ३ वर्षांनी आपण एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक बनलो. आज आपण लहान-मोठे प्रजासत्ताक दिन निबंध मराठी खाली दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता आणि आपल्या शाळा-कॉलेज मध्ये Republic Day Essay in Marathi लेखन करू शकता. किंवा त्याचा वापर प्रजासत्ताक दिन भाषण म्हणून पण करू शकता.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध मराठी – Republic Day Essay in Marathi
Table of Contents
प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 130 शब्द – Republic Day Essay in Marathi 130 Words
आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय नेत्यांनी, क्रांतीवीरांनी अनेक लढे देऊन आपल्या प्राणांची बाजी लावून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केले. तरीही २६ जानेवारी १९५० रोजी आपण सार्वभौम झालो. म्हणून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो.
२६ जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. सैनिकांचे संचलन, कवायती आणि संपूर्ण भारताचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही देतात.
शहरातील सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. नेत्यांची भाषणे होतात. वंदेमातरम, राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतेही गाईली जातात. लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीटे देतात. त्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.
सगळीकडे रोषणाई, सजावट, रांगोळी काढून परिसर झगमगू लागतो.
भारतात सगळीकडे हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 150 शब्द – Republic Day Essay in Marathi 150 Words
१५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरील सत्ता संपली. त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरले. त्या लोकशाहीचे सर्व नियम ज्यात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट घेऊन केले. अशा रीतीने २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला.
लोकशाही ह्याचा अर्थ लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले सरकार. लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात, प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो.
दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी आम्ही मुले शाळेत जातो आणि ध्वजवंदन करतो. आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
आम्ही मुले एका स्वतंत्र, लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलू.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 200 शब्द – Republic Day Essay in Marathi 200 Words
प्रजासत्ताक दिन एक महान राष्ट्रीय सण आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांची गुलामी आणि अत्याचारापासून मुक्तता मिळाली. २६ जानेवारी १९५० ला देशात संविधानाची अमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसादने आपल्या पदाची शपथ घेतली. म्हणून या दिवशी देशात सणासारखे वातावरण असते. राज्याच्या सर्व राजधान्याच्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. परंतु मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीत होतो.
२६ जानेवारीला विजय चौकाजवळ इंडिया गेटच्या अलिकडे एका भव्य परेडचे आयोजन केल्या जाते. लाखो नागरीक हे पहायला जमा होतात. लाखो नागरीक हाच कार्यक्रम दूरदर्शनवरून पहातात किंवा रेडिओवरून रनिंग कॉमेंट्री ऐकतात. राष्ट्रपती या ठिकाणी राजेशाही थाटात दाखल होतात. त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते.
त्यानंतर तिन्ही सेनेचे जवान, बँड, एन.सी.सी.कॅडेट, पोलिस, शाळेतील मूलं आदींची भव्य मिरवणूक निघते. ती मिरवणूक पहाण्यासाठी असते. रंगीत तालीम, लोकनृत्य आणि इतर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात वेळ जातो. देशाच्या संरक्षणासाठीचे हत्यारे जसे की रडार, तोफा, मिसाइले, लढावू विमान, टँक आदीचे प्रभावी प्रदर्शन यावेळी केले जाते. यामुळे देशाची प्रगती, अखंडता, एकता, शक्ती आणि प्रभाव जगासमोर येतो. यामुळे देशबांधवाना जी प्रेरणा, उत्साह आणि गौरवभावना मिळते ती अद्वितीय असते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधीत करतात. संदेश देतात, हे एक अंत्यत महत्त्वाचे प्रसारण असते.
प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 250 शब्द – Republic Day Essay in Marathi 250 Words
आपला भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झालेला असला तरी २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी तो लोकशाही राष्ट्र म्हणून ह्या जगात उदयास आला. भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम थोर विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
ह्या दिवशी सकाळी पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहातात. त्यानंतर सकाळी सात वाजता राष्ट्रपती विजयचौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि तिन्ही भारतीय सैन्यदलांचे प्रमुख त्यांचे स्वागत करतात. बँडवर राष्ट्रगीताचे वादन होते. मोठी कवायत केली जाते. त्यावेळेस रणगाडे, तोफा, रॉकेट्स आदी युद्धसामुग्रीचे भव्य प्रदर्शन केले जाते. आपला भारत विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृतीचे प्रदर्शन करणा-या रथयात्रांची भव्य मिरवणूक ह्या प्रसंगी आयोजित केली जाते. शाळेतील मुले त-हेत-हेची नृत्ये, व्यायाम आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. शौर्य गाजवणा-या मुलामुलींचा ह्या वेळेस गौरव केला जातो. तसेच ह्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कारही दिले जातात.
देशात लोकशाही असणे हा नागरिकांना मिळालेला खूप मोठा हक्क आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ते बलिदान आपण व्यर्थ जाऊ देता कामा नये. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले सरकार असते. आम्हाला आमचा देश प्रगतीपथावर न्यायचा आहे. सर्व भारतीयांची प्रगती करायची आहे. प्रजासत्ताक दिन हे त्याचेच प्रतिक आहे.
ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. सरकारी आस्थापनांमध्ये आणि शाळांमध्ये ध्वजवंदन होते. आमच्या शाळेतही दर वर्षी २६ जानेवारीला ध्वजवंदनाचा सोहळा होतो. त्या दिवशी कुणातरी आदरणीय व्यक्तिमत्वाला आमच्या शाळेत पाहुणे म्हणून बोलावले जाते. त्यांच्या हस्ते शाळेत घेतलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारही दिले जातात. मला नेहमी निबंधात बक्षिस मिळते म्हणून मी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहातो.
प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 300 शब्द – Republic Day Essay in Marathi 300 Words
भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.
या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी त हेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.
सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.
प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.
प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 400 शब्द – Republic Day Essay in Marathi 400 Words
भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण उत्सव साजरे केले जातात. पण पर्व असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. दिन, प्रजासत्ताक दिन हे असे पर्व आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला इंग्रज सरकारचे प्रतिनिधी म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.
२५ जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राच्या नावे एक संदेश देतात, जो सर्व प्रसार माध्यमे, रेडिओ, दूरदर्शनवरून प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून प्रसारित होतो. सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतीचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्हा सेनेच्या तुकडज्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. ज्यावरून भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अंदाज लावता येतो. शालेय विद्यार्थी तहेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते, प्रत्येक राज्य आपापले नृत्यप्रकार सलामी मंचावर सादर करते.
हे सर्व कार्यक्रम पाहून स्वर्ग धरतीवर अवतरल्याचा भास होतो. शौर्य गाजविणाऱ्या बालकांची स्वारी हत्तीवर येते. प्रेक्षक हात हलवून त्यांचे कौतुक करतात, प्रेक्षक सकाळी ९ वाजल्यापासूनच हे सर्व पाहण्यासाठी येऊ लागतात. ७ वाजेपर्यंत खूप गर्दी जमा होते. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर जाऊन परेड चे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात. तर काही विमाने आकाशत इंद्रधनुष्य बनून उडून जातात.
सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात. आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.
प्रजासत्ताकदिन अवर्णनीय असतोच. रात्री पण सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात.
या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत एक दिवस आधी सांस्कृतिक कार्यक्रम,खेळांच्या स्पर्धा होतात. प्रवाशांना मिठाई वाटतात.
आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपल्याला काय हवे! आपल्या योजना यशस्वी होऊन उद्दिष्टांपर्यंत पोहोचत असताना आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.
प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 500 शब्द – Republic Day Essay in Marathi 500 Words
स्वातंत्र्यादिन आणि प्रजासत्ताकदिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ आहेत. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला तर प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो. संपूर्ण राष्ट्र मोठ्या उत्साहाने हे दिवस साजरे करते. आपल्या इतिहासाची आणि हौतात्म्य स्वीकारलेल्या वीरांची आठवण देश करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यादिवशी नवे संकल्प केले जातात.
२६ जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि घटना लागू करण्यात आली. प्रजासत्ताकदिनाची कहाणी मोठी आहे. याचा इतिहास १९२९ साली झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून सुरू होतो. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी रात्री बारा वाजता रावी नदीच्या किनाऱ्यावर नेहरूंनी स्वावंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशून संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. हा दिवस २६ जानेवारी होता. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी एका स्वरात भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनला. त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करीत राहिली. ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाली, देशप्रेम आणि देशभक्तीने झंझावाताचे रूप घेतले. १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीचा श्रीगणेशा करण्यात आला. शेवटी इंग्रजांना इथून जावेच लागले व देश स्वतंत्र झाला.
देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० ला पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक घटक राज्य बनले. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्याने लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. संपूर्ण भारतात प्रसन्नता व संपूर्ण स्वातंत्र्याची एक लाट आली. लोकांनी २६ जानेवारीला त्याचे समारंभ साजरे केले. २६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती रेडिओ व दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात. तो हिंदी व इंग्रजीत असतो. या प्रसंगी वृत्तपत्रे, मासिकांचे विशेष अंक प्रकाशित होतात. ठिकठिकाणी ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम सादर केले जातात. संपूर्ण राष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते. २६ जानेवारीला सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राजपथावर शानदार कार्यक्रमाला प्रारंभ होतो.
राष्ट्रपती जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख करतात. ध्वजारोहण होते आणि नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. राष्ट्रपती त्यांची सलामी घेतात. बँडवर राष्ट्रीय धून वाजविली जाते त्यानंतर भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन होते. आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्याचे प्रत्यक्ष प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे.
राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो. या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ़, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते. भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.
पुढे वाचा:
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
FAQ: प्रजासत्ताक दिनी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न.१ आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो?
उत्तर- आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण तो दिवस भारतीय संविधान लागू झाला होता.
प्रश्न.२ प्रजासत्ताक दिन कितवा आहे?
उत्तर- २०२२ हे वर्ष भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल.
प्रश्न.३ भारताची राज्यघटना कोणत्या वर्षी तयार झाली?
उत्तर- अधिकृत भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी देशाला सादर करण्यात आले.