बटाटा माहिती मराठी | Potato Information in Marathi

बटाटा माहिती मराठी-Potato Information in Marathi
बटाटा माहिती मराठी, Potato Information in Marathi

बटाटा माहिती मराठी – Potato Information in Marathi

  • इंग्रजी नांव : Potato.
  • हिंदी नाव : आलू.
  • वर्णन : सर्व विश्वात अन्नपदार्थांमध्ये बटाट्याचा वापर सर्वाधिक केला जातो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडणारी व लोकप्रिय अशी भाजी म्हणजे बटाटा होय.
  • जमीन : बटाट्याच्या पिकासाठी सर्व प्रकारची जमीन चालते.
  • वेल : बटाट्याचे वेल असतात.
  • पाने : बटाट्याची पाने लंबगोल आकाराची, हिरव्या रंगाची व मऊ असतात. बटाटा हे अन्नसाठा करणारे खोड आहे व जमिनीच्या खाली वाढते.
  • आकार : बटाट्याचा आकार गोल किंवा लंबगोल असतो.
  • रंग : बटाट्याच्या सालीचा रंग पिवळसर असतो; आतील गर पांढऱ्या रंगाचा असतो.
  • जीवनसत्त्वे : बटाट्यामध्ये प्रोटिन, फॉस्फरस, गंधक तसेच जीवनसत्त्व ए व सी असते. बटाट्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते.
  • उत्पादन क्षेत्र : बटाट्याचे मूळ जन्मस्थळ दक्षिण अमेरिका आहे. भारतात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. महाबळेश्वर, पुणे व मध्यप्रदेशात बटाटे मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात.
  • बटाटा उत्पादने : बटाट्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्यापासून भाजी, समोसा, पॅटीस, वेफर्स, पापड, बटाटेवडा, भजी, पराठे (आलू पराठा), मिक्स भाजी, तसेच पावभाजी करतात. उपवासालाही बटाटे वापरले जातात.
  • विक्री : बाजारात वर्षभर मिळणारी व खाल्ली जाणारी ही फळभाजी आहे. बटाट्याची विक्री किलोवर करतात.

बटाट्याचे फायदे व उपयोग

  1. बटाटे गोड व थंड असतात.
  2. बटाट्याच्या सेवनाने शरीरातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.
  3. बटाटे रक्तपित्त दूर करणारे आहे.
  4. बटाटे मलमूत्र उत्पन्न करणारे व बलदायक असतात.

बटाटा खाण्याचे तोटे

  • बटाटे पचनास जड असतात.
  • बटाटे वातूळ असल्याने ऑपरेशन झालेल्या तसेच जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी, गॅसचा (पोटात वायू धरणे) त्रास असलेल्या व्यक्तींनी बटाटे खाणे योग्य नाही.
  • असे म्हटले जाते, की ज्या व्यक्ती जास्त बटाटे खातात त्या व्यक्ती बटाट्याप्रमाणे गोल होतात. म्हणजे जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यास शरीरात चरबी वाढते.

प्रश्न १. बटाटा पासून कोणकोणते पदार्थ बनवता येतात

उत्तर – बटाट्यापासून भाजी, समोसा, पॅटीस, वेफर्स, पापड, बटाटेवडा, भजी, पराठे (आलू पराठा), मिक्स भाजी, तसेच पावभाजी करतात. उपवासालाही बटाटे वापरले जातात.

प्रश्न २. बटाटे खाल्ल्याने तुम्ही जाड होऊ शकता का?

उत्तर – बटाटे आणि तांदूळ हे दोन्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत आणि जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर तुम्ही चरबी बनणार नाही. तथापि, ते पाण्यात उकळण्याऐवजी लोणी, मार्जरीन, मलई किंवा इतर कोणत्याही चरबीयुक्त पदार्थाने शिजवल्यास वजन वाढू शकते.

पुढे वाचा :

Leave a Comment