पी. के. सावंत (महाराष्ट्राचे तिसरे व हंगामी मुख्यमंत्री)-PK Sawant Information in Marathi
पी. के. सावंत (महाराष्ट्राचे तिसरे व हंगामी मुख्यमंत्री)-PK Sawant Information in Marathi

पी. के. सावंत (महाराष्ट्राचे तिसरे व हंगामी मुख्यमंत्री) – PK Sawant Information in Marathi

  • पूर्ण नाव : परशुराम कृष्णाजी सावंत
  • जन्म : १८ जून १९०८
  • कार्यकाल : २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३

पी. के. सावंत यांचा जन्म

पी. के. सावंत हे महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. पी. के.सावंत यांचा जन्म ८ जून १९०८ रोजी मिया, जि. रत्नागिरी येथे झाला. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मित निधनानंतर पी.के. उर्फ बाळासाहेब सावंत या कोकणच्या भूमीपुत्राला महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत अल्पकालिन ठरली. २५ नोव्हें. १९६३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अवघे नऊ दिवसच त्या पदावर राहून ४ डिसेंबर १९६३ राजी त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. मात्र ते काँग्रेसचे एक निष्ठावंत नेते म्हणून परिचित होते. प्रशासनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता; तसेच ‘चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांची ख्याती होती.

पी. के. सावंत यांची राजकीय कारकीर्द

‘इंटक’ या काँग्रेसप्रणित कामगार संघटनेच्या उभारणीत पी.के. उर्फ बाळासाहेब सावंत यांचा सिंहाचा वाटा होता. इंटक (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रस) च्या आणि पक्षकार्याच्या माध्यमातून बाळासाहेब सावंत यांनी मुंबई महानगरपालीकेची निवडणूक लढवली व ते नगरसेवक झाले. पुढे महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० रोजी निर्मिती झाली व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पी.के. उर्फ बाळासाहेब चव्हाण यांची यशवंतराव चव्हाण यांनी ते विधिमंडळाचे सदस्य नसतानाही आपल्या मंत्रीमंडळात गृहमंत्री पदी निवड केली.

राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कोणतीही तडजोड न करता तडफदारपणे निर्णय घेतले. त्यांचे ठामपणे निर्णय घेण्याचे कौशल्य वादादित होते. गृहमंत्री पदासह त्यांनी महाराष्ट्राच्या कृषीमंत्रीपदाचीही जबाबदारी अत्यंत कुशलतेने सांभाळली. कृषीमंत्री पदाच्या कारकिर्दीत अनेक कृषी संस्था उभ्या राहील्या. त्यांच्या प्रयत्नाने कर्जत येथे ग्रामसंशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहूरी)व पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या निर्मितीत मोलाचा सहभाग तसेच दापचेरी येथील दूध विकास योजना यातही त्यांचे मोठे योगदान आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पी.के.तथा बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ’ हे या नेत्याच्या स्मृती जागृत ठेवत आहे. हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रभावी निर्णय घेता आले नाहित मात्र राज्याच्या गृह खात्याची व कृषी खात्याची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपले निर्णय अत्यंत ठामपणे घेतले व एक प्रशासक म्हणून आपल्या कार्याची छाप जनमानसावर पाडली.

पुढे वाचा:

ICICI बँक माहिती मराठी | ICICI Bank Information in Marathi

विवाहासाठी भटजींना लागणाऱ्या सामानाची यादी

7/12 उतारा 2023 मराठी ऑनलाईन | 7/12 Utara in Marathi Online Maharashtra

पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती 2023 | Police Bharti Physical Information in Marathi 2023

MPSC एकत्रित अभ्यासक्रम | MPSC Combine Syllabus in Marathi

पन्हाळा किल्ला माहिती मराठी | Panhala Fort Information in Marathi

साने गुरुजी यांची माहिती । Sane Guruji Information in Marathi

डीएमएलटी कोर्स विषयी माहिती | DMLT Course Information in Marathi

सीईटी परीक्षेची माहिती । CET Exam Information in Marathi

म्हाडा लॉटरी योजना काय आहे? घरे कशी मिळतात | MHADA Lottery Information in Marathi

Leave a Reply