पवनमुक्तासन मराठी माहिती – Pavanamuktasana Information in Marathi

पवनमुक्तासन म्हणजे काय?

‘‘पवन’’ या शब्दाचा अर्थ ‘‘वारा’’ असा आहे. ‘‘मुक्त’’ म्हणजे काढून टाकणे. या आसनामुळे आतड्यातील अशुद्ध वायू शरीराबाहेर काढला जातो म्हणून या आसनास पवनमुक्तासन असे म्हणतात.

पवनमुक्तासन मराठी माहिती, Pavanamuktasana Information in Marathi
पवनमुक्तासन मराठी माहिती, Pavanamuktasana Information in Marathi

पवनमुक्तासन करण्याची पद्धत

 1. पाठ जमिनीला टेकवून चटईवर पडा.
 2. पाय सरळ करा.
 3. उजवा पाय गुडघ्यात मुडपून घ्या.
 4. हा गुडघा दोन्ही हातांनी पकडा.
 5. दीर्घ श्वास घ्या.
 6. हळूहळू गुडघा छातीवर दाबा.
 7. हाताने गुडघ्यावर पूर्ण दाब द्या.
 8. डावा पाय सरळ ठेवा.
 9. हळूहळू गुडघा नाकाला टेकवा.
 10. सहन होईल तितका वेळ थांबा.
 11. श्वासोच्छवास सोडून पूर्वस्थितीत या.
 12. गुडघा सोडा.
 13. पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या.
 14. आता डावा पाय गुडघ्यात मुडपा.
 15. गुडघा दोन्ही हातांनी पकडा.
 16. दीर्घ श्वास घेऊन गुडघा सावकाश छातीवर टेकवा. त्याला हाताने दाबा.
 17. उजवा पाय सरळ ठेवा.
 18. हळूहळू गुडघा नाकाला टेकवा.
 19. शक्य तितका वेळ या स्थितीत थांबा.
 20. श्वास सोडून पूर्वस्थितीत या.
 21. पाय सरळ करून विश्रांती घ्या.
 22. आता दोन्ही पाय गुडघ्यात मुडपून दोन्ही गुडघे दोन्ही हातांनी पकडा.
 23. दीर्घ श्वास घेऊन आणि दोन्ही गुडघे छातीवर ठेवून दोन्ही हातांनी गुडघ्यावर पूर्ण दाब द्या.
 24. हळूहळू दोन्ही गुडघ्यांच्या मध्य भागावर नाक टेकवा.
 25. या स्थितीत आरामात शक्य तितका वेळ थांबा.
 26. श्वास सोडून पूर्वस्थितीत या.
 27. पाय सरळ करून विश्रांती घ्या.
 28. पवनमुक्तासन सुरुवातीस उजव्या पायाने, नंतर डाव्या पायाने आणि शेवटी दोन्ही पायांनी करावे.
 29. ही आसनाची एक फेरी झाली.
 30. या आसनाच्या या तीन मुद्रा आहेत.
 31. हे आसन तीन वेळा किंवा वाटल्यास चार-पाच वेळा करा.

पवनमुक्तासन चे वैशिष्ट्य

श्वास सोडून आणि कुंभक (बाह्य कुंभक) करूनही पवनमुक्तासन करता येते. पण श्वास घेतल्यानंतर पूर्वस्थितीत येणे आवश्यक आहे. याऐवजी श्वासोच्छवास सामान्य ठेवूनही हे आसन करता येते. नाकाने गुडघ्यास स्पर्श करण्याऐवजी गुडघे नरड्याजवळ आणू शकता. जर पाय सरळ केले तर यापासून उत्तानपादासनाचे लाभ मिळतात.

पवनमुक्तासन चे फायदे

 1. या आसनामुळे आतड्यात साचलेला अशुद्ध वायू खाली दाबला जाऊन गुदद्वारावाटे शरीराबाहेर पडतो.
 2. हे आसन पोटदुखीवर गुणकारी आहे.
 3. या आसनाच्या सरावामुळे चरबी कमी होऊ शकते.
 4. हृदयातील विकार दूर होऊ शकतात.
 5. पाठीच्या कण्यातील हाडे मजबूत आणि लवचिक बनण्यास साहाय्य होते.

पवनमुक्तासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply