पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

पाऊस संपावर गेला तर निबंध मराठी – Paus Sampavar Gela Tar Marathi Nibandh

कधी कधी पावसाचा खूप त्रास होतो. बाहेर पडता येत नाही. सतत छत्री घ्यावी लागते. तरीही मोठ्या पावसात कपडे भिजतात; दप्तर भिजते. सगळीकडे चिखल होतो. मैदानात खेळता येत नाही. सायकल चालवता येत नाही. रस्त्यावर पाणी तुंबते. गाड्या अडकून पडतात. म्हणून मनात येते की, पाऊस संपावर गेला, तर खूप बरे होईल. हा सर्व त्रास वाचेल.

परंतु खरोखरच पाऊस संपावर गेला तर? तर खरोखर अनर्थ होईल. नदया-विहिरी आटून जातील. प्यायला पाणी मिळणार नाही. जमीन तापून तिला भेगा पडतील. सगळीकडे फक्त कडक उन्हाळा असेल. सर्व वनस्पती नष्ट होतील. त्यामुळे माणसांचे व प्राण्यांचे हाल होतील.

शिवाय पाऊस नसेल, तर पावसात भिजण्याचा आनंद मिळणार नाही. इंद्रधनुष्य कधीच दिसणार नाही. पाऊस नसेल, तर सगळी मजाच निघून जाईल. छे, छे! पावसाचा संप नकोच!

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी – Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

पाऊस पडलाच नाही तर? अरे बापरे, मला तर त्या गोष्टीची कल्पनाच करवत नाही , पाऊस जर पडलाच नाही तर आपल्या देशात पिके पिकणार नाहीत. मग लोकांना उपाशी राहावे लागेल, त्यांचे फार हाल होतील. पाऊस नसेल तर प्यायच्या पाण्याचीही टंचाई होईल. मग पुढला पावसाळा येईपर्यंतचे आठ महिने काढायचे कसे? पावसाअभावी गुराढोरांना पाणी मिळणार नाही. खायला गवत मिळणार नाही, झाडे, वेली सगळे काही सुकून जाईल.

उन्हाच्या काहिलीने माणसाला आणि सा-या सृष्टीला जगणे असह्य होईल. पूर्वीच्या काळी तर दुष्काळात माणसे भुकेने तडफडून मरत असत. परंतु आता वाहतुकीच्या वेगवान साधनांमुळे अन्नधान्य एका जागेवरून दुस-या जागी पोचवणे शक्य झाले आहे.

पाऊस न पडण्याची बरीच कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे जंगलतोड. आपण झाडे तोडतो त्यामुळे पाऊस कमी होतो. आपण बांधबंधारे घालून पाणी जमिनीत जिरवले पाहिजे त्यामुळे पाऊस जरी एखाद्या वर्षी पडला नाही तरी विहिरींना आणि तळ्यांना पाणी राहील.

पण एकुण पाहाता पाऊस जर पडलाच नाही तर माणसाचे हाल निश्चितच आहेत.

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी

पुढे वाचा:

1 thought on “पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh”

Leave a Comment