अवयव दान माहिती | Organ Donation Information in Marathi

अवयव दान माहिती, Organ Donation Information in Marathi
अवयव दान माहिती, Organ Donation Information in Marathi

१) अवयव दान कोण करू शकते?

अवयव दान कोणत्याही वयाची, कोणत्याही जातीधर्माची, कोणत्याही लिंगाची व्यक्ती करू शकते.

२) कोणत्या अवयवांचे दान जिवंतपणी करता येते ?

ज्या अवयवांच्या नसण्याने जिवंत माणसाच्या आयुष्याला धोका उद्भवणार नाही असे अवयव जिवंतपणी दान करता येतात. आपल्याला दोन किडण्या असतात. परंतु दोन्ही अगदी व्यवस्थित असतील तर एक किडणी दान करता येते. लिव्हरचा थोडा भाग दान करता येतो. कारण कालांतराने हे लिव्हर पुन्हा पूर्ववत होते. पॅनक्रियाझ म्हणजेच स्वादुपिंडाचा भागही जिवंतपणी दान करता येतो. कारण उरलेले स्वादुपिंड उत्तम योग्य पद्धतीने काम करत राहते.

३) जिवंतपणी अवयव कुणाला दान करता येऊ शकतात?

कायद्यानुसार अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीलाच जिवंतपणी अवयवदान करता येते.

४) मृत्यूनंतर अवयव दान करायचे असल्यास काय करावे?

ही प्रक्रिया सोपी आहे. अवयवदानाचा फॉर्म सरकारी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य उपलब्ध असतो. हा फॉर्म भरून त्यावर दोन साक्षीदारांची सही घ्यावी. यातला एक साक्षीदार जवळच्या नात्यातला असावा. फॉर्म भरून झाल्यानंतर तो हॉस्पिटलने सांगितलेल्या पत्त्यावर पाठवावा. काही सरकारी हॉस्पिटल्स आजकाल स्वतःच हे फॉर्स घेतात. त्यानंतर तुम्हाला एक ऑर्गन डोनर कार्ड दिले तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. हे कार्ड आपल्या जवळ त्यामुळे तुम्हाला अचानक काही झाल्यास तुमची अवयवदानाची ईच्छा अपूर्ण राहणार नाही.

५) मृत्यूपूर्वी जर फॉर्म भरला नसेल तर अवयवदान करता येते का?

हो. तेही शक्य आणि सोपे आहे. आपण फॉर्म भरला नसल्यास आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपली इच्छा सांगून ठेवावी. त्यामुळे तुम्हाला काही झाल्यास तुमच्या वतीने तुमच्या मृत्यूपश्चात ते तुमचा अवयवदानाचा फॉर्म भरून तुमची इच्छा पूर्ण करू शकतात.

६) नातेवाइकांशीही काही बोलणे झाले नसेल तर अवयवदान करता येते का?

हे पूर्णपणे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. तुमच्या मृत्यूपश्चात जर तुमचे अवयव दानयोग्य असतील तर डॉक्टर्स तसे नातेवाईकांना परंतु पुढचा सारा भाग त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या इच्छेबद्दल त्यांच्याशी बोलून ठेवणे उत्तम.

७) अवयवदान केल्यामुळे मृत शरीर कुरूप होते का?

आणि अंतिम संस्कार करण्यात काही व्यत्यय येतो का? नाही. अत्यंत निष्णात डॉक्टर्स कौशल्याने शरीरातील चांगले अवयव काढून घेऊन शरीर पूर्ववत स्टिच करतात. त्यामुळे मृत शरीराचे कोणतेही हाल किंवा कुरुपीकरण होत नाही. अंतिम संस्कार करता येतात.

८) मृत्यू जर घरात झाला तर कोणत्या अवयवांचे दान करता येते?

अशा वेळी फक्त डोळे आणि पेशींचे दान करता येते. परंतु तेही चार तासांच्या आत. त्यानंतर तेही अवयव कामाचे राहत नाहीत.

९) यासर्वव्यतिरिक्त अवयवदान असते का?

हो ! एक असे अवयवदान आहे ज्यात तुमच्यावर कोणतीही बंधने नाहीत. तुमचे शरीर संपूर्णपणे रोगांनी ग्रासलेले असले तरीही हरकत नाही. एकही अवयव कामाचा राहिलेला नसेल तरीही हरकत नाही ! तुमचे संपूर्ण शरीर तुम्हाला

सायन्ससाठी दान करता येते. या शरीरापासून अनेक प्रकारचे संशोधन करण्यास मदत होते. परंतु संपूर्ण शरीर दान केल्यानंतर आपल्याला ते अंतिम संस्कारांसाठी प्राप्त होत नाही. वैज्ञानिक त्या शरीराचा योग्य तो वापर करून झाल्यानंतर उरलेले शरीर स्वतःच दहन किंवा दफन करतात. आणि अस्थीअवशेष नातेवाईकांना
पाठवतात. या प्रक्रियेत अंतिम संस्कारांचा सर्व खर्च शरीर स्वीकारणारी संस्था करते.

१०) अवयव विकणे शक्य आहे का ?

अजिबात नाही! अवयव विकणे आणि खरेदी करणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच तुम्ही अवयव घेत असाल तर फक्त शस्त्रक्रियेची किंमत घेतली जाते. कोणत्याही अवयवाची किंमत रुग्णाकडून घेतली जात नाही.

आयुष्यभर कितीही दानधर्म केला असेल तरीही अवयवदाना सारखे श्रेष्ठ दान दुसरे कोणतेही नाही. Organ Donation Information in Marathi

अजून वाचा: कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

बर्ड फ्लू मराठी माहिती | Bird Flu Information in Marathi

पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

आपल्याला भूक का लागते? – भूक म्हणजे काय?

Leave a Reply