ऑलिंपिक खेळ मराठी निबंध – Olympic Khel Marathi Nibandh

ऑलिंपिक ह्या जागतिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात हे आपल्याला ठाऊक आहेच. ह्या स्पर्धांत जगातील ६००० हून अधिक खेळाडू आणि १०० हून अधिक देश भाग घेतात. ह्या वर्षी म्हणजे २०१६ साली त्या ब्राझीलमधील रिओ डी जानिरो येथे त्या भरणार आहेत हे ब-याच लोकांना माहिती असेल.

खरोखर हा क्रीडामहोत्सव मोठा अद्भूतच म्हणावा लागेल असा आहे. ह्या खेळाचे ऑलिंपिक असे नाव ग्रीसमधील ऑलिंपस ह्या पर्वतावरून पडले. असे म्हणतात की इस पूर्व ७७६ मध्ये हर्युलसने ऑलिव्हचे झाड उचलून ऑलिंपस पर्वतावर आणले. तेव्हापासून ह्या स्पर्धा दर चार वर्षांनी होऊ लागल्या. प्राचीन काळी ग्रीस हा एक संपन्न देश होता. तेथील लोक कला आणि क्रीडाप्रेमी होते. ह्या स्पर्धांमध्ये सुरूवातीला फक्त धावण्याच्याच स्पर्धा होत असत. नंतर मग इतरही स्पर्धा होऊ लागल्या. हा समारंभ म्हणजे ग्रीसमधील खूप मोठा धार्मिक उत्सवच होता. पहिल्या दिवशी धार्मिक पूजा होऊन पशूबळी देऊन देवतांना आवाहन केले जात असे. त्या स्पर्धांत बक्षिसे जिंकणा-या माणसाला महान वीर समजले जाई. त्याचे ठिकठिकाणी पुतळे उभारले जात. पुढे ग्रीस रोमच्या ताब्यात गेल्यावर ह्या स्पर्धांवर बंदी आली. त्यानंतर हे खेळ सुरू होण्यासाठी १५०० वर्षांचा काळ जावा लागला.

आधुनिक काळातील ऑलिंपिक स्पर्धा १८७६ साली ग्रीसमध्ये अथेन्स येथे घेण्यात आल्या. त्यावेळे एकुण ४३ स्पर्धांमध्ये १४ देशांतील २४१ क्रीडापटूंनी भागघेतला होता. आज ह्या स्पर्धा संपूर्ण जगात मानवता, बंधुता, एकता आणि सहकार्याचे प्रतिक मानल्या जात असल्या तरी त्यांचे आयोजन करण्याचा खर्च अफाट आहे. त्यामुळे केवळ विकसित आणि समृद्ध देशच त्यांचे आयोजन करू शकतात.

अमेरिका आणि चीन हे देश ह्या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवण्यात अग्रेसर आहेत. मात्र काही खेळाडूंवर उत्तेजक द्रव्ये प्राशन केल्याचेही आरोप झालेले आहेत.

भारतातील पी. टी. उषा हिचे १९८४ साली ऑलिंपिकचे कास्यपदक केवळ काही सेकंदांनी हुकले. २०१२ साली आपल्या देशाला एक रजत आणि तीन कास्य पदके मिळाली. सुशीलकुमार (मुष्टियुद्ध- रजतपदक), सायना नेहवाल (बॅडमिंटन-कास्यपदक), मेरी कोम (मुष्टियुद्ध-कास्य पदक) आणि गगन नारंग (रायफल-शुटिंग-कास्य पदक) अशी ती पदके आहेत.

ह्या स्पर्धांचा स्वतंत्र ध्वज आहे आणि स्वतंत्र घोषणाही आहे. ह्या स्पर्धा आपल्या देशात व्हाव्या म्हणून ब-याच देशांत चुरस असते. ज्या देशाला तो मान मिळतो तो स्वतःला भाग्यशाली समजतो. तिथे आनंद, उत्साह ओसंडून वाहू लागतो. त्यांचा खर्च जरी बराच झाला तरी त्या खेळांमुळे दसपट उत्पन्न त्या देशाला मिळते. कारण हजारो पर्यटक येतात, टीव्ही आणि प्रसारमाध्यमांचे हक्क विकले जातात.

खरोखर ह्या खेळाचे आयोजन ही गौरवाची बाब आहे. जगभर क्रीडेची आवड निर्माण करणा-या ह्या स्पर्धा आहेत असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

पुढे वाचा:

Leave a Reply