बहिणी या जगातील प्रत्येकासाठी वरदान आहेत. आपल्यापैकी अनेक बहिणी आहेत ज्यांच्यावर आपण बिनशर्त प्रेम करतो. काहींना मोठ्या बहिणी आहेत तर काहींना लहान बहिणी आहेत. तरीसुद्धा, बहिणींचा आशीर्वाद मिळाल्याबद्दल आपण सर्व भाग्यवान आहोत. माझी बहिण निबंधाद्वारे, मी माझ्या बहिणीबद्दल आणि तिच्यावरील माझ्या बिनशर्त प्रेमाबद्दल अधिक सांगेन.

माझी बहिण निबंध-My Sister Essay in Marathi
माझी बहिण निबंध, My Sister Essay in Marathi

Set 1: माझी बहीण मराठी निबंध – My Sister Essay in Marathi

मला एक लहान बहीण आहे. ती तीन वर्षांची आहे. तिचे नाव नीता आहे.

घरात मात्र तिची नेहमी बडबड असते. सारखी इकडे तिकडे उड्या मारत असते. आजी तिचे खूप लाड करते. तिला भरपूर गाणी येतात. ती बाहुल्यांबरोबर आवडीने खेळते. ती सारखी T.V. कार्टून बघत असते. ती बालवाडीत जाते. तिचे बोबडे बोल ऐकायला खूप मजा येते.

पण मग ती रुसून बसते. अशी आहे आमची छोटी नीता.

Set 2: माझी बहीण मराठी निबंध – My Sister Essay in Marathi

[मुद्दे : ताई माझा आदर्श – विज्ञान शाखेत अकरावीत – डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा – आईच्या अनुपस्थितीत घर सांभाळणे – शाळेत सर्वांची आवडती – खूप मैत्रिणी.]

माझी बहिण हा माझा आदर्श आहे. मी आता सहावीत आहे, तर ताई अकरावीत आहे. गेल्या वर्षी दहावीत तिने उत्तम गुण मिळवले. आता ती विज्ञान शाखेचा अभ्यास करत आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. मला खात्री आहे, ती उत्तम डॉक्टर होईल. दुसऱ्यांची सेवा करणे तिला खूप आवडते.

माझे आईबाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे बहिणीला घरात खूप काम करावे लागते. ती घर व्यवस्थित ठेवते. आईबाबांना आलेले निरोप घेऊन ठेवते. ती माझ्याकडून अभ्यास करवून घेते. मला वेळच्या वेळी खाऊ घालते. ही सगळी कामे बहिण न कंटाळता करते. कचेरीच्या कामासाठी काही वेळेला आईला बाहेरगावी जावे लागते, तेव्हा माझी ताईच सर्व घर सांभाळते.

माझी बहिण शाळेत सर्वांची लाडकी विदयार्थिनी होती. शाळेच्या अनेक कार्यक्रमांत ती भाग घेत असे. शाळेच्या नियतकालिकात तिचा लेख असे. ताईला खूप मैत्रिणी आहेत. माझ्या ताईची मी लाडकी बहीण आहे.

Set 3: माझी बहीण मराठी निबंध – My Sister Essay in Marathi

माझी बहीण माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. तिचा हट्टच आहे की मी तिला ताई म्हटले पाहिजे त्यामुळे मी तिला ताई म्हणतो. तसे तिचे नाव आरती आहे, पण माझ्यामुळे माझे सर्व मित्र आणि आसपासचे सगळे लोकही तिला ताईच म्हणतात. असे केल्याने ती सा-या जगाची ताई होणार आहे हे काही तिला कळत नाही.

ताई आणि मी- आमच्या दोघांत तसे जास्त अंतर नाही त्यामुळे आम्ही एकमेकांशी खूप भांडतोसुद्धा. पण पुन्हा आम्ही एक होतो आणि खेळायला लागतो. परंतु जरा वेळाने पुन्हा भांडतो. ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असे आमचे सारखे चाललेले असते. त्यामुळे आमची आईसुद्धा आमच्यावर कायम वैतागलेली असते.

माझी आणि ताईची शाळा एकच आहे. ती माझ्या तीन वर्षे पुढे आहे. ती हुशार असल्यामुळे तिचा भाऊ म्हणून सगळेजण मला शाळेत ओळखतात. त्याचा माझ्या मनावर ताण येतो कारण ताईएवढा काही मी अभ्यासात हुशार नाही. मला खेळायला आणि मस्ती करायला आवडते. मला अभ्यासात अडले तर ताई समजावून सांगते त्यामुळे तिच्याशी जास्त ऐटीने वागून चालत नाही.

मला बरे नसले की ताई माझ्या बाजूला बसून राहाते. माझी काळजी घेते. अशा वेळेस वाटते की ही माझी दुसरी आईच आहे की काय? मी सारखा तिच्या मागे मागे असतो. त्यामुळे सगळे मला ‘ताईचे शेपूट’ असे चिडवतात. चिडवू देत, पण मला माझ्या ताईसोबतच राहायचे असते.

अशी माझी ताई मला खूप खूप आवडते.

माझी बहीण मराठी निबंध – My Sister Essay in Marathi

पुढे वाचा:

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi Nibandh

हिरवी संपत्ती मराठी निबंध | Hirvi Sampatti Marathi Essay

स्वावलंबन मराठी निबंध | Swavalamban Essay in Marathi

Leave a Reply