My Hobby Essay in Marathi : छंद आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका निभावतात. जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा ते आपल्या मनावर व्यापतात आणि आम्हाला आनंदित करतात. छंद हे वास्तविक जगापासून आपले निसटणे आहे ज्यामुळे आम्हाला आपल्या चिंता विसरून जावे लागते. शिवाय, ते आपले जीवन मनोरंजक आणि आनंददायक बनवतात. जर आपण ते पाहिले तर आपले सर्व छंद आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. ते आम्हाला भिन्न गोष्टींबद्दल बर्‍याच गोष्टी शिकवतात. ते आपले ज्ञान वाढविण्यात देखील मदत करतात.

माझा आवडता छंद मराठी निबंध, My Hobby Essay in Marathi
माझा आवडता छंद मराठी निबंध, My Hobby Essay in Marathi

Set 1: माझा आवडता छंद मराठी निबंध – Essay on My Favourite Hobby in Marathi

छंद म्हणजे आवड का हो? प्रत्येकाला जगातील कोणती तरी गोष्ट, वस्तू आवडते. पसंद अपनी अपनी.

एखाद्या गोष्टीचा छंद लागला की ती वस्तू दिसली की आपण धावतोच तिच्यामागे. कोणी तिकीटे जमवितो, कोणी पक्षी, प्राणी निसर्गाचे निरीक्षण करतो तर कोणी कविता करतो. मलाही असाच छंद लागला आहे तो नक्कीच सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो आहे झाडे लावण्याचा. मी माझ्या घरासमोरील बागेत अनेक झाडे लावली आहेत. अजून ती लहानच आहेत. पण त्यात आंबा, नारळ, चिंच आणि विविध फुलझाडेही आहेत. गुलाबाच्या रोपट्यांवर तर पिवळे, लाल, पांढरे अशा रंगांची सुंदर फुले आली आहेत.

त्या फुलांवर फुलपाखरे उडताना खूप छान वाटते. रविवार आणि सुट्टी नुसती बागेतच घालवतो.

माझ्या छंदामुळे आमच्या घराची शोभा वाढली आहे. आणि आई म्हणते की यामुळे प्रदूषणासही आळा बसण्यास मदत होईल. असा माझा छंद. वृक्षच खरे मित्र ना, तसेच ते माझेही मित्रच आहेत.

Set 2: माझा आवडता छंद मराठी निबंध – My Favourite Hobby Essay in Marathi

छंद म्हणजे नाद. फावल्यावेळी आपण एखादी गोष्ट जोपासतो. एकदा एखाद्या गोष्टीचा छंद जडला की ती गोष्ट पुन:पुन्हा करावीशी वाटते. आणि तो छंद मग आपला आवडता छंद होऊन बसतो

प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. कोणी उत्तम चित्रे काढण्याचा छंद जोपासतो, तर कोणी वाचनाचा, कोणी क्रिकेट खेळण्याचा छंद जोपासतो, तर कोणी कविता लिहिण्याचा. मला मात्र छंद जडला तो वर्तमानपत्रातील कात्रणे काढून संग्रहित करण्याचा. अंतराळ, विश्व, खगोल याबद्दल जे-जे काही छापून येईल ते-ते संग्रही ठेवण्याचा मला जणू नादच लागला. माझ्या छंद जोपासण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे मी चाळू लागलो आणि माझा संग्रह हळूहळू मोठा होऊ लागला.

माझ्या कात्रणातील संग्रहात अंतराळाबद्दल खूप माहिती आहे. अंतराळातील विविध ग्रह, तारे, उपग्रह, त्यांच्या फिरण्याची गती, आकार याबद्दल भरपूर माहिती माझ्याजवळ उपलब्ध आहे. याशिवाय सुनीता विल्यम्स. कल्पना चावला, नील ऑर्मस्ट्राँग यांचा अंतराळ प्रवास, त्यांनी केलेले स्पेस वॉक याबद्दलची माहिती सांगणारीही भरपूर कात्रणे माझ्या संग्रही आहेत.

अंतराळासंबंधीचा छंद जोपासता जोपसता मला आता अंतराळवीर होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. हा छंद मला अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच उपयोगी पडेल.

Set 3: माझा आवडता छंद मराठी निबंध – Maza Avadta Chand Marathi Nibandh

माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा; कारण छंद माणसाला कष्टांतून विसावा देतो. माझा छंद जरा वेगळा आहे. त्याचे बीज माझ्या लहानपणीच रोवले गेले. आई नोकरी करत असल्यामुळे आजी माझा सांभाळ करत असे. आजी काम करत असताना नेहमी चांगल्या चांगल्या कविता म्हणत असे. त्यामुळे लिहा-वाचायला येण्यापूर्वीच अनेक कविता, काव्यपंक्ती माझ्या तोंडपाठ होत्या.

लिहायला यायला लागल्यापासून मी चांगल्या कविता उतरवून ठेवू लागले. अशा अनेक वया आज भरलेल्या आहेत. त्या पुन:पुन्हा वाचायला मला आवडतात. आवडत्या कविता माझ्या ओठांवर सतत असतात.

या पाठांतराचा मला फायदा होतो. काव्यवाचनाच्या स्पर्धेत किंवा अंताक्षरीमध्ये मी नेहमी यशस्वी होते. आमच्या बाई कधी कधी ‘पावसावरच्या कविता’, ‘चांदण्यावरच्या कविता’ किंवा ‘आईवरील कविता’ असा उपक्रम घेतात. त्या वेळी मीच आघाडीवर असते. निबंध लिहितानाही मला या छंदाचा उपयोग होतो. असा हा माझा कविता जमवण्याचा छंद मला खूप आवडतो.

Set 4: माझा आवडता छंद मराठी निबंध – Essay on My Favourite Hobby in Marathi

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. आम्ही मुले म्हणजे मोठ्या माणसाचेच लहान रूप असतो की. आम्हाला जन्मतः काहीच येत नाही म्हणून शाळेत पाठवले जाते आणि साधारणपणे एकाच प्रकारचे शिक्षण दिले जाते. परंतु आम्ही व्यक्ती म्हणून वेगवेगळे असतो. आमच्या अंगी वेगवेगळ्या कला असतात. कुणाला चांगले गाता येते, कुणाला चांगले नाचता येते. कुणी खूप छान चित्रे काढतो तर कुणाला खेळाचीच खूप आवड असते.

कुणाला फुलपाखरे किंवा किडे बघायला आवडतात. प्रत्येकाच्या अंगात कुठला ना कुठलातरी गुण असतो. आपल्या अंगी जो गुण चांगला आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्याचे छंदात रूपांतर करता आले पाहिजे. छंदामुळे काय होते की रोजच्या त्याच त्या जगण्यातून आपल्याला विरंगुळा बनतो. त्यामुळे आपले मन उत्साहित होऊन उठते. मग रोजच्या जगण्याला सामोरे जाण्याची ताकदही आपल्या अंगी आपोआपच येते.

मला स्वतःला चित्रे काढण्याची खूप आवड आहे. त्यामुळे मी चित्रकलेच्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो.मला त्यात बक्षिसेही मिळतात. चित्रे काढू लागलो की मला दुसरे काहीच आठवत नाही. अगदी तहानभूकसुद्धा विसरूनच जातो मी. मग आई मला थट्टेने म्हणते की अभ्यास करतानाही तू एवढाच मन लावून केला असतास तर?

ते असो. अभ्यास मी करतो परंतु त्या सगळ्या वेळा सांभाळून चित्रही काढतो. छंदाचे तसेच तर आहे. छंदासाठी आपण वेळ काढतोच. नाहीतर आपण ‘ मला शिकवणी होती’, ‘आईबरोबर बाहेर जायचे होते’ वगैरे वगैरेसबबी सांगतो.

मी आता चित्रकलेच्या परीक्षांनाही बसणार आहे. शिवाय मोठा झालो की माझा जे. जे. स्कुल ऑफ आर्टला जाऊन कमर्शियल आर्टिस्ट होण्याचा विचार आहे. माझे बाबा मला त्याविषयी पाठिंबा देतात. ते म्हणतात की आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवू शकलात तर मग काय, आनंदच आनंद तुम्हाला मिळेल. कारण आवडीचे काम तुम्ही करताच, वर त्यात तुम्हाला पैसेही मिळतात. हा केवढा मोठा फायदा आहे.

माझ्यासारखेच छंद सर्वांना असावेत आणि त्यांनी त्या छंदामध्ये पुढे काहीतरी करावे असे मी सर्वांनाच सांगेन.

Set 5: माझा आवडता छंद मराठी निबंध – Essay on My Favourite Hobby in Marathi

माणूस भाकरीशिवाय मुळीच जगू शकत नाही हे जरी खरे असले तरी माणूस फक्त भाकरीवरच जगत नाही हेसुद्धा तितकेच खरे आहे.

म्हणूनच माणसाला काहीतरी छंद हवाच. त्यामुळे त्याला रोजच्या धबडग्यातून थोडीतरी सुटका मिळते. रिकामा वेळ आनंदात जातो, जीवनातला तोच तोचपणा कमी होतो, बुद्धीला चालना मिळते. म्हणूनच माणसाने काही ना काहीतरी छंद लावून घ्यायला हवा असे मला वाटते. छंद अनेक प्रकारचे असतात. कुणाला वाचनाचा छंद असतो, तर कुणाला गिर्यारोहणाचा छंद असतो. कुणाला बागकामाची आवड असते तर कुणाला नाणी आणि पोस्टाची तिकिटे गोळा करायला आवडतात.

मला स्वतःला गिर्यारोहणाचा छंद आहे. हा छंद मला माझ्या बाबांमुळेच लागला आहे. माझ्या बाबांनी आत्तापर्यंत शंभर तरी ट्रेक नक्कीच केले असतील. ते तर एव्हरेस्ट बेस कैंपला पण जाऊन आले आहेत. त्यांच्यासोबत सर्वात पहिल्यांदा मी ट्रेकला गेलो तेव्हा मी दुसरीत म्हणजे सात वर्षांचा होतो. तो ट्रेक आम्ही केला त्याचे नाव होते चंद्रखणी पास. सुरूवातीला पहिल्याच दिवशी आम्हाला चौदा किलोमीटर अंतर चढायचे होते. परंतु मी अगदी माकडासारखा टणाटण वरती उड्या मारीत चढलो. त्यामुळे बाबा माझ्यावर खुश झाले. परंतु दोन दिवसांनी काय झाले की मला त्या अती उंचीमुळे गरगरू लागले आणि उलट्या होऊ लागल्या.

ह्या आजाराला ‘हाय अल्टिट्युड सीकनेस’ असे म्हणतात. म्हणजे एखाद्याला बस ‘लागते तशी मला उंची ‘लागते.’ पण तोपर्यंत एवढ्या उंचावर मी कधी गेलोच नव्हतो त्यामुळे हा आजार मला आहे हे कळणार तरी कसे? शेवटी तो ट्रेक मला आणि बाबांना अर्धवट सोडून खाली यावे लागले. पण त्यानंतर मी नेहमी उंची न लागण्याची गोळी घेऊनच गिर्यारोहणाला जातो. ती गोळी घेतली की मला काहीही होत नाही.

गिर्यारोहण करण्यासाठी आम्ही यूथ हॉस्टेल ऑफ इंडिया ह्या संस्थेचे आजीव सभासद झालो आहोत. ही संस्था सरकारी आहे आणि ती गिर्यारोहण करू इच्छिणा-या साहसी पर्यटकांना वेगवेगळ्या मोहिमांवर घेऊन जाते. दर वर्षी मे महिन्यातच ह्या मोहिमा निघत असल्याने माझी शाळा न बुडवता हा छंद आम्ही पुरा करू शकतो. तिथे आम्ही फोटोसुद्धा खूप काढतो. नंतर ते फोटो बघायला खूप मजा येते.

खरोखर, हा माझा छंद किती शिकवून जातो मला. थंडी, वारा आणि उन सोसण्याची ताकद देतो, चालण्याची सवय लावतो, अंगी काटकपणा बाणवतो. निसर्गाचे सुंदर रूप दाखवतो, बर्फाच्या कड्यावर भणभणत्या वायात तंबू ठोकून आम्ही स्लिपिंग बॅगमध्ये झोपतो तेव्हा रात्रीच्या वेळेस चांदण्यांनी भरलेले आकाश हाताशी आल्यासारखे वाटते. पहाटे जाग येते तेव्हा पूर्वेकडे फुटलेले तांबडे पाहून मन हरखून जाते. .

गिर्यारोहणात धोकेही खूप असतात. हिमालयातील हवा लहरी असते. कधी मौसम बदलेल आणि कधी आपण अडकून पडू सांगता येत नाही. त्यामुळे अनुभवी गाईडचे सांगणे ऐकणे नेहमीच हिताचे ठरते.

असा हा माझा छंद. त्या छंदामुळे मला किती आनंद मिळतो म्हणून सांगू.

Set 6: माझा आवडता छंद मराठी निबंध – My Hobby Essay in Marathi

छंद ठेवण्याचे फायदे

आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात आपल्याला बर्‍याचदा स्वतःसाठी वेळ मिळतो. कालांतराने, आमचे वेळापत्रक खूपच कंटाळवाणे आणि नीरस होते. म्हणूनच आपले मन ताजे आणि सक्रिय ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी मध्ये गुंतविणे आवश्यक आहे. या छंदापेक्षा यापेक्षा चांगले काय आहे? छंद घेण्याचा एक मुख्य फायदा म्हणजे तो एक मुख्य ताण-तणाव आहे. आपण प्रत्यक्षात ते करण्यात आनंद घ्याल आणि यामुळे आपल्या आत्म्यास समाधान मिळेल.

दुसऱ्या शब्दांत, छंद न करता, आपले जीवन एक उत्तेजनदायक चक्र बनते ज्यामध्ये कोणत्याही उत्साह किंवा स्पार्कचा अभाव असतो. छंद आपल्याला विश्रांती घेण्याची आणि आपल्या आयुष्यातील चिंता विसरण्याची उत्तम संधी देतात. ते आपल्याला स्वत: ला एक्सप्लोर करण्याची आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या संभाव्यतेची जाणीव करण्याची परवानगी देतात.

शिवाय छंदही अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत असू शकतात. उदाहरणार्थ, जर आपल्याला चित्रकला आवडत असेल तर आपण खरोखर काही पैसे कमविण्यासाठी आपली कला विकू शकता. त्याचप्रमाणे, आपल्याकडे नृत्य करण्याची खेळी असल्यास आपण आपल्या सुट्टीच्या दिवशी लोकांना नृत्य वर्ग शिकवू शकता. अशा प्रकारे आपला छंद तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या देखील फायदेशीर ठरेल.

माझा आवडता छंद

माझ्याकडे असलेल्या बर्‍यापैकी माझा एक आवडता छंद जर मी निवडला तर मी बागकाम नक्कीच घेईन. मी खूप लहान असताना मला नाचण्याची आवड निर्माण झाली. माझे पाय ज्या प्रकारे संगीताच्या तालमीकडे गेले त्यावरून माझ्या पालकांना खात्री पटली की मी एक जन्मजात नर्तक आहे. नृत्य खूप उत्थानक तसेच आर्थिकदृष्ट्या देखील आहे.

मला नेहमीच संगीत आणि नृत्याची आवड आहे. तथापि, त्यांनी मानवांना मिळवलेला संपूर्ण आनंद मला कधीच कळला नाही. नृत्य आपल्याला भरपूर व्यायाम देते. हे आपल्या शरीरास तालबद्धपणे हलविणे आणि प्रत्येक गाण्याचे ठोके जाणवणे शिकवते. या प्रकारचे शारीरिक व्यायाम अत्यंत आनंददायक आणि आनंददायक आहे.

शिवाय, नृत्याने मला कसे दृढ रहावे आणि माझ्या मर्यादेस कसे ढकलता येईल हे देखील शिकवले. मला नाचत असताना खूप जखम झाल्या आहेत, पुष्कळदा जखम आहेत आणि कट देखील आहे परंतु यामुळे मला त्याचा पाठपुरावा करण्यास थांबवले नाही. खरं तर, मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास आणि माझ्या क्षमतेची पूर्वीपेक्षा जास्त जाणीव करण्यास मला धक्का देतो.

मी नृत्य वर्गात प्रवेश घेतला आहे कारण मला माझा छंद माझे करिअर बनवायचे आहे. मला वाटते की आपण सर्वांनी ज्या गोष्टी करायला आनंद घेत आहोत त्या केल्या पाहिजेत. प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतो आणि या शर्यतीत, ते त्यांच्या आवडी आणि प्राधान्ये सोडतात. मी या शर्यतीतून शिकलो आहे आणि यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक लोक ज्या गोष्टींची हिम्मत करीत नाहीत अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी मी कमीतकमी प्रवास केलेला रस्ता घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे.

थोडक्यात, माझा नाचण्याचा छंद मला जिवंत आणि छान वाटतो. मी एकाच गोष्टीकडे पहात आहे ज्याच्याकडे मी सर्वात जास्त पाहत आहे. अशाप्रकारे, मी एक व्यावसायिक नर्तक असल्याचे आणि माझ्या छंदातून करिअर बनविण्याच्या इच्छुक लोकांसाठी मार्ग तयार करण्याचे माझे स्वप्न साध्य करण्याची आशा करतो.

माझा आवडता छंद मराठी निबंध – My Hobby Essay in Marathi

अजून वाचा: माझा जिवलग मित्र मराठी निबंध

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

Leave a Reply