Set 1: माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी – Mazi Mahatvakanksha Essay in Marathi
प्रत्येकाच्या मनात आपल्या भविष्याबद्दल काही स्वप्ने असतात, काही इच्छा आकांक्षा असतात. त्या जोरावरच माणूस आजचे कठीण दिवस काढत असतो.
बालपण हे असे वय आहे, जेव्हा जीवनात सगळे काही घडायचे असते. आपल्याला हवे तेच घडवण्यासाठी आपल्याला नक्की काय बनायचे आहे ते आपल्या मनात स्पष्ट असावे लागते. मग त्या ध्येयामागे लागून अविश्रांत मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. आपल्याला नक्की काय आवडते ते आपले आपल्याला चांगले माहिती असते. स्वतःहून ठरवलेल्या ध्येयासाठी कितीही कष्ट पडले.तरी ते कष्ट जाणवत नाहीत. मात्र ह्या ठिकाणी पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. आपल्या मुलाला काय आवडते हे पालकांना इतक्या वर्षांच्या निरीक्षणान्ती समजलेले असते. म्हणून त्यांनी त्या क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी मुलाला सहाय्य करायला हवे.
मला ग्रंथपालनाचा कोर्स करून ग्रंथपाल बनावेसे वाटते.मला स्वतःला भाषा खूप आवडतात आणि वाचन करायलाही खूप आवडते. मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या भाषा आम्हाला सध्या अभ्यासायला आहेत. त्यांचा अभ्यास करताना मला खूप मजा येते. म्हणूनच मला वाटते की आपण सुट्टीत छान छान पुस्तके वाचावीत आणि मनातल्या मनात कल्पनेच्या भरा-या माराव्यात. म्हणूनच मी ठरवले आहे की पुढे कॉलेजात गेल्यावर लायब्ररी सायन्स ह्या विषयाच्या शाखेत प्रवेश घ्यावा. म्हणजे मला माझी ही वाचनाची आवड जोपासता येईल.
आजकाल आपल्या देशामध्ये अनेक विदेशी कंपन्या आल्या आहेत. सरकारी कंपन्या आणि बँकातही ग्रंथपालाची गरज भासते. परदेशी वकिलातींनाही ग्रंथपालांची गरज लागते. त्यामुळे माझ्याकडून देशाच्या उन्नतीला नक्कीच हातभार लागेल असे मला वाटते. कुठलेही कौशल्य तुमच्या अंगी असेल तर तेच कामी येते.
शिवाय आत्ताचा माझ्या जीवनातील हा काळ शिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. शिक्षण वगळता अन्य कुठल्याही जबाबदा-या नाहीत असा हा आयुष्यातील एकच काळ असतो. त्या काळाचा उपयोग करून ग्रंथपालन शिकावे आणि त्याचा पुढील जीवनात वापर करावा असे मला वाटते.
आवडत्या छंदालाच तुम्ही तुमचा व्यवसाय बनवलात तर तुम्हाला काम करताना कधीही कंटाळा येणार नाही. म्हणूनच लहानपणापासूनच आपण आपलं ध्येय निश्चित करणे योग्य आहे असे मला वाटते.
Set 2: माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी – Mazi Mahatvakanksha Essay in Marathi
प्रत्येक व्यक्तीची काही तरी महत्त्वाकांक्षा असते. त्याशिवाय जीवन नीरस, निरर्थक होते. आकांक्षा व्यक्तीला एक ध्येय देते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरवते. मार्गात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची शक्ति मिळते. जीवनात महत्त्वाकांक्षा असणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाकांक्षा ही यशाची पहिली पायरी आहे. मनुष्य स्वभावत:च महत्त्वाकांक्षी असतो. माणसाचा हाच गुण त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करतो. निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या आवडी, इच्छा, आकांक्षा आणि ध्येये असतात.
मी एक प्रामाणिक यशस्वी व योग्य शिक्षक बनू इच्छितो. शिक्षक खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता असतो. अध्यापन माझ्या स्वभावातच नव्हे तर रक्तातही आहे. माझे वडील एक खूप चांगली व्यक्ती आणि यशस्वी शिक्षक होते. त्यांचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रतिष्ठित आणि चांगल्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते सर्व जण मोठ्या श्रद्धेने व आदराने त्यांची आठवण काढतात. लेखन-वाचनाची मला खूप आवड आहे. वाचनाचा मला छंद आहे. पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त मला इतर विषयांचेही चांगले ज्ञान आहे. माझ्याजवळ थोर नेत्यांची चरित्रे, जीवन वृत्तांत, प्रवास वर्णने, आठवणी, सामान्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांवरील पुस्तके आहेत.
चांगल्या कुशल, यशस्वी शिक्षकांची या देशात टंचाई आहे. अध्यापन हे विशिष्ट प्रकारचे काम व व्यवसाय आहे. त्याच्यासाठी एका विशिष्ट मानसिक दृष्टिकोन, शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. शिक्षक अभ्यासू, मेहनती, सहिष्णू, सेवाभावी, सरळ स्वभावाचा असणे आवश्यक आहे. तो आपल्या कर्तव्याप्रती सदैव जागरुक असतो. शिक्षकाच्या ठिकाणी असलेल्या गुणांमुळे त्याला राष्ट्रनिर्माता म्हणतात. त्याचे एकमेव उद्दिष्ट आपल्या शिष्याचे भविष्य सुधारणे, त्याला यशस्वी नागरिक बनविणे व आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभे करणे हे असते. एक चांगला शिक्षक बनण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे.
भारत आदर्श गुरूंचा देश आहे. त्यांनी आपणास अनेक विभूती दिल्या, ते माझी प्रेरणा आहेत. मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशाची मनापासून सेवा करू इच्छितो. त्यासाठी मला शिक्षणाशास्त्रातील पदवी मिळवावी लागेल. मला स्वत:ला शिस्त व चांगले गुण संपादित करावे लागतील. मला आशा आहे विश्वास आहे की माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल आणि मी कसोटीवर उतरेन.
Set 3: माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी – Mazi Mahatvakanksha Essay in Marathi
जीवनात महत्त्वकांक्षेला अतिशय महत्त्व आहे. तिच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे आणि उद्देशहीन आवस्था निरर्थक आहे. महत्त्वकांक्षा नसेल तर व्यक्ती प्रगतीच करू शकत नाही. जोपर्यंत उद्देश निचिश्त होत नाही तोपर्यंत जीवनमार्ग सापडत नाही. सर्वप्रथम उद्दिष्ट आणि नंतरच साधन व साधना. जितकेही स्त्री-पुरूष यशस्वी झाले आहेत त्यांनी आपले उद्दिष्ट सतत डोळ्यासमोर ठेवून कठोर परिश्रम घेतले आहेत. आपल्याला नेमकी कशाची महत्त्वकांक्षा आहे याची ओळख वेळीच पटली तर चांगली.
माझी महत्त्वकांक्षा आहे डॉक्टर बनण्याची. माझे वडील देखील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचे स्वतंत्र क्लिनिक आहे. डॉक्टर हा पेशा तशा माझ्या घरातच आहे. भरताला चांगल्या डॉक्टरांची खूप आवश्यकता आहे. त्यांची संख्या आजही तितकी नाही. डॉक्टर बनून देश आणि देशबांधवाची सेवा करणे माझे ध्येय आहे. त्यासाठीच मला डॉक्टर बनायचे आहे.माझ्या या महत्त्वकांक्षेला माझ्या आई-वडिलाची साथ आहे. ते याला चांगली निवड समजतात.
ही गोष्ट लक्षात घेऊन मी परिश्रम घेत आहे. विज्ञानात मला चांगलीच आवड आहे. या विषयात मला नेहमीच चांगले मार्क्स मिळतात. शाळेच्या ज्यूनिअर रेड क्रॉस सोसायटीचा मी चेअरमन आहे. तिचे काम मला पहावे लागते. प्राथमीक उपचार कसा करायचा याचा मी एक कोर्स केला आहे. नर्सिंग संदर्भात देखील मला चांगली माहिती आहे. या सर्व कामात मला माझ्या वडिलांची खूप मदत होते.
पुढे वाचा:
- माझी दैनंदिनी निबंध मराठी
- माझी इच्छा (अभिलाषा) निबंध मराठी
- माझी आवडती भाजी निबंध मराठी
- माझा विमान प्रवास निबंध मराठी
- माझा वाढदिवस मराठी निबंध
- माझा वर्ग निबंध मराठी
- माझा मामा निबंध मराठी
- माझा भारत महान निबंध मराठी
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध