मयूरासन मराठी माहिती – Mayurasana Information in Marathi
‘‘मयूर’’ म्हणजे ‘‘मोर.’’ या आसनात शरीराचा आकार मोरासारखा दिसतो म्हणून या आसनास मयुरासन म्हणतात.

मयूरासन करण्याची पद्धत
- चटईवर वज्रासन घालून बसा.
- मांड्या आणि पुठ्ठे वर उचलून पुढे वाका.
- दोन्ही गुडघ्यांतील अंतर कमीत कमी 30 सेंटिमीटर ठेवा.
- मनगट आणि तळहाताची दिशा गुडघ्याकडे असू द्या.
- आता बाहू कोपरात मुडपून दोन्ही कोपर बेंबीच्या भागावर टेकवा.
- श्वास सोडून कुंभक करा.
- हळूहळू दोन्ही पाय जमिनीवरून उचला आणि त्यांना मागच्या बाजूस सरळ पसरवा.
- तुमच्या शरीराचा सर्व भार तळहात, हात आणि कोपरावर घ्या.
- तोल सांभाळा.
- ही या आसनाची अंतिम अवस्था आहे.
- सुरुवातीस तीन-चार सेकंद हे आसन करा.
- श्वास घेऊन पूर्वस्थितीत या.
- हे आसन 3/4 वेळा करा.
- पद्मासनासह मयुरासन केल्यास त्यास ‘‘मयुरी आसन’’ असे म्हणतात.
मयूरासन वैशिष्ट्य
मयुरासन हे अवघड आसन आहे म्हणून हे सावकाश आणि संयमाने करावे. सुरुवातीस श्वास घेऊन कुंभक करणे सोपे आहे. (अंतर्कुंभक) हळूहळू श्वास सोडून कुंभक करा. (बाह्यकुंभक) हे आसन बाह्य कुंभकाने करावे. सर्व शरीराचा भार हातावर सांभाळून जमिनीच्या समांतर शरीर ठेवणे, ही क्रिया फार सावधगिरीने करावी. थकवा न येता किंवा कोणताही जोर न लावता सहजपणे या आसनात अर्धा मिनिट स्थिर व्हा.
मयूरासनचे फायदे मराठी
- मयुरासनामुळे पचनक्रियेवर अनुकूल परिणाम होतो. या आसनामुळे पोट स्वच्छ होते.
- पाचकरसाची अधिक निर्मिती होते. भूक वाढते.
- आतडी आणि पोटातील रोग बरे होण्यास या आसनाची मदत होते.
- मधुमेहाकरिता उत्तम. कंबर, बाहू, फुफ्फुस, बरगड्या आणि हृदय मजबूत करण्यात या आसनाची फार मदत होते.
मयूरासन विडिओ मराठी
अजून वाचा:
- धनुरासन माहिती मराठी
- अर्धमच्छेंद्रासन मराठी माहिती
- मत्स्यासन मराठी माहिती
- योग मुद्रा (योगमुद्रासन) मराठी माहिती
- पद्मासन माहिती मराठी
- ध्यान कसे करावे
- योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
- योगाचे फायदे
- सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे?
- लैंगिक आजाराची सुरुवातीची लक्षणे
- कोरोनापासून सुरक्षिततेचे उपाय
- कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी
- उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी