350+ मराठी उखाणे | Marathi Ukhane | Marathi Ukhane for Female

Marathi Ukhane : मित्रांनो, आपल्या इथे अनेक सण-उत्सवात उखाणे बोलण्याची प्रथा आहे. तसेच लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची.

आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधे ३५० पेक्षा जास्त उखण्यांची लिस्ट दिली आहे. येथे दिलेल्या जागांवर पती किंवा पत्नीचे नाव घ्यावे लागेल आणि आपण पहिली ओळ दोनदा म्हणू शकतो.

हे उखाणे खूप सोपे आणि समजण्यास सुलभ आहेत. लग्नानंतर नवीन मुलगी जेव्हा सासरच्या घरी जाते तेव्हा तिला उखाणे बोलावले लागतात. त्यासाठी तुम्ही या उखाण्यांचा उपयोग करु शकतात. आपण हे उखाणे आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये शेअर करू शकता.

मराठी उखाणे, Marathi Ukhane, Marathi Ukhane for Female

मराठी उखाणे – Marathi Ukhane

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

Marathi Ukhane - कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

एक होती चिऊ, एक होता काऊ, ….. चे नाव घेतो डोक नका खाऊ.

Marathi Ukhane - एक होती चिऊ, एक होता काऊ, ….. चे नाव घेतो डोक नका खाऊ.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ….. चे नाव घेतो डोक नका खाऊ.

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

Marathi Ukhane - कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

Marathi Ukhane - यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, …… चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, …… चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

भाजीत भाजी मेथीची, ..… माझ्या प्रितीची.

Marathi Ukhane - भाजीत भाजी मेथीची, …… माझ्या प्रितीची.
भाजीत भाजी मेथीची, …… माझ्या प्रितीची.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

Marathi Ukhane - जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….. चे नाव घेतो सर्वजण ऐका.

Marathi Ukhane - संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….. चे नाव घेतो सर्वजण ऐका.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ….. चे नाव घेतो सर्वजण ऐका.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

Ukhane Marathi - गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

लग्नात लागतात हार आणि तुरे, ….. चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

Ukhane Marathi - लग्नात लागतात हार आणि तुरे, ….. चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
लग्नात लागतात हार आणि तुरे, ….. चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

Ukhane marathi - मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ..... चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

इंग्रजीत म्हणतात मून, .…. चंं नाव घेते .…. ची सून.

Ukhane Marathi - इंग्रजीत म्हणतात मून, .…. चंं नाव घेते .…. ची सून.
इंग्रजीत म्हणतात मून, .…. चंं नाव घेते .…. ची सून.

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

Ukhane Marathi - चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा, ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

marathi ukhane for female - ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, ..… चे नाव घेतो सर्व जण ऐका.

marathi ukhane for female - संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, ..… चे नाव घेतो सर्व जण ऐका.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, ..… चे नाव घेतो सर्व जण ऐका.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ….. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

marathi ukhane for female - आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ….. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ….. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

काट्यात काटा गुलाबाचा काटा, ….. चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

marathi ukhane for female - काट्यात काटा गुलाबाचा काटा, ..... चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
काट्यात काटा गुलाबाचा काटा, ….. चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

मराठी उखाणे - अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

मराठी उखाणे - आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ….. चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ….. चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ….. बरोबर संसार करीन सुखाचा.

मराठी उखाणे - मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ….. बरोबर संसार करीन सुखाचा.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ….. बरोबर संसार करीन सुखाचा.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, .…. चं नाव घेते देवापुढे.

marathi ukhane list - चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, .…. चं नाव घेते देवापुढे.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, .…. चं नाव घेते देवापुढे.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

marathi ukhane male - काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

अजून वाचा: 500+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ


Marathi Ukhane for Female

१. बुलढाण्याला जातांना लागतो अजिंठयाचा घाट ….. रावांचा आहे पाटलांसारखा थाट.

२. कपाशीचं शेत बोंडांनी फुललं, भिरभिर नजर टाकतांना ….. पाटील खुललं.

३. जवारीचं पीक मोत्यांचे दाणे, भरल्या शेतांतून चालले ….. पाटील राणे.

४. शेतीचे दागिने नांगर, ईळा, कोयता, मी रांधते बिगी बिगी ….. पाटील खातो आयता.

५. बुलढाण्याच्या घाटांतून मोटार चालली वळणानं लक्ष्मीसंगं ….. बुवा गप्पा करतात ऐटीनं.

६. विद्येचा अभिमान नसावा, स्वाभिमान देशाचा राखावा ….. रावांसह करावी मी स्वदेशाची सेवा.

७. कन्या होतें मी मातृगृहीं, स्नुषा होऊनी आले सासरी ….. राव पति मिळाले भाग्यवान मी ठरलें खरी.

८. लालन पालन आजवरी मातेचं पांघरुण मायेचं ….. पति मिळाले जीवन सौंगडी खरंच नशीब माझं भाग्याचं.

९. हृदयाची श्रीमंती, नीति, धर्म न त्यजीन कधीं …..रावांचे लाभो सहकार्य विनंती थोरपदी.

१०. कुणाची करूं नये निंदा, कुणाचं काढू नये वर्म, ….. रावांच्या जीवावर हाच पाळीन धर्म.

११. ऋण काढून सण करणं संसाराला दूषण ….. रावांच्या सह मानानं जगणं हेच आहे भूषण.

१२. मानापानासाठी खोटेपणा नसावा ….. रावांच्या पत्नीनं हाच नियम पाळावा.

१३. धनदौलत मिळवतांना लाचलुचपत नसावी ….. रावांची पत सर्व लोकांत असावी.

१४. नोकरी असो, धंदा असो, नीतिमत्ता पाळावी ….. रावांच्या सहवासात सुंदर तत्त्वे असावी.

१५. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली ….. रावांच्या जिवावर सगळी हौस माझी पुरली.

१६. देशांत देश हिंदुस्थान सरसा ….. रावांना घास घालतें गोड अनारसा.

१७. तूप वाढण्याला घेतें चांदीचा चमचा ….. रावांना घास घालतें बुंदीच्या लाडूचा.

१८. नागपूर माझें माहेर, नाशिक माझें गांव, ….. रावांचे नांव घेतें शेवंती माझें नांव.

१९. लावीत होते कुंकू, त्यांत होतें मोती ….. रावांसारखे भर्तार जन्मोजन्मीं चिंती.

२०. चंदनाचे पाट त्यावे रुप्याचे ताट ….. राव माझे भुकेले सोडा माझी वाट.

२१. ठाण्याच्या डोंगरावर फुलला पळस ….. रावांच्या छत्रीला सोन्याचा कळस.

२२. झारी झारी पाउस लागे मोत्यांच्या धारा ….. रावांच्या छत्रीला लावला पोवळ्यांचा तुरा.

२३. मुंबईपासून पुण्यापर्यंत पेरला लसूण ….. राव गेले रुसून तर आणतें त्यावर बसून.

२४. दारी होता कोंबडा त्यांत होता पैका ….. रावांचं नांव घेतें सर्वजण ऐका.

२५. आदघर मधघर मदघरांत घालीत होतें वेणी तिकडून आले ….. राव त्यांनी फेकली गुलाबदाणी.

२६. कांचेची फुलदाणी धक्क्याने फुटली उठा उठा ….. राव तुमची माझी शपथ सुटली.

२७. आमच्या मागच्या दारी आहे द्राक्षांचा वेल ….. राव बसले पुजेला मी देतें बेल.

२८. आदघर मदघर, मदघरांत होती चूल चुलीवर होता तवा, त्यावर भाजला रवा मी जातें माहेराला सासूबाई तुमी ….. रावांना जीव लावा.

२९. पुणेरी तांगा, मद्रासी घोडे, ….. रावांचे नांव घेतें सत्यनारायणाच्या पुढें.

३०. हुंडयावर गुंडा, गुंडयावर परात ….. राव बसले पुजेला तिकडून जा घरांत.

३१. रामासारखे पुत्र जन्मले कौसल्येच्या कुशी ….. रावांचे नांव घेतें आनंदाच्या दिवशी.

३२. तुळशीला घालतें प्रदक्षिणा, विष्णूला करतें नवस ….. रावांचे नांव घेतें आज आनंदाचा दिवस.

३३. जाई जुईच्या फुलांची माळी गुंफितो जाळी ….. रावांचे नांव घेते संध्याकाळच्या वेळी.

३४. दारापुढें ओटा, ओटयावर लावली तुळस ….. रावांच्या घरी होईल संसार सुखाचा कळस.

३५. करंज्या, पुयांनी भरला रुखवत ….. रावांनी माझा हात धरला सर्वांच्या देखत.

३६. उभी होतें माडीला ऊन लागलें साडीला चांदीची चुंगरं ….. रावांच्या गाडीला.

३७. वाण घेतां घेतां माथ्यावर आलं ऊन ….. रावांना सांगतें राहावं जपून.

३८. इकडून डोंगर, तिकडून डोंगर, मध्ये भालू कुत्रं भुंकतं ….. रावांना पाहून माझं डोकं उठतं.

३९. बैठकीच्या खोलीत चांदीचा गल्लास ….. रावांच्या जीवासाठी मी आपला जीव केला खल्लास.

४०. कांचेचं घंगाळ, गुलाबाचं पाणी, ….. रावांचं नांव घेतें मोहनराणी.

४१. कांचेच्या ग्लासांत गुलाबी सरबत ….. रावांच्या वाचून मला नाहीं करमत.

४२. मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटींत ….. रावांना ठेवीन म्हणतें मी माझ्याच मुठींत.

४३. शुक्राची चांदणी उगवली ढगांत, जाऊ द्या मला घरी ….. राव आहेत रागांत भारी.

४४. उगवला सूर्यदेव, जगाचा राजा ….. रावांचं नांव घेतें पहिला नंबर माझा.

४५.सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे ….. रावांची वाट पहात सारे गांव राहिलें उभे.

४६. कांचेची तसबीर धक्क्याने फुटली ….. रावांच्या करतां मोटार बोदवडची सुटली.

४७. साखरेची करंजी लाल झाली सपीटा सारणाने ….. रावांचे नांव घेतें संक्राती कारणानें.

४८. राजवरकी बांगडी मोल करी किंमतीने ….. रावांच्या राज्यांत दिवस जातो गंमतीनें.

४९.वर्तमानपत्रांत लिहून आली वार्ता ….. रावांचे नांव घेते तुमच्या म्हणण्याकरितां.

५०. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र होता ढगांत ….. रावांची कीर्ती पसरली जगांत.

Marathi Ukhane List

५१.चतुर्थीच्या दिवशी मी निवडतें दुर्वा xxx रावांच्या जिवावर शालू नेसतें हिरवा.

५२. पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा xxx रावांच्या जिवावर भरतें हातभर चुडा.

५३.काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या xxx रावांच्या मळयांत खूप तुरी पिकल्या

५४. काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके xxx रावांच्या हातांत गुलाबाचे झुबके.

५५. गाईच्या शिंगाना लावला सोनेरी रंग, xxx राव बसले कामाला की, होतात त्यांतच दंग.

५६ गाण्याच्या मैफलींत पेटीचा सूर, xxx रावांच्या भेटीसाठी जनलोकांचा पूर.

५७. आईन वाढवल , वडिलांनी पढवलं, xxx रावांची होतांच सोन्यानं मढवलं.

५८.दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड, xxx रावांच्या गुणापुढं दागिन्यांचा काय पाड.

५९. करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी xxx रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी.

६०. वैशाखाच्या महिन्यांत उन्हाळ्याचा जोर Xxx घराण्यात राव पुरुष थोर.

६१. श्रावणाच्या महिन्यांत जिकडे तिकडे पाणी xxx रावांच्या भेटीसाठी मी झाले आतुर चातकपक्षावाणी.

६२. नांवामध्ये आहे काय, नका हट्ट धरूं xxx रावांच्या नांवाचा उखाणा चांगलासा जूळत नाही त्याला मी काय करूं ?

६३.घरोघरी त्याचपरी, कोणाला सांगायच काय xxx रावांच्या आज्ञेशिवाय पुढे टाकत नाही पाय.

६४.सोन्याच्या घागरी गुलालांनी घासल्या xxx रावांच नांव घेतां सख्या सगळ्या हंसल्या

६५. नको गोट पाटल्या, नको पिळाची सरी xxx रावांच्या जीवावर काळी गळसुरी बरी.

६६.कौलारु घर त्याला मुरुमाची भर, अंबीरशाही फेटा ,नारळी पदर xxx रावांच्या चेहऱ्याकडे पाहतांना थांबत नाही नजर.

६७. कल्चर मोत्याला सुईसारखे वेज xxx रावांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज.

६८. साजूक तुपांत नाजूक चमचा xxx रावांचं नांव घेते आशीर्वाद तुमचा

६९.दशक नको, सुट्टे नको , अंक मोजा साठ xxx रावांचं नांव घेऊन बांधते आठवणीची गांठ .

७०. सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली xxx रावांची राणी कामाला गुंतली.

७१.निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास xxx रावांच्या जोडीनं करीन आयुष्याचा प्रवास.

७२. लता डोले, फूल डोले, डोले वनश्री xxx रावांचं नांव घेतें x x x भाग्यश्री.

७३. लक्ष्मी शोभते दानानं, विद्या शोभते विनयानं xxx च्या जीवावर मी राहतें मानानं.

७४. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा, बाळानं उजळला xxx रावांच्या वंशाचा दिवा.

७५. जीवनाच्या प्रवासांत कधीं दुःखाचं ऊन्ह तर कधी सुखाचा पाऊस xxx रावांचं नांव घेतें सासूबाईनी केली मंगळागौरीची हौस.

७६.कमळांत उभी लक्ष्मी, मोरावरची सरस्वति xxx रावांचं नांव घेतें xxx भाग्यवती.

७७. भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री xxx रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या रात्री.

७८. गंगा यमुना सरस्वति येऊन मिळाल्या थेट, संसाराच्या सारीपाटावर xxx न् xxx ची झाली भेट.

७९.संसाररुपी सागरांत उसळल्या लाटा xxx रावांच्या सुखदुःखांतमाझा अर्धा वाटा.

८०. पाण्याचे हंडयावर फुलांचे झांकण xxx रावाचे हातांत सोन्याचें कांकण.

८१. इकडून वारा तिकडून वारा मध्ये पावसाच्या धारा xxx राव बसले कचेरीला वरुन पडती गारा.

82मला नाही कळत मी आहे साधी xxx रावांचे नांव घेतें सर्व मैत्रिणींच्या आधी.

८३.माझा नमस्कार फुकाचा मिळालेला आशिर्वाद लक्ष मोलाचा xxx रावांचा संसार होवो सुखाचा.

८४ काळी चंद्रकळा खसखशी कांठ xxx रावांच्या नावांसाठी केला समारंभाचा थाट.

८५.चौकोनी टेबलावर रुमाल टाकतें विणून xxx रावांच्या नांवासाठी आग्रह केला म्हणून.

८६. देव मंदिरांत रत्नांच्या राशी xxx रावांचं नांव घेते समारंभाच्या दिवशी.

८७. पंगतीतल्या पानापुढे उदबत्तीचा वास xxx रावांचं नांव घेत मी देतें जिलेबीचा घास.

८८. सोन्याची वाटी, चांदीचा गडू xxx रावांना घांस देतें बुंदीचा लाडू.

८९.देवाची करणी नारळांत पाणी माझें मन xxx रावांच्या चरणी.

९०.आंबाच्या झाडाला कोवळी कोवळी पत्रीं xxx रावांच्या डोक्यावरती मोत्यांची छत्री.

९१. चोहोकडे चार लावल्या समया मध्ये आंथरलें आसन XXX राव बसले पुजेला तर लक्ष्मी झाली प्रसन्न.

९२. गंधानी भरने कचोळे त्यांत पडली मसूर त्यांच्या घराण्यांत Xxx राव चतूर.

९३.आवळीच्या झाडावर पंचरंगी पक्षीxxx रावांचं नांव घेतें चंद्रसूर्य साक्षी.

९४. रत्नजडित सिंहासन भोंवताली मरवा xxx राव बसले पुजेला मी देतें दुवा.

९५. समोर होतें तळे, त्यांत होती कमळे, त्यावर होता भुंगा, माझा निरोप xxx रावांना सांगा.

९६. रंगीत पाट, चांदीचे ताट xxx रावांचं नांव घेतें सोडा मला वाट.

९७. विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी xxx रावांचं नांव घेण्यास अशीच यावी संधी.

९८. सोन्याची वाटी, चांदीचा चमचा xxx रावांचं नांव घेण्यास आग्रह फार तुमचा.

९९.हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे xxx रावांचं नांव घेतें सत्यनारायणापुढे.

१००. फुलांची वेणी गुंफीतो माळी xxx नांव घेतें हळदीकुंकवाच्या वेळी.

Navriche Ukhane

१०१. तुळशीची करतें पूजा विष्णूची करतें शांति xxx राव दीर्घायु व्हावेत अशी माझी विनंति.

१०२. मथुरेच्या कुंजवनांत कृष्ण वाजवितो बासरी xxx रावांच्या जिवावर सुखी आहे मी सासरी.

१०३. मंद वाहे वारा, चंद्रभागेत स्थिर चाले होडी xxx रावांची व माझी सुखी आहे जोडी.

१०४. जन्म दिला मातेनं, पालन केलें पित्यानं xxx रावांचं नांव घेतें पत्नी या नात्यानं.

१०५. हिंदमातेच्या हातांत रत्नजडावाचे तोडे xxx रावांचं नांव घेतें वडील माणसांच्या पुढें.

१०६. जाईजुईच्या झाडाखाली फुलांचा विणला शेला xxx रावांचं नांव घेतें दिवस अस्ताला गेला.

१०७. लक्ष प्रदक्षणा घालतें उंबराला xxx रावांचं नांव घेते पहिल्या नंबराला.

१०८. नऊ दिवस नवरात्र, दहाव्या दिवशी दसरा xxx रावांचं नांव घ्यायला नंबर माझा दुसरा.

१०९. शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान xxx रावांचं नांव घेऊन राखतें तुमचा मान.

११०. चांदीच्या ताटांत बर्फीची चवड xxx रावांच्या नांवाची सर्वांना आवड.

१११. संध्येच्या पळीवर नागाची खूण xxx रावांचं नांव घेतें XXX सून.

११२.हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी xxx रावांचं नांव घेतें Xxx दिवशी.

११३.रत्नजडीत सिंहासनावर उभा दत्तराज xxx रावांचं नांव घेतें अखंड चुडा भरा आज.

११४. प्राथमिक शाळेत ज्ञानाची वाहते सरिता xxx रावांचं नांव घेतें मैत्रिणींच्या आग्रहाकरितां.

११५. रुणझुण जातें, खिडकीवाटे पाहतें, खिडकीला तीन तारा, आडकित्त्याला चुंगरं बारा, पान खातें तेरा तेरा, घाम आला दरादरा xxx राव बसले पलंगावर तर मी घालतें वारा.

११६. रातराणीच्या सुगंधानं निशिगंध झाला मोहितxxx रावांना आयुष्य मागतें सासुसासऱ्यासहित.

११७. उभी होतें मळ्यांत, नजर गेली तळ्यांत, पांचशेंची कंठी xxx रावांच्या गळ्यांत.

११८. वेणीफणीच्या पेटीला बिलवरी आरसा xxx रावांना घास घालतें अनारसा.

११९. अनुसया, सीता, सावित्री होऊन गेल्या जगीं सती तीन xxx रावांच्या चरणी बाई मी असतें सदा लीन. १२०. गळ्यांत सरी वाकू कशी, पायांत पैंजण चालू कशी xxx राव बसले मित्रापाशी तर मोठयानं मी बोलूं कशी ?

१२१. पिकलेल्या पानांत बदाम घातले किसून xxx रावांना विडा देतें पलंगावर बसून .

१२२. चहा केला, चिवडा केला, कॉफी केली ताजी xxx रावांचं नांव घेतें सर्वांची होती म्हणून मर्जी.

१२३. मोठमोठया आकाराचे मोतीं वेचून काढले बारा xxx रावांचे नांव घेतें माझं नांव तारा.

१२४. सोन्याची बुगडी, मोत्यांचा कळस xxx रावांचं नांव घेण्याला मला नाही आळस.

१२५. आले राम सीता न् लक्ष्मण दीर, xxx रावांचं नांव घेते मंडळींनो व्हा स्थीर.

१२६. काळ्या गाईचे लोणी, कड कड कढविलें, xxx रावांचे महालांत कारंजें उडविलें.

१२७. हापूस आंबा पायरी, त्याच्या केल्या फोडी, xxx रावांच्या आंगठीवर राधाकृष्णाची जोडी.

१२८. दारी होती तुळस, तिला घालते पळी पळी पाणी, पहिली होती आईबापांची तान्ही आतां झालें x x x रावांची राणी.

१२९. मी होतें मळ्यांत, चंद्र दिसतो तळ्यांत xxx रावांच्या नांवाने मंगळसूत्र बांधतें गळ्यांत.

१३०. समुद्रात आली भरती, नदीला आला पूर xxx रावांच्यासाठी आईबाप केले दूर.

१३१.गणपतीच्या डोक्यावर ठेवलें हिरेमाणकांचे छत्र xxx रावांच्या नांवानें बांधतें मंगळसूत्र.

१३२. सोळा वर्षांपर्यंत होतें माहेरच्या मायेंत xxx रावंच्यासाठी जाईन सासरच्या छायेत.

१३३. विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व xxx रावांचं नांव घेतें ऐकत आहेत सर्व.

१३४. द्वारकेचा राजा, पाठीराखा द्रोपदीचा xxx रावांना मी घांस देतें साखरभाताचा.

१३५. आप्तांची भेट प्रेमाला येते भरती xxx रावांची जोड हीच जीवनाची पूर्ती.

१३६.स्वराज्याच्या बागेमध्ये गांधी झाले माळी xxx रावांचं नांव घेतें वरातीचे वेळी.

१३७. वसंत ऋतूंमध्ये जशी येते कोकीळेची चाहूल तशीच मी टाकीतें xxx रावांच्या घरामध्ये पाऊल.

१३८. जिजाईनीं केला शिवादेवीला नवस, आज xxx चा आला भाग्याचा दिवस.

१३९. नमस्कार फुकाचा, आशिर्वाद मोलाचा xxx रावांचा संसार करीन मी सुखाचा.

१४०. श्रीकृष्णाची राधा, शंकराची पार्वती xxx च्या जोडीला आशीर्वाद देती.

१४१.गणपतीला दुर्वा, शंकराला बेल xxx रावांच्या घरी वाढेल वंशवृक्षाचा वेल.

१४२. आंबाच्या वनांत कोकीळा करी कूजन xxx रावांचे नांव घेतें झालें लक्ष्मीपूजन.

१४३. माहेरच्या परिसरांत वेंचले मी ज्ञानकण xxx रावांचे नांव घेऊन सोडतें मी गुंफलेलं कंकण.

१४४. शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी, माझ्या हृदयांत कोरली xxx रावांची सुंदर मूर्ती.

१४५. संसाररुपी सागरांत देहाची केली होडी xxx रावांच्या घरांत शोभते xxx ची जोडी.

१४६. भारतीय युद्धांत कृष्णांनी सांगितली गीता xxx रावांचं नांव घेतें मी xxx त्यांची कांता.

१४७. मृग नक्षत्रांत आनंदानं नाच करतो मोर xxx रावांच्या जिवावर लावीन कुंकवाची कोर.

१४८. हिंदमातेच्या गळ्यांत स्वातंत्र्यफुलांची जाळी xxx रावांचं नांव घेतें बारशाचे वेळी.

१४९. पेटी तबला शिकतां शिकतां वाजवली सतार xxx रावांच्या संसारांत धन्य झालें मी फार.

१५०. ज्योतिबा फुले यांनी घेतला स्त्रीशिक्षणाचा कैवार xxx रावांच्या घरीं मन रमवितो माझा संसार.

नवरीचे उखाणे

१५१.नको मोतीं, नको चंद्रहार, xxx रावांचं नांव हाच माझा अलंकार.

१५२.चंद्रोदयाला येती समुद्राला भरती, xxx रावांना बघून सारे श्रम हरपती.

१५३. गोदावरी कांठची मुलगी कृष्णाकांठी आली, xxx रावांच्या नांवाचं मंगळसूत्र ल्याली.

१५४. चांदीच्या कढईत कढविलं तूप, xxx रावांचं दिसतं त्यांत कृष्णासारखं रुप.

१५५. वासांत वास घ्यावा केशराचा, xxx रावांच्या नांवाचा आग्रह आहे फुकाचा.

१५६. आंब्याच्या झाडावर कोकिळा करितें कुंजन, xxx रावांच्या मूर्तीचे माझ्या अंतरी चाले पूजन.

१५७.पुण्यापासून मुंबईपर्यंत लावल्या आगगाडीच्या तारा, xxx रावांना मागतें औक्ष देवापाशीं शंभरावर सतरा.

१५८. आंत जाते, बाहेर येतें, घडयाळ्यांत वाजला एक, xxx रावांचं नांव घेतें बाबरांची लेक.

१५९. राधाकृष्णाची मूर्ति पहातें मी आरशांत, xxx रावांचं नांव घेतें घरच्या बारशांत.

१६०. हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी, xxx रावांचं नांव घेतें डोहाळजेवणाचे वेळी.

१६१. दया, क्षमा, शांति, हेंच सुखाचं माहेर, xxx रावांनी केला सौभाग्याचा आहेर.

१६२. बिल्वर केले, पाटल्या केल्या, सरी आतां करावयाची, xxx रावांचं नांव घ्यायला मागं नाहीं सरायची.

१६३. गोमंतकीय आंबा चवीला लागतो गोड, xxx रावांची मिळू दे जन्मोजन्मीं जोड.

१६४. चमकली रोहिणी हंसला रजनीनाथ, xxx रावांच्या जीवनांत माझी आहे साथ.

१६५. सुशील सासू सासरे, सद्गुणी मातापिता, xxx रावांचं नांव घेतें सर्वांच्याकरितां.

१६६. काव्यामध्ये श्रेष्ठ अलंकार आहेत उपमा उत्प्रेक्षा, xxx राव सुखी असोत हीच माझी अपेक्षा.

१६७.चांगल्या कुळी जन्मलें, चांगल्या कुळी आले xxx रावांच्या मुळं भाग्यशाली झालें.

१६८. सृष्टीच्या बागेत सूर्यनारायण झाले माळी xxx रावांचं नांव घेतें सर्वांच्या पंक्तीच्या वेळी.

१६९. घर भरावं लक्ष्मीनं, जग भरावं कीर्तीनं xxx रावांच जीवन उजळीत मी रहावं प्रीतीच्या ज्योतीनं.

१७०. काश्मीरशोभा पाहून थक्क झाले कवी xxx रावांचं नांव घेतांना थबकला रवी.

१७१. राम झाले विजयी सीतेला स्मरुन xxx रावांचं नांव घेतें शांता-दुर्गेला स्मरुन.

१७२.सोन्याच्या कामाला सोनार लागतो कुशल xxx रावांचं नांव घेतें चांगलं अस्सल.

१७३. चंदन कापूर कस्तुरी अत्तराचा वास xxx रावांचं नांव घेते तुमच्याचकरतां खास.

१७४. संसाररुपी बागेत प्रेमरुपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करतें xxx रावांच्या बरोबर.

१७५. क्षत्रीय कुळी जन्मलें भाग्य या कन्येचें xxx रावांचं नांव झालें सार्थक या जन्माचें.

१७६. सौभाग्याच्या साक्षीनं काळ्या मण्याची पोत आली जीवनांत xxx रावांच्या असूं दे मी नित्य स्मरणांत. १७७. कण्वमुनीचा आश्रम शकुंतलेचं माहेर xxx रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

१७८. केळीच्या पानावर गाईचं तूप xxx रावांचं कृष्णासारखं रुप.

१७९. सासू नी सासरे, जसा वाडयाचा कळस, नणंद अक्काबाई जशी दारींची तुळस, xxx रावांचं नांव घ्यायला मला नाही आळस.

१८०.निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवें रान xxx रावांचं नांव घेऊन, राखतें सर्वांचा मान.

१८१.नीलवर्ण आकाशांत चमकतो शुक्राचा तारा xxx रावांच्या सहवासांत मला लागतो सुखाचा वारा.

१८२.काशीच्या तांब्याला रामेश्वराची खूण xxx नांव घेतें xxx सून.

१८३.गोट केले, पाटल्या केल्या, मध्ये लेतें केरवा xxx रावांच्या जीवावर शालू नेसतें हिरवा.

१८४. चंदनाच्या पाटाला रुप्याचे ठसे xxx राव पाटावर बसे तर चंद्रसूर्य हंसे.

१८५. गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यांत xxx रावांचं नांव घेतें सवाष्णींच्या मेळ्यांत.

१८६. अंजिरी चोळीला मियायेवढी गाठ xxx रावांचं नांव घेतें हळदी कुंकवाचा थाट.

१८७. काळी निळी घोडी मुंबईच्या बाजारी xxx रावांची खुर्ची वकिलाशेजारी.

१८८.चांदीच्या ताटांत खडी साखरेचे काजू xxx राव निघाले कचेरीला फौजदार देती बाजू.

१८९. पैठणी नको, शालू नको, नको भरजरी शेला xxx रावांच्या हृदयांत जागा आहे मला.

१९०. सहस्त्र कमळामध्ये वास आहे लक्ष्मीचा, मला आहे अभिमान xxx रावांच्या नांवाचा.

२००. अहमदाबादी चंद्रकळा, तिला मोत्यांचा पदर xxx रावांच्या जिवावर हळदीकुंकवाचा गजर.

Ukhane in Marathi

२०१. रुप्याचा चौफुला त्याला लवंगा वेलदोडयांचा सांठा xxx रावांच्या विडयांत माझा आहे वांटा.

२०२. गंगेची वाळू चाळणीनं चाळू, घरी गेल्यावर xxx राव आपण सारीपाट खेळू.

२०३. सोन्याच्या सोंगटया, रुप्याचे फांसे, जज्यांच्या कचेरीत xxx राव खासे.

२०४. वाटल्या डाळीचं केलं पिठलं, त्यांत खोबरं घातलं किसून xxx राव गेले रुसून तेव्हां सावित्रीनं तें खाल्लं चाटून पुसून.

२०५. कोऱ्या घागरीत ठेवला लिंबांचा सार xxx रावांच्या राणीच्या गळ्यांत मोत्यांचा हार.

२०६. रुप्याच्या ताटांत रायपुरी साखर xxx रावांना भूक लागली आतां जाऊं द्या मला लवकर.

२०७.पिवळ्या पितांबरामध्ये सोडले सोगे xxx राव गणपतीच्या पुजेला उभे.

२०८. रत्नखचित डबी, त्यांत मोत्यांचा दाणा xxx रावांच्या स्वारीबरोबर सरस्वतीचा आला मेणा.

२०९. प्रभातकाळी निळ्या आभाळांत उगवतो सूर्यकांत, मनाचा लागत नाहीं थांग पण xxx राव दिसतात शांत.

२१०.कुरुंदाची सहाण, चंदनांचं खोड xxx रावांचा शब्द अमृतापेक्षां गोड.

२११. चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी आहे xxx रावांची आवडती.

२१२. पुण्यास जन्मलें, मुंबईस शिकलें xxx रावांच्या जिवासाठी नागपूर पाहिलें.

२१३. घोडयावरला स्वार उंटावरला जोजला xxx रावांचे नांव घेण्यास जाऊं द्या मला.

२१४. पेशव्यांचे फौजेंत बिनीचे स्वार xxx रावांचे नांव घेतलें उघडा आतां दार.

२१५. पेशव्यांच्या फौजेंत हत्तीवर निशान xxx राव मला चाहतात जीव की प्राण.

२१६. चंदनी पलंग, चांदीचे खूर xxx रावांचे नांव सर्वांना मशहूर.

२१७. पूर्वदिशा फाकली, उदयास आला रवी, आमच्या कुलांत xxx राव जन्मले कवी.

२१८. दिल्लीचे सिंहासन पेशव्यांनी फोडलें xxx रावांच्या जिवाकरतां मी माहेर सोडलें.

२१९. स्वतःचा धर्म परधर्माहून मानावा श्रेष्ठ xxx रावांना मी ठेवीन सदा संतुष्ट.

२२०. चांदीच्या ताटांत दहीभाताचा काला xxx रावाचं नांव घेतें जयहिंद बोला.

२२१. सागवानी टेबलावर रुमाल टाकतें विणून xxx रावांचं नांव घेतें आग्रह केला म्हणून.

२२२. विठोबाच्या शिखराला सोन्याचा कळस xxx रावांचं नांव घ्यायला मला नाही आळस.

२२३.चांदीच्या ताटांत सोन्याच्या गिन्न्या xxx रावांचं नांव घेते पवारांची कन्या.

२२४. सोन्याची आंगठी हिरव्या शालूंतून झळकली xxx रावांची मूर्ति आगगाडीतून वळखली.

२२५.मोठे मोठे मोती कानांतील कुडीला xxx रावांचं नांव घेतें मैत्रीणींच्या जोडीला.

२२६. आत्तांच्या राज्यांत बांगडया भरतें तीन तीन xxx रावांच्या खमीसाला फौन्टपेन एकच यीयमीन.

२२७. चांदीच्या ताटांत, वेलदोडे घातले भातांत, xxx रावांची स्वारी निघाली कचेरीस, छत्री देते हातांत.

२२८. धाकटयाने राखावा वडिलांचा आदर xxx रावांचं नांव घेतलें सोडा आतां पदर.

२२९.सुनेस जशी सासू, तसा मुलांस पंतोजी xxx रावांची झाली नाहीं कधीं मजवर नाराजी.

२३०. चंदनाच्या झाडावरती देवी घेते विसावा xxx रावांचे नांव घेतें आशीर्वाद असावा.

२३१. साखरेच्या गाठया निरीच्या घोळ्यांत xxx रावांचे नांव घेतें सुवासिनींच्या मेळ्यांत.

२३२. माळ्याच्या मळ्यांत चालली होती मोट xxx राव घ्या पाण्याचा घोट.

२३३.गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपती केला शाडूचा xxx राव घांस घ्या लाडूचा.

२३४. द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान, मी हिंडलें हिंदुस्थान xxx राव मिळाले ही रत्नाची खाण.

२३५. चंदनाच्या झाडाखालीं नागिणीची वस्ती xxx रावांचे नांव घेतें आग्रह झाला जास्ती.

२३६. सोनेरी डबींत अत्तराचा बोळा xxx रावांचं नांव घेतें शंभर रुपये तोळा.

२३७. पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेची पानं, खायला छान, चिमणा आंबा, त्याच्या केल्या फोडी, आईबापांना गोडी, समोर होती तुळशीची बाग, बागेत होती सीता, तिच्याजवळ होती कळशी, कळशीत होतं गंगेचं पाणी xxx रावांचं नांव घेतें पंचामृतावाणी.

२३८. समोर होता कोनाडा, कोनाडयांत होती सरी, सरी गेली सरकून, नांव घेतें पारखून xxx रावांच्या हाताखाली पांचशें कारकून.

२३९. काळ्या मण्यांची पोत हे सौभाग्याचं लेणं xxx रावांच्या जिवावर XXX चं अवलंबून जिणं.

२४०. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा xxx रावांचं नांव घेतें माझी वाट सोडा.

२४१. सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्यांची पोत xxx रावांच्या चरणी अर्पण करते माझी जीवनज्योत.

२४२.सासू सासरे भाग्याचे दीर माझे हौशी xxx रावांचे नांव घेतें हळदी कुंकवाचे दिवशीं.

२४३. मंगलदेवी मंगलमाते नमन करतें तुला xxx रावांचं नांव घेतें अखंड सौभाग्य दे मला.

२४४. आशिर्वाद लाखाचा, अहंकार फुकाचा xxx रावांचा संसार करीन मी सुखाचा.

२४५. सकाळच्या प्रहरी नमन करतें दत्ताला xxx रावांचं नांव घेतांना आनंद होतो चित्ताला.

२४६. काशीसारखें शहर, प्रजेसारखा राजा xxx रावांचं नांव घेतें केल्या पुण्यांत अर्धा हिस्सा माझा.

२४७. रुक्मीणीनं पण केला कृष्णाला मी वरीन XXXXX रावांचा संसार सुखाचा मी करीन.

२४८. पांची पांडव सहावी द्रौपदी xxx रावांसारखे मिळाले पति, तर देवाचे आभार मानूं किती.

२४९.द्राक्षाच्या वेलाखाली चरत होत्या हरिणी xxx रावांचं नांव घेतें वडिल मंडळींच्या चरणी.

२५०. जीवनरुपी सागरांत पतीपत्नींचा खेळ xxx रावांचं नांव घेते संध्याकाळची वेळ.

Ukhane in Marathi for Female

२५१. मणी मंगळसूत्र हे माझें द्रव्य xxx रावांच्या आज्ञेत रहाणे हेच माझें कर्तव्य.

२५२. देशांत देश हिंदुस्थान, जगामध्ये त्याचा मान xxx रावांची कांता देशासाठी करील दान.

२५३. हत्तीवर अंबारी, उंटावर झारी xxx रावांची आली स्वारी, तर पहातात नगरच्या नारी.

२५४. संसाराच्या देव्हाऱ्यांत नंदादीप समाधानाचा, xxx रावांचा संसार करतें भाग्याचा.

२५५. संसारुपी सागरांत पती-पत्नींची होडी, ईश्वरा सुखी ठेव xxx रावांची नि माझी जोडी.

२५६. यमुनेच्या तीरीं कृष्णदेव वाजवितो बांसरी, xxx रावांच्या जिवावर मी आहे सुखी सासरी.

२५७. संसारामध्ये मुख्य असतात कनक आणि कांता, xxx रावांना जन्म देणारी धन्य ती माता.

२५८. चमकली शुक्राची चांदणी, चंद्र बुडाला ढगांत, xxx राव पडले पदरांत तर सौभाग्यवती झालें जगांत.

२५९. मानससरोवरांत रहातात राजहंस पक्षी, xxx रावांचं नांव घेतें चंद्र सूर्य साक्षी.

२६०. दोनशेचा शालू, त्याला तीनशेंचा पदर, xxx रावांच्या नांवानं लेतें हळदी कुंकवाचा गजर.

२६१.चांदीच्या ताटांत सोन्याची सरी, xxx रावांचं नांव घेते तुमच्या घरी.

२६२. शालूचा पदर अडकला तोडयांत, xxx रावांचं घेते तुमच्या वाडयांत.

२६३. महादेवाच्या पिंडीला चौकोनी आरसे, xxx राव बसले जेवायला, मी वाढतें अनारसे.

२६४. जटाधारी शंकराची गौरवर्ण कांति, xxx राव सुखी असोत हीच देवाजवळ विनंति.

२६५. संगीत नाटक सुभद्राहरण, xxx रावांच्या नांवाचं आज काय कारण?

२६६. दाट मणीमंगळसूत्र मोती लावा आणिक, आत्याबाईंच्या पोटीं xxx राव जन्मले माणिक.

२६७. आयाबाया म्हणतात, नांव घे नांव घे, लाजू कशी नांव घ्याया ? मी तर xxx रावांची जाया.

२६८. हातामध्ये गोठ पाटल्या, सरी आहे करायची, xxx रावांचं नांव घ्यायला मागें नाहीं सरायची.

२६९. कृष्णाबाई नदी मध्यभागी कमान, xxx रावांची मूर्ती कृष्णदेवासमान.

२७०. चांदीच्या भांडयाला नांवाची खूण, xxx रावांचं नांव घेतें मोहित्यांची सून.

२७१. चांदीच्या ताटांत दहिभाताचा काला, xxx रावांचं नांव घ्यायला आजपासून आरंभ केला.

२७२. चांदीच्या तबकांत मोत्यांचे गरे, xxx राव दिसतात बरे, पण वागतील तेव्हां खरे.

२७३. चांदीच्या वाटीत डाळिंबाचे दाणे, xxx मोहित्यांच्या घराण्यांत शहाणे.

२७४. तिपेडी वेणींत मोती गुंफले एक लाख, xxx रावांचं नांव घेतें आशीर्वाद द्या लाख लाख.

२७५.सोन्याची पाटली हाताला दाटली, xxx रावांचं नांव घेतांना खुशाली वाटली.

२७६. मोत्याचा करंडा, चांदी सोन्याचं झांकण, xxx रावांचं नांव घेतें न् सोडतें कंकण.

२७७. मागे घालते पाटल्या, मधे घालतें बिल्वर, पुढे घालते छंद, xxx रावांचं नांव घेतें कल्ला करा बंद.

२७८.शिणगारलेला हत्ती मांडवापुढे झुले, xxx रावांच्या हातांत सुवासिक फुलें.

२७९. भरल्या पंगतीत रांगोळी काढतें ठिपक्यांची, xxx रावांच्या भोंवती पंगत पडली मित्रांची.

२८०. शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता, xxx रावांची मी आवडती कांता.

२८१. गोकुळांत श्रीकृष्ण वाजवतो पावा, xxx रावांचं नांव घेतें आशीर्वाद असावा.

२८२. यमुनेच्या तीरी कृष्ण क्रीडा करी, xxx रावांचं नांव घेतें चव्हाणांच्या घरी.

२८३. बारीक बांगडी भरतें किंमतीनं, xxx रावांच्या सहवासांत दिवस जातात गंमतीनं.

२८४.मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला, xxx रावांचे गुण पाहून अर्पण केली मला.

२८५. गणपती हरिश्चंद्र सुटला वारा, रास करा, गाडया भरा, xxx राव तुम्ही पेवाला जागा करा.

२८६. एक शेर दुधाचा पावशेर खवा, xxx रावांचं नांव घेतें लक्षात ठेवा.

२८७. चंद्रभागेत बुडवितें चांदीचा घडा, xxx रावांनी दिला मला सातारचा पेढा.

२८८.अनारसे काढते तळून, लाडू ठेवते वळून, आईबापांच्या इथं राहिलें होतें खेळून xxxx राव आतां घ्या संभाळून.

२८९. चहा केला निवून गेला, पेरु देतें चिरुन, केळीची काढतें साल, xxx रावांच्या जिवावर कुंकू लेते लाल.

२९०. कांचेच्या बरणीत दुहेरी बर्फी, xxx रावांचं नांव घेतें दुहीतर्फी.

३००. उत्तरदाणी, गुलाबदाणी, चौफुला केला नवा, xxx राव कोल्हापूरची दाखवा मला हवा.

Ukhane Marathi for Female

३०१.लहानपणी तुळशीला घालीत होतें पळी पळी पाणी म्हणून आतां झालें xxx रावांची राणी.

३०२. काळी चंद्रकळा नेसतें कसून, xxx रावांनी दिलेले पेढे खातें हसून.

३०३. काळी चंद्रकळा तिला कस्तुरी चांदणी, xxx रावांचं नांव घेते मोहित्यांची राणी.

३०४. मागं पुढं गोठ पाटल्या, मधीं लेतें छंद, xxx रावांचं नांव घेतें गलबला करा बंद.

३०५. साताराच्या सडकेनं घोडयांची लाईन, xxx रावांचं नांव घेतें भावांची बहीण.

३०६. द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान, बाबा हिंडले हिंदुस्थान, तेव्हां सांपडले xxx राव छान.

३०७. भाग्य उजळलं पत्नीचं, अंगठीवर चमकला हिरा, आकाशांत चमकला तारा, xxx रावांचं नांव घेतें हाच माझा भाग्योदय खरा.

३०८. नव्या संसारांत स्त्री असावी हौशी, xxx रावांचं नांव घेतें मंगलकार्या दिवशीं.

३०९. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वहातात तुळशी, xxx रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या दिवशी.

३१०. अंबाबाईच्या देवळांत सोन्याची आळी, xxx रावांचं नांव घेते संध्याकाळच्या वेळी.

३११. राम बसले रथांत, सीता बसली अंकावर, xxx रावांचं तेज झळके माझ्या कुंकवावर.

३१२. नीलवर्ण आकाशांत चमकतो शशी, xxx रावांचं नांव घेतें संक्रांतीच्या दिवशी.

३१३. कनकाच्या कोंदणांत हिरकणी शोभते, xxx रावांची नि माझी जोडी अशीच खुलून दिसते.

३१४. सोन्याचं तबक झाकतें शालूच्या पदरानं, शीलवती मी xxx रावांचं नांव घेतें विनयानं.

३१५.शोधिली वसुंधरा प्रेमलुब्ध माता, xxx रावांची मी सुशीला कांता.

३१६. उभारला ज्यांनी उत्सव, मैत्रिणी माझ्या हौशी xxx रावांचं नांव घेतें मंगल दिवशी.

३१७.अक्राळ विक्राळ वीर चमकते ढगात .xxx रावांचं नाव घेते धन्य झालें मनांत.

३१८ खोल्यांत खोल्या सात खोल्या , उघडून गेले आंत ,मधल्या खोलीत ताट लाडवानं भरलं काठोकाठ , ताटाला केली खूण xxx रावांचे नांव घेते xxx ची सून.

३१९. तुळशी तुळशी, तूं माझी काशी, वृंदावनी एकादशी,पाणी घालीन गंगेच, विमान येईल महाविष्णूचे, विष्णू तूं गाता, जवळ होती रुक्मीणी माता, तिन सांगितल्या दोन खुणा, आम्ही अज्ञान लेकरुं कृपा करुन चालवावी माय.

३३०. एक पाय घरांत , एक पाय दारांत जडावाचं पदक Xxx रावांच्या हारांत.

३३१. सागवानी पेटीला पोलादी चूक xxx रावांच्या हातांत कायद्याचं बूक.

३३२. शिसवी लाकडांचा देव्हारा त्यांत चांदीची मूर्ति, xxx रावांची देशभक्त म्हणून जगभर कीर्ति.

३३३. काळी चंद्रकळा तिला मोतीचूर पदर xxx रावांच्या जिवावर हळद कुंकवाचा गजर.

३३४. चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा xxx रावांच्या जिवावर मारतें मौजा.

३३५. देवापुढं लावला ऊद, वास सुट्ला छान, Xxx रावांचं नांव घेते ऐका देऊन कान.

शेअर करा

Leave a Comment