Set 1: मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi
‘मराठी असे आमुची मायबोली’ असे कवी माधव जूलियन मोठ्या अभिमानाने सांगतातं आणि तिला राज्यभाषा बनवण्याचे स्वप्न पाहतात. १९६० साली त्या महान कवीचे हे स्वप्न साकार झाले. ‘महाराष्ट्र‘ राज्य निर्माण झाले आणि मराठी ही या महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा झाली.
मातृभूमी आणि मातृभाषा यांबद्दल रास्त अभिमान प्रत्येकालाच असतो. माणूस बहुभाषी झाला, तरी सुखदुःखात त्याच्या मुखातून सहजपणे शब्द उमटतात ते त्याच्या मायबोलीतीलच. परदेशांत अन्य भाषिकांच्या गर्दीत वावरत असताना आपल्या मायबोलीतील शब्द कानांवर पडले, तर सासुरवाशिणीला माहेरचे माणूस भेटावे, तसा आनंद होतो व तो अवर्णनीय असतो.
आमच्या मायबोलीला – मराठीला- थोर प्राचीन परंपरा आहे. नवव्या शतकात मराठीत लिहिलेला शिलालेख ‘ श्रवणबेळगोळ ‘ला आढळतो. तेराव्या शतकात ‘ज्ञानेश्वरी’सारखा तत्त्वज्ञानात्मक काव्यग्रंथ मराठीत लिहिलेला आढळतो. या ग्रंथात ज्ञानदेवांनी मराठीची महती अनेक ओव्यांतून वर्णिली आहे. ‘माझा मराठाचि बोलू कौतुके । अमृतातेही पैजा जिंके।’ असा त्यांना मराठीविषयी सार्थ अभिमान आहे. अनेक थोर कवींनी, संतांनी मराठीचा गौरव केला आहे. इतिहासकालातही मराठीला योग्य ते स्थान लाभले. शिवरायांनी मराठीचा शब्दकोश तयार करवून घेतला. फारसी-अरबी भाषांचे, यावनी भाषेचे आक्रमण मराठीवर झाले; पण मराठी टिकून राहिली.
ज्या भाषेवर आपला पिंड पोसला गेला आहे, त्या आपल्या मायबोलीचे- मराठीचेपांग आपण फेडले पाहिजेत. आपल्या या भाषेच्या समृद्धीसाठी झटले पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठीचा वापर केला पाहिजे, तरच आपल्या मायबोलीचे ऋण आपण अंशतः फेडू शकू.
Set 2: मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी – Marathi Ase Aamuchi Maayboli Nibandh Marathi
पखिआंमध्ये कल्पतरू ।
भासांमध्ये मानु थोरू। मराठियेसी ।।
पक्ष्यांमध्ये मोराला आणि वृक्षांमध्ये कल्पतरूला जो मान आहे तोच सर्व भाषांमध्ये मराठीला आहे. असे फादर स्टीफन्स म्हणतो. या पोर्तुगीज परभाषिकाने मराठीचा केलेला गौरव मराठी भाषिकाला अभिमान वाटणारा आहे. संतांना तर मराठीबद्दल उत्कट अभिमान वाटायचा. महानुभाव पंथाचे सर्व धर्मग्रंथ मराठीत आहेत. एकदा केशवदेवाला वाटले की आपण एक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहावा व विद्वान पंडितांची मान्यता मिळवावी. त्याने नागदेवाचार्यांना आपला ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्याची अनुमती मागितली. याला नागदेवाचार्यांनी नकार दिला. ते म्हणाले की ग्रंथ मराठीतच असावा. श्री. ज्ञानदेवांनी तर माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।’ असे निर्भयपणे सांगून टाकले. अशी ही मराठी मायबोली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
राजारामशास्त्री भागवत आणि काही संशोधक विद्वान असेही सांगतात की कोणे एकेकाळी संपूर्ण भारताची भाषा मराठी हीच होती. असे असेल तर ती मोठी गर्वाची गोष्ट आहे.
मराठी काव्याची प्रभात म्हणता येईल असे शाहिरी वाङ्मय म्हणजे लावण्या व पोवाडे केवळ आहेत.
मराठीतच संस्कृतपेक्षा मला मराठीच अधिक आवडते कारण संस्कृतमध्ये नसलेले ‘ळ’ हे अक्षर मराठीत आहे. संस्कृतसारखा व्याकरणाचा सोस मराठीला नाही. संस्कृतप्रमाणे ती केवळ ग्रंथभाषा नाही. ती एक लोकभाषा म्हणजे जीवंत भाषा आहे. ती जीवंत भाषा आहे म्हणूनच इतर भाषांतील सुंदर सुंदर शब्द तिने आत्मसात केले आहेत. आई, काका, अण्णा तिने कानडीतून घेतले आहेत.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा झाली आहे. पण अजूनही ती उच्चशिक्षणाचे माध्यम बनली नाही ही खंत आहेच. मराठी राजभाषा तर आहेच पण महानुभावपंथाने तिला धर्मभाषाही केले आहे. राघोबादादांनी मराठ्यांचा जरीपटका सतराव्या शतकात अटकेपर्यंत पोचवला पण महानुभावांनी मराठी भाषा त्याच्याही पूर्वी आणि त्याच्याही पलीकडे पोचवली आहे.
कॉर्ल मॉर्क्स इतकेच महत्त्वाचे व प्रखर तत्त्वज्ञान जगापुढे मांडले. ते आहेत. लोकमान्य टिळकांनी आपल्या करारी घोषणेने सारे राष्ट्र गदगदा
महात्मा फुल्यांनी त्यांचे ग्रंथ मराठीत हलवून टाकले. ती त्यांची अमृतघोषणा ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही अस्सल मराठीतली आहे. भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीतूनच दलितांची अस्मिता जागृत केली.
आधुनिक काळात मराठीने जसे जागतिक कीर्तीचे विचारवंत निर्माण केले. तसेच तिने इतिहासातही केले. भारतात एक स्वतंत्र आणि वेगळा इतिहास घडवणाऱ्या स्वराज्यसंस्थापक शिवाजीने आपले आज्ञापत्र मराठीतून लिहवले.
कोकणी, देशी, कोल्हापूरी, सातारी, पुणेरी, खानदेशी, वऱ्हाडी, नागपुरी अशा विविध लोकबोली असलेली मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर आहे. कवी म्हणतो की इंद्राच्या दरबारातील सांडलेल्या अमृतातून मराठी बोल निपजले.
थेंब मातीनं झेलले।
जसं मिरंगाचं पानी वऱ्हाडीच्या (मराठीच्या)। शब्दाइले ।
वास चंदनाच्या वानी।।।
पुढे वाचा:
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध