Mango Information in Marathi : आंबा सर्वांनाच खायला खूप आवडतो. आंबा हे एक बिया असलेले रसाळ फळ आहे. आंबा फळाला फळांचा राजा म्हटले जाते. यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पूर्ण प्रमाणात आढळतात, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ देखील आहे. याशिवाय, हे पाकिस्तान, फिलिपाईन्सचे राष्ट्रीय फळ आहे. यासोबतच हा बांगलादेशचा राष्ट्रीय वृक्षही आहे. आंब्याचे झाड मोठे आणि पसरलेले राहते. त्याची उंची ३० फूट ते ५० फूट असू शकते. त्याची पाने टोकदार व लांबट असतात.
आंबा हे मुळात गोड फळ आहे. उन्हाळ्यात ते जास्त आढळते. बिहारमधील दरभंगा येथे मुघल सम्राट अकबराने एक बाग स्थापन केली होती, ज्यामध्ये त्याने एक लाख आंब्याची झाडे लावली होती, त्यामुळे त्या बागेचे नाव प्रसिद्ध झाले आहे. भारतात आंब्याच्या उत्पादनाबरोबरच ते इतर देशांमध्येही घेतले जातात. हे ब्राझील, मेक्सिको, सोमालिया इत्यादी देशांमध्ये देखील आढळते.
आज आम्ही तुम्हाला आंबा फळाची माहिती मराठी मध्ये देणार आहोत, आंबा झाडाचे वर्णन, आंब्याची पाने, आंब्याची फुले, आंब्याचा रंग, आंब्याची चव, आंब्याचा आकार, आंब्याचे उत्पादन क्षेत्र, आंब्याच्या जाती (प्रकार), आंब्यापासून बनवली जाणारी उत्पादने, आंब्यामध्ये कोणती जीवनसत्त्व असतात, आंबा खाण्याचे फायदे, आंबा खाण्याचे तोटे, आंब्याचे इतर उपयोग इत्यादी माहिती देणार आहोत.
आंबा फळाची माहिती मराठी – Mango Information in Marathi
मराठी नांव | आंबा |
इंग्रजी नांव | Mango (मँगो) |
हिंदी नाव | आम |
शास्त्रीय नांव | Mangiferaindica (मॅजिफेरा इंडिका) |
मौसम | एप्रिल ते जून |
आयुष्य | १०० वर्षाहून अधिक |
जाती | भारतात जवळपास १३०० |
उंची | साधारणपणे ३५ ते ५० मीटर |
आंबा झाडाचे वर्णन
आंब्याला फळांचा राजा संबोधतात. आंब्याच्या झाडाची उंची साधारणत: तीस ते पन्नास फूट असते. या झाडाचे आयुष्य किमान शंभर वर्षे असते. चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या झाडाला पाच ते सहा वर्षांनंतर फळे येतात.
आंब्याची पाने
आंब्याची पाने पाच-सहा इंच लांब असतात. पानांचा रंग हिरवा असतो.
आंब्याची फुले
आंब्याच्या झाडांना येणाऱ्या फुलांना ‘मोहोर’ म्हणतात. आंब्याचा हंगाम वैशाख महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत असतो.
आंब्याचा रंग
कच्च्या फळाचा रंग हिरवा असून, त्याला कैरी म्हणतात. कैरी पिकल्यानंतर केशरी, पिवळा, लालसर रंगाचा आंबा होतो.
आंब्याची चव
कच्चे आंबे आंबट लागतात. पिकल्यावर गोड किंवा आंबट-मधुर लागतात.
आंब्याचा आकार
आंब्याचा आकार गोल व लांबट असतो, काही आंबे लहान, तर काही खूप मोठे असतात.

आंब्याचे उत्पादन क्षेत्र
महाराष्ट्रात कोकण व गुजरातमध्ये आंब्याचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
आंब्याच्या जाती (प्रकार)
हापूस, पायरी, लालबाग, केसरी, तोतापुरी, रत्ना, बोरशा, लंगडा, कलमी, निलम, राजापुरी, देवगड अशा आंब्यांच्या विविध जाती आहेत.
आंब्याची जात | लागवडीचा प्रदेश |
---|---|
हापूस | महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू |
पायरी | महाराष्ट्र, कर्नाटक |
कावसजी पटेल | महाराष्ट्र |
जमादार | गुजरात |
लंगडा, दशेरी, सफेदा, फझरी, चौसा, तौमुरीया | उत्तरप्रदेश |
हेमसागर, कृष्णभोग, सिंदुराय, सुकाल | बिहार |
रुमाली, नीलम, बेनिशान, तोतापुरी, मलगोवा, गोवाबंदर | आंध्रप्रदेश |
मडप्पा, पीटर फर्नोदिन | कर्नाटक |
माकुरांद | गोवा |
आंब्यापासून बनवली जाणारी उत्पादने
- जाम, जेली, आंब्याचा रस, स्वादिष्ट पेये तयार करण्यासाठी आंब्याचा उपयोग करतात.
- कैरीपासून लोणची, पन्हे तयार करून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
- आंब्याच्या रसाच्या वड्या, आंबापोळी, आम्रखंड अशी विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
आंब्यामध्ये कोणती जीवनसत्त्व असतात
आंब्यामध्ये ‘ए’ व ‘सी’ जीवनसत्त्वे असतात.
आंबा खाण्याचे फायदे
पिकलेले आंबे खाल्ल्याने शरीराची त्वचा सुंदर व तेजस्वी होते. तसेच पचनशक्ती सुधारते व उत्साह वाढतो.
आंबा खाण्याचे तोटे
- कच्ची कैरी खाल्ल्याने पोटाचे रोग व नेत्ररोग होतात.
- खोकला येतो.
आंब्याचे इतर उपयोग
- आंबा पाचक, शक्तिवर्धक व पूरक आहार म्हणून उपयोगी आहे.
- नाकातून रक्त येणे, अंडवृद्धी, कफनाशक, न्यूमोनियामध्ये लेप देण्यासाठी, अतिसार, मोडशी, जंत, प्रदर यांवर आंब्याची कोय उपयोगात आणतात.
- आंबा भाजून, शिजवून त्याचा रस काढून, अंगाला लावल्यास घामोळ्या जातात, दाह व अतिसार, उपदंशावर आंब्याची साल गुणकारी औषध आहे.
- विविध कार्यक्रमांत शुभकार्याच्या वेळी आंब्याच्या पानांचे तोरण करून बांधतात.
अजून वाचा :
- आंबा फळाची माहिती
- सफरचंद फळाची माहिती
- द्राक्ष फळाची माहिती
- केळी फळाची माहिती
- अननस फळाची माहिती
- पपई फळाची माहिती
- पेरू फळाची माहिती
- सीताफळ माहिती
- रामफळ माहिती
- जांभूळ फळाची माहिती
- डाळिंब माहिती मराठी