मानवाधिकार म्हणजे काय? – मानवाधिकार निबंध मराठी – Manavadhikar Nibandh Marathi
प्रत्येक माणूस जन्माने मिळालेल्या कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा गुलाम असतो. त्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी कुठलाही अडथळा न येता संधी मिळणे ह्यालाच मानवाधिकार असे म्हटले जाते. खरे तर प्रत्येक माणूस जन्माला येताना स्वतंत्र म्हणूनच जन्माला येतो परंतु पुढील आयुष्य मात्र ते स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. संघर्ष हीच मानवाची नियती आहे. म्हणूनच तर भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला गर्जून सांगितले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
समाजातील प्रत्येक माणसाला मूलभूत, सामाजिक आणि राजकीय अधिकार किती मिळतात त्यावरून त्या समाजाच्या विकासाची स्थिती समजून घेता येते.
मानवाधिकार म्हणजे ‘राष्ट्रीयत्व, राहाण्याचे ठिकाण, लिंग, वंश, धर्म, वर्ण किंवा अन्य कुठल्याही वर्गीकरणावरून भेदभाव न करता जगातील सर्व मानवांना असलेले समान अधिकार’. ह्याचाच अर्थ मानवाधिकार हे संपूर्णपणे निःपक्षपाती असतात, सर्वमानवांना त्यांचा अधिकार असतो आणि कुठल्याही मानवाला त्या अधिकारांपासून वंचित ठेवता येत नाही. परंतु कित्येक राष्ट्र आणि व्यक्ती दुस-या व्यक्तींच्या ह्या अधिकारांची पायमल्ली करतात आणि त्यांची पिळवणूक करतात.
युनो किंवा संयुक्त राष्ट्रसंघटनेने केलेली मानवाधिकारांची यादी आणि थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
नागरी अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत जीवन जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे तीन अधिकार येतात.
राजकीय अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत कायद्याचे संरक्षण मागण्याचा अधिकार आणि कायद्यासमोर सर्व समान असल्याचा अधिकार हे अधिकार येतात.
आर्थिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत काम करण्याचा अधिकार, मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा अधिकार आणि समान कामाला समान वेतनाचा अधिकार हे अधिकार येतात.
सामाजिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत शिक्षणाचा अधिकार आणि स्वतःच्या संमतीने विवाह करण्याचा अधिकार येतो.
सांस्कृतिक अधिकार : ह्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्या सांस्कृतिक समुदायात मोकळेपणाने सहभाग घेण्याचा अधिकार येतो.
भारतातील लोकशाहीने वरील सर्व अधिकार आपल्या सर्व नागरिकांना बहाल केले आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त भारताने आपल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्यही बहाल केले आहे.
गुलामगिरी, वेठबिगारी तसेच मुलामुलींना पळवून विकणे आणि वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी आदी उद्योगात त्यांचा वापर करणे हे मानवी अधिकारांचा विरूद्ध आहे आणि तो शिक्षापात्र गुन्हाही आहे. .
अशा त-हेनं मानवाधिकार हे फार महत्वाचे आहेत. जगात सर्वत्र जेव्हा नेपाळले जातील तेव्हा ह्या धरतीवर जणू स्वर्गच अवतरेल.
पुढे वाचा:
- माणुसकी निबंध मराठी
- माणसे अमर झाली तर मराठी निबंध
- माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी