मला पंख फुटले तर निबंध मराठी | Mala Pankh Futle Tar Nibandh

Set 1: मला पंख फुटले तर निबंध मराठी – Mala Pankh Futle Tar Nibandh

आकाशात उंच भरारी मारणारे पक्षी, त्यांचा चाललेला पाठशिवणीचा काय खेळ, सारे पाहिले की, असे वाटते की मला पक्ष्यांप्रमाणे पंख फुटले तर… बहार येईल! मौजच मौज! माझ्या आनंदाला पारा उरणार नाही.

इकडून मला पंख फुटले तर, मी खूप खूप उंच भरारी मारेन. पतंगाप्रमाणे आकाशात तिकडे गिरक्या मारेन. गरूड, घार इत्यादी पक्षांबरोबर पाठशिवणीचा खेळ खेळताना तर किती मज्जा येईल! सारेच माझ्याकडे अचंबित होऊन पाहतील. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ‘पक्ष्यांप्रमाणे झेपावणारा मुलगा’ या शीर्षकाखाली बातमी येईल. मग काय जाईल तिकडे माझीच चर्चा. कोणी म्हणेल नव्या युगातील वीर हनुमान’ तर कोणी म्हणेल ‘स्पायडर मॅन’.

मला पंख फुटले तर शाळेला जाताना सायकल थोडीच न्यावी लागणार! पक्ष्यांप्रमाणे सुर्रकन उडत येऊन शाळेत दाखल होईन. वाटेत भेटणाऱ्या मित्रांना कोंबडीच्या पिलाप्रमाणे पायात पकडून त्यांना शाळेत आणून सोडेन. शाळेत गेल्यावर सारे मित्र माझ्याच भोवताली गोळा झालेले असतील. त्यांना मी आकाशात झेपावताना उंच भरारी मारताना येणारे चित्तथरारक अनुभव सांगेन.

सुटीत मामाच्या गावी जायला वाहन थोडेच लागणार! त्यामुळे पेट्रोलची बचत. पैशाची बचत आणि प्रदूषणापासून सर्वांची मुक्तता. हे सारे तेव्हा घडेल, , जेव्हा मला पंख फुटतील.

Set 2: मला पंख फुटले तर निबंध मराठी – Mala Pankh Futle Tar Nibandh

अहाहा! किती गंमत येईल मला पंख फुटले तर… पंख फुटल्यावर सर्व कामे भराभर व सर्वांच्या आधी होतील! व मी नेहमी खेळण्यासाठी मोकळा राहीन. पंख फुटल्यावर माझे शाळेत जाण्याचे काम लवकर होईल. तेव्हा बसची वाट पाहात व गर्दीत जाण्याचे काम राहणार नाही. शाळा सुटल्यावरही घरी लवकर येता येईल.

आईन जर बाजारातून काही सामान व भाजी आणायला सांगितली तर मी पटकन आणून देईन म्हणजे आईचे पण काम लवकर होईल. पंख असतील तर मला माझ्या मामाकडे वरचेवर जाता येईल व त्यांना भेटून परत येता येईल. पक्षाप्रमाणे आकाशात भरारी मारता येईल व कोठेही जाता येईल. झाडावरील फुले व फळे यांचा आनंद घेता येईल. कोणत्याही गावाला जाताना बस किंवा रेल्वेची गरज राहणार नाही. त्यामुळे तिकिटाचे पैसेही वाचतील व मनाप्रमाणे कोठेही थांबता येईल. मला पंख फुटले तर विमानाने प्रवास करण्याचे माझ्या मनात येणार नाही. पंख असल्यामुळे निरोप लवकर पाठवता येईल. त्यामुळे टेलीफोनची आवश्यकता राहणार नाही.

पण पंख फुटले तर जितके फायदे होतील तितके तोटे पण होतील. जसे सपिक्षा माझ्या अंगावर पंख फुटलेले पाहून सर्व मुले मला हसतील. पंखाला हात लावतील. दुसरे म्हणजे मला कोणीही कधीही कोणतेही काम सांगतील. त्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होईल व त्यांचे काम केले नाही तर त्यांना राग येईल.

मला पंख फुटले तर निबंध मराठी – Mala Pankh Futle Tar Nibandh

पुढे वाचा:

Leave a Comment