Makar Sankranti Information in Marathi: मकरसंक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे चौदा जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते. राशी बारा आहेत. सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात; पण मकर आणि कर्क राशींचे संक्रमण विशेष महत्त्वाचे असते. सूर्य मकर राशीत जातो, तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे मकरसंक्रांत.

मकरसंक्रांत माहिती मराठी-Makar Sankranti Information in Marathi
मकरसंक्रांत माहिती मराठी, Makar Sankranti Information in Marathi

आर्य लोक प्रथम ध्रुवप्रदेशात राहत होते, असे मानले जाते. तेथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतो. तेव्हा रात्र संपल्यानंतर येणारा सूर्याचा पहिला किरण म्हणजे माणसाला देवाची कृपाच वाटली असेल. म्हणून तेव्हा वर्षाची सुरुवात मकरसंक्रांतीला होत असे. नंतर ही वर्षाची सुरुवात पुढे ढकलली गेली.

त्या काळी संक्रांत ही श्राद्धतिथीही असे. कारण सहा महिन्यांच्या रात्रीमुळे राहून गेलेली श्राद्धे या दिवशी होत.

मकरसंक्रांत माहिती मराठी – Makar Sankranti Information in Marathi

2022 मध्ये मकर संक्रांत कधी आहे?

पंचांगानुसार 2022 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला शुक्रवारी साजरा केला जाईल.

मकरसंक्रांतीचा इतिहास

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतिदेवी असे म्हटले जाऊ लागले. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून एका दिशेकडून दुसर्‍या दिशेकडे जाते असे मानतात. ही माहिती पंचांगात दिलेली असते. या संक्रांतिदेवीचे वर्णन असे करतात की, ती साठ योजने पसरली आहे. तिचे ओठ आणि नाक लांबलचक असतात. तिला नऊ हात असतात. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, शस्त्र, वय, नाव वगैरे वेगवेगळे असते.

उदाहरणार्थ – एका वर्षी संक्रांतीचे वाहन हत्ती, उपवाहन गाढव आहे. तिने पांढरे वस्त्र नेसले आहे. हातात धनुष्य आहे. वयाने प्रौढ असून बसलेली आहे. हातात वासासाठी बेलाचे फूल आहे. दूध पिते आहे. गोमेद रत्न घातले आहे. वार नाव नंदा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्येकडे पाहते आहे असे वर्णन असते. असे मानतात की, संक्रांत ज्या वस्तूंचा वापर करते त्यांचा नाश होतो किंवा त्या महाग होतात. संक्रांत ज्या दिशेकडून येते तिथे सुख, समृद्धी असते. जिकडे जाते आणि जिकडे पाहते तिकडे उत्पात, नाश होतो.

स्नान आणि दानाचे महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच त्या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी खिचडी दान करणे पुण्यकारक मानले जाते.

मकर संक्रांतीचे महत्त्व

मकर संक्रांतीचा सणही देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मकर संक्रांतीला सूर्यदेव उत्तरायण करतात. मान्यतेनुसार ऋतूतील बदल या दिवसापासून सुरू होतो. मकर संक्रांतीपासून हिवाळा कमी होऊ लागतो, म्हणजे शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतुचे आगमन सुरू होते. मकर संक्रांतीनंतरच दिवस लांब रात्र लहान होऊ लागतात.

मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त

मकर संक्रांती पुण्यकाळ – 02:43 PM ते 05:45 PM
कालावधी – 03 तास 02 मिनिटे
मकर संक्रांती महा पुण्य काळ – 02:43 PM ते 04:28 PM
कालावधी – 01 तास 45 मिनिटे

मकर संक्रांतीची पूजा कशी करावी?

  • जे लोक हा खास दिवस पाळतात ते आपल्या घरी मकर संक्रांतीचे पूजन करतात. या दिवसाची उपासना पद्धत खाली दर्शविली आहे-
  • सर्वप्रथम, पूजा सुरू करण्यापूर्वी, पुण्य काल मुहूर्ता आणि महा पुण्य काल मुहूर्ता घ्या आणि आपल्या पूजेचे स्थान स्वच्छ व शुद्ध करा. तसे, ही पूजा भगवान सूर्यासाठी केली जाते, म्हणून ही पूजा त्याला समर्पित आहे.
  • यानंतर, 4 काळ्या आणि 4 पांढऱ्या मॅचस्टिकच्या लाडू एका प्लेटमध्ये ठेवल्या जातात. याबरोबर प्लेटमध्ये काही पैसेही ठेवले आहेत.
  • यानंतर प्लेटमध्ये पुढील घटक म्हणजे तांदळाचे पीठ आणि हळद यांचे मिश्रण, सुपारी, सुपारी, जाळी, फुले व धूप.
  • यानंतर, काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे मॅचस्टिकची एक प्लेट, काही पैसे आणि मिठाई परमेश्वराला अर्पण केल्या जातात.
  • भगवान सूर्याला हा प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याची आरती केली जाते.
  • पूजेच्या वेळी महिला आपले डोके झाकून ठेवतात.
  • यानंतर सूर्य मंत्र ‘ओम हरम ह्रीं ह्रम सहं सूर्य सूर्य नमः’ किमान 21 वा 108 वेळा पठण केला जातो.
  • या दिवशी पूजेच्या वेळी काही भाविक 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात किंवा परिधान करतात. या दिवशी रुबी रत्न देखील साजरा केला जातो.

मकरसंक्रांत कशी साजरी करतात

स्त्रिया या दिवशी मातीची पाच मडकी घेऊन त्यांत तीळ, भुईमूगाच्या शेंगा, उसाचे करवे, कापूस, हळद-कुंकू वगैरे घालून एकमेकींना वाण देतात. या मडक्यांना सुगड असे म्हणतात. सुगड म्हणजे ‘सुघट’. तसेच या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत एकमेकांना तिळगूळ अगर हलवा देऊन ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणावे व परस्परांत स्नेह वाढवावा अशी कल्पना आहे.

नवीन जन्मलेल्या मुलाला व नवीन लग्न झालेल्या नववधूला या दिवशी हलव्याचे दागिने करून घालतात व नववधूच्या हस्ते सुवासिनींना वाण देतात. या दिवशी नदीवर अगर समुद्रावर जाऊन स्नान करावे व तिळा-तांदळाचा नैवेद्य दाखवावा, अशी पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवसांमध्ये शरीरस्वास्थ्य राखण्यासाठी काही प्रथा पाडल्या आहेत.

जानेवारीत थंडीचे दिवस असतात, तेव्हा मुगाची डाळ व तांदूळ यांची खिचडी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी व लोणी असे पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे पदार्थ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला करतात. तसेच थंडीमुळे कोरडी झालेली त्वचा मऊ व्हावी म्हणून तीळ वाटून अंगाला लावतात. तीळ व गूळ यासारखे स्निग्ध व गोड पदार्थ या दिवसांत शरीराला पोषक असतात. कोकणात घावन-घाटले करतात. काही ठिकाणी खीर करतात, तर काही ठिकाणी गुळाच्या पोळ्या आणि कणीदार तूप असा महाराष्ट्रात संक्रांतीचा खास बेत असतो. हलवा, तिळाच्या वड्या व लाडू करतात. बंगालमध्ये काकवीत तीळ घालून ‘तिळुवा’ नावाचा पदार्थ करतात.

संक्रांतीचा सण खरा तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. किंक्रांतीच्या दिवशी वर्षाच्या आतल्या मुलांना बोरनहाण घालतात. म्हणजे त्याच्या डोक्यावर बोरे घालतात व या कार्यक्रमाला इतर लहान मुलांना बोलावतात.

मकरसंक्रांतीची आणखी एक गंमत म्हणजे पतंग उडवण्याचा खेळ! मुंबईसारख्या शहरात अनेक मुले, मोठी माणसे घराच्या गच्चीतून, गॅलरीतून, मैदानातून दिवसभर पतंग उडवतात. काही ठिकाणी पतंग उडवण्याच्या किंवा कागदाचे मोठेमोठे पतंग तयार करण्याच्या स्पर्धाही होतात.

निसर्गात होणारे बदल, धार्मिक व्रत, तसेच सामाजिक उत्सव या तीनही गोष्टींचा मिलाफ मकरसंक्रांतीच्या उत्सवात होतो.

संक्रातीच्या या स्नेहवर्धक सणाचे आणखी एक आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या दिवसांत इष्टमित्र, नातेवाईक हे दूरदूर अंतरांवर राहतात व तिळगुळांसाठी प्रत्यक्ष भेट शक्य असत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टपालामार्फत शुभेच्छादर्शक पत्रे पाठवली जातात. सध्याच्या संगणक युगात कागदावरील शुभेच्छांची जागा ई-मेलने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत हलवा, तिळगुळाचे दोन-चार दाणे तरी पाठवले पाहिजेत या भावनेमुळे अजून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छापत्रे संक्रांतीस पाठवली जातात.

मकर संक्रांती २०२२ संपूर्ण माहिती मराठी मध्ये, Makar Sankranti 2022

पुढे वाचा:

प्रश्न. १ सन 2022 मकरसंक्रांत कधी आहे?

उत्तर- 14 जानेवारी 2022, शुक्रवार रोजी

प्रश्न.२ मकरसंक्रांत कशाला म्हणतात?

उत्तर- दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांतीचा सण येतो. या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो. म्हणून या दिवसाला ‘मकरसंक्रांत’ म्हणतात.

कीबोर्ड म्हणजे काय? । What is Keyboard in Marathi

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय? । What is Oral Cancer in Marathi

इन्व्हर्टर म्हणजे नक्की काय । What is Inverter in Marathi

होळी म्हणजे काय? | What is Holi in Marathi

कोणत्या हिंदू महिन्यात होळी साजरी केली जाते? | In Which Hindu Month is Holi Celebrated in Marathi

होळी दहन का साजरा केला जातो? | Why is Holi Dahan Celebrated in Marathi

भगत सिंग माहिती मराठी | Bhagat Singh Information in Marathi

अण्णाभाऊ साठे यांची माहिती | Annabhau Sathe Information in Marathi

जंजिरा किल्ला माहिती मराठी | Janjira Fort Information in Marathi

सेक्स म्हणजे काय आहे | Sex Information in Marathi

Leave a Reply