Set 1: महागाई एक समस्या मराठी निबंध – Mahagai Ek Samasya Nibandh Marathi
महागाई ही नेहमीच वाढत असते. आपले उत्पन्न आणि आपला खर्च ह्यांचा मेळ घालणे म्हणूनच फार अवघड जात असते. अशी कशी आहे ही महागाई? जी माणसाला त्याच्या मनासारखा खर्च करू देत नाही?
गेल्या वर्षीपर्यंत शंभर रूपयांना मिळणारी तूरडाळ आज अडीचशे रूपये दराने विकली जात आहे. चहा पावडर तर ब-याच पूर्वीपासून चारशे रूपये किलो झाली आहे. खरोखरच, सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातील सर्वच गोष्टी भयंकर महागल्या आहेत. महागाई ही सा-या जगातील एक फार मोठी समस्या आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी विकसित देशांना तुलनेने महागाई कमी प्रमाणात भेडसावत असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात मात्र तिने भीषण स्वरूप धारण केले आहे.
पैशाची किंमत घसरल्यामुळे महागाई वाढते. कित्येक माणसे केवळ अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागाव्यात म्हणून राब राब राबत असतात तरी त्या गरजा जेमतेम पूर्ण होतील एवढेच पैसे त्यांना मिळतात. प्रत्येक वस्तूची किंमत गगनाला भिडल्यासारखे वाटते. महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत असला तरी त्याची झळ गरीबांना आणि असंघटित वर्गाला अधिक सोसावी लागते.
महागाई एवढी का झाली आहे आणि ती दिवसेंदिवस का वाढते आहे ह्यामागे बरीच कारणे आहेत. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे उत्पादन आणि मागणीत प्रचंड तफावत आहे. त्यातच भर म्हणजे आपल्या देशात रोजच्या वापरातील वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. ज्या उत्पादनामुळे अधिक नफा मिळतो तिथेच उत्पादक पैसे लावतात.
आपला भारत शेतीप्रधान देश आहे. मौसमी पावसावर शेतीचे उत्पादन अवलंबून असते त्यामुळे वेळेवर पाऊस पडला तर ठीक, अन्यथा उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही उत्पादनावर विपरित परिणाम होतो. त्याशिवाय काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी ह्यांचाही महागाईशी थेट संबंध आहे. ह्यामुळे धान्य आणि इतर वस्तू बाजारातून अदृश्य होतात आणि गोदामात लपवून ठेवल्या जातात. बाजारात त्या वस्तूची चणचण निर्माण झाली की भाव वाढतात. भाव वाढले की व्यापारी तीच वस्तू बाजारात आणतात. त्यातच भर म्हणून भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थाही खूप सदोष आहे. दारिद्यरेषेखालील लोकांनाही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळत नाही. तेच धान्य दुकानदार खुल्या बाजारात चढ्या दराने विकतो.
शिवाय भारताची लोकसंख्या वाढत आहे. जिवंत असलेल्या लोकांची आयुर्मर्यादाही वाढत आहे. त्यामुळे आपोआपच महागाई वाढते. महागाईमुळे कनिष्ठ आणि मध्यम वर्गाचे हाल होतात, भ्रष्टाचार, दंगे ह्यांना आमंत्रण मिळते. देशाच्या विकासात खीळ बसते.
महागाईच्या राक्षसाला काबूत आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. केवळ कायदे करून काहीही होणार नाही. सरकारी खर्चात कपात करणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे. काळा बाजार करणा-यांविरूद्ध आणि साठेबाजांविरूद्ध कडक कारवाई करणे, भ्रष्टाचार रोखणे, उत्पादनवाढीवर भर देणे, शेतीसाठी पूरक सोयी निर्माण करणे, पूर आणि दुष्काळ नियंत्रणासाठी ठोस पावले उचलणे हे सगळे जर झाले तर महागाईचा राक्षस नक्कीच काबूत येईल असा मला विश्वास वाटतो.

Set 2: महागाईचा भस्मासूर मराठी निबंध – Mahagai Cha Bhasmasur in Marathi
गेल्या वर्षीपर्यंत शंभर रूपयांना मिळणारी तूरडाळ आज अडीचशे रूपये दराने विकली जात आहे. चहा पावडर चारशे रूपये किलो झाली आहे. खरोखरच, सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातील सर्वच गोष्टी भयंकर महागल्या आहेत. काय करावे ते समजेनासे झाले आहे.
महागाई ही सा-या जगातील एक फार मोठी समस्या आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी विकसित देशांना तुलनेने महागाई कमी प्रमाणात भेडसावत असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात मात्र तिने भीषण स्वरूप धारण केले आहे. पैशाची किंमत घसरल्यामुळे महागाई वाढते. कित्येक माणसे केवळ अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागाव्यात म्हणून राब राब राबत असतात तरी त्या गरजा पूर्ण होतील अशी खात्री नसते. प्रत्येक वस्तूची किंमत गगनाला भिडल्यासारखे वाटते.महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत असला तरी त्याची झळ गरीबांना आणि असंघटित वर्गाला अधिक सोसावी लागते.
महागाई एवढी का झाली आहे आणि ती दिवसेंदिवस का वाढते आहे ह्यामागे बरीच कारणे आहेत. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे उत्पादन आणि मागणीत प्रचंड तफावत आहे. त्यातच भर म्हणजे आपल्या देशात रोजच्या वापरातील वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. ज्या उत्पादनामुळे अधिक नफा मिळतो तिथेच उत्पादक पैसे लावतात.
आपला भारत शेतीप्रधान देश आहे. मौसमी पावसावर शेतीचे उत्पादन अवलंबून असते त्यामुळे वेळेवर पाऊस पडला तर ठीक, अन्यथा उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही उत्पादनावर विपरित परिणाम होतो. त्याशिवाय काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी ह्यांचाही महागाईशी थेट संबंध आहे. ह्यामुळे धान्य आणि इतर वस्तू बाजारातून अदृश्य होतात आणि गोदामात लपवून ठेवल्या जातात. बाजारात त्या वस्तूची चणचण निर्माण झाली की भाव वाढतात. भाव वाढले की व्यापारी तीच वस्तू बाजारात आणतात. त्यातच भर म्हणून भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थाही खूप सदोष आहे. त्यामुळे दारिद्यरेषेखालील लोकांनाही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळत नाही. तेच धान्य दुकानदार खुल्या बाजारात चढ्या दराने विकतो.
शिवाय भारताची लोकसंख्या वाढत आहे. जिवंत असलेल्या लोकांची आयुर्मर्यादाही वाढत आहे. त्यामुळे आपोआपच महागाई वाढते. महागाईमुळे कनिष्ठ आणि मध्यम वर्गाचे हाल होतात, भ्रष्टाचार, दंगे ह्यांना आमंत्रण मिळते. देशाच्या विकासात खीळ बसते.
महागाईच्या राक्षसाला काबूत आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. केवळ कायदे करून काहीही होणार नाही. सरकारी खर्चात कपात व्हावी. कुठेही वायफळ खर्च होत नाही ना, हे डोळ्यात तेल घालून पाहिले जावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायला हवी. काळा बाजार करणा-यांविरूद्ध आणि साठेबाजांविरूद्ध कडक कारवाई करायला हवी. भ्रष्टाचार रोखायला हवा. उत्पादनवाढीवर भर दिला जायला हवा. शेतीसाठी पूरक अशा सोयी दिल्या जायला हव्यात. पूर आणि दुष्काळ नियंत्रणासाठी ठोस पावले उचललीजायला हवीत.
हे सगळे जर झाले तर महागाई काबूत येणार नाही असे होणे शक्यच नाही.
पुढे वाचा:
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध