कच्चा मसाला रेसिपी मराठी – Kaccha Masala Recipe in Marathi

कच्चा मसाला रेसिपी साहित्य :
अर्धी वाटी धने, पाव वाटी जिरे, दोन चमचे शहाजिरे, दहा ते बारा लवंगा, दालचिनीचे बोटभर लांबीचे दोन-तीन तुकडे.
कच्चा मसाला रेसिपी कृती :
हे सर्व जिन्नस उन्हात ठेवून चांगले वाळल्यावर बारीक कुटावेत व मिसळून मसाला तयार करावा. हा मसाला आयत्या वेळीच तयार करून घ्यावा. ह्या मसाल्यामुळे एक वेगळा स्वाद येतो व तो विशेषतः खिचडी, मसालेभात, रस्सा वगैरे पदार्थांकरिता वापरतात.
पुढे वाचा: