Jujubes Information in Marathi : बोर हे भारत आणि चीनमधील प्राचीन लोकप्रिय फळ आहे. हे Rhamnaceae कुटुंबातील आहे आणि Ziziphus वंशातील आहे. बोर या फळाचा उगम बहुधा दक्षिण चीन, भारत आणि मलायामध्ये झाला असावा. या वंशात सुमारे ५० प्रजाती आहेत, त्यापैकी सुमारे १८-२० भारतात आढळतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून केवळ काही प्रजाती उपयुक्त आहेत.
बोर फळाबद्दल माहिती – Jujubes Information in Marathi
इंग्रजी नाव : | Jujubes |
हिंदी नाव : | बेर |
शास्त्रीय नाव : | Zizyphus Jujuba |
- बोर फळाबद्दल माहिती : बोर हे फळ मूळ भारतातील आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात बोराचा उल्लेख आढळतो. बोर हे अत्यंत काटक फळ असून, त्याचे झाड निकृष्ट जमिनीत उष्ण व कोरड्या भागात येऊ शकते.
- बोर झाडाचे वर्णन : बोराचे झाड पंधरा ते वीस फुटांपर्यंत वाढते. या झाडाला टोकदार काटे असतात. काही बोरांच्या झाडाला अजिबात काटे नसतात. बोराच्या झाडाला हिरवी व पिवळी फुले येतात. शेताच्या बांधावर, ओढ्या-नाल्याच्या कडेला बोराची झाडे आपोआप उगवलेली आढळतात.
- बोराची पाने : बोराची पाने आकाराने लहान व खडबडीत पृष्ठभाग असणारी असतात.
- रंग : कच्ची बोरे हिरव्या रंगाची असतात. पिकल्यानंतर पिवळसर, फिकट लालसर होतात.
- आकार : बोराचा आकार गोल किंवा लंबगोल असतो.
- बोराचे उत्पादन क्षेत्र : चीन, आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या फळांचे उत्पादन होते.
- बोराच्या जाती: कौल बोर आणि सौवीर बोर अशा बोराच्या दोन जाती आहे. तसेच लवकर फळ येणाऱ्या जाती गोला, सफेदा, सेब, संधुरा, नरोल या आहेत.
- कैथाली, सनूर नं. ५, रश्मी, मुरिया, उमराण, पोंडा, काढफळ, ५ इलायची, मेहरूण या बोराच्या जाती आहेत.
- जीवनसत्त्व : बोरामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वेही असतात.
- सफरचंदाची व बोराची तुलना केल्यास बोरामध्ये सफरचंदापेक्षा प्रथिने, क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटिन अधिक प्रमाणात असतात.
- उत्पादने : बोरांपासून बोरकूट पावडर तयार करतात. बोराच्या मुळ्यांचा अर्क काढून त्याचा वापर ताप व वात यांवर करतात.
- बोराचा उपयोग : बोराच्या झाडापासून पाल्याचा चारा, जळण व कुंपणासाठी लाकूड मिळते. बोराची वाळलेली पाने बारीक चाऱ्यात मिसळून गुरांना चांगला सकस चारा मिळतो. बोराचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी व बांधकामासाठी वापरतात. बोराची पाने व साल यात टॅनिन हे द्रव्य असते; त्यामुळे कातडी कमविण्याच्या धंद्यात त्याचा चांगला उपयोग होतो. अतिसारावर बोराची साल उपयुक्त आहे. बोरामुळे रक्तशुद्धी होते व पचनक्रियेत १ सुधारणा होते.
- बोराची साठवण व विक्री : बोर हे लवकर नाश पावणारे फळ असल्याने, त्याची साठवण व विक्री करताना काळजी घ्यावी लागते. बोरांची विक्री वजनावर करतात.
- बोराचे फायदे : बोरे खाल्ल्याने मलावरोध दूर होतो.
- बोराचे तोटे : जास्त प्रमाणात बोराचे सेवन केल्यास खोकला येतो.
निष्कर्ष
वरील बोर फळाबद्दल माहिती मराठी वाचून आपल्याला बोर खाण्याचे फायदे आणि बोर खाण्याचे तोटे या लेखातून आपल्याला समजले असेलच. Jujubes Information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मेडिया शेअर करा. तसेच Information About Jujubes in Marathi हा लेख कसा वाटला व अजून बोराबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.
Jujubes in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली बोरा विषयी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.
अजून वाचा :