जांभूळ फळाची माहिती | Jambhul Information in Marathi

Jambhul Information in Marathi : जांभूळ दिसायला काळे आणि लहान असते, मग काय झाले, आयुर्वेदानुसार जांभूळ फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या औषधी गुणधर्मांमुळे जांभूळाचे अनेक फायदे आहेत. जांभूळ देखील उन्हाळ्यात आंब्याच्या आगमनाच्या वेळी येते.

आयुर्वेदात जांभूळ हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच अन्न पचवण्यासोबतच दातांसाठी, डोळ्यांसाठी, पोटासाठी, चेहऱ्यासाठी, किडनी स्टोनसाठीही बेरी फायदेशीर आहेत. जांभूळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स देखील असतात, त्यामुळे ते मुलांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. चला जाणून घेऊया जांभूळाचे गुणधर्म आणि फायदे.

जांभूळ फळाची माहिती-Jambhul Information in Marathi
जांभूळ फळाची माहिती, Jambhul Information in Marathi

जांभूळ फळाची माहिती – Jambhul Information in Marathi

इंग्रजी नाव : Jambul Blackplum
हिंदी नाव : जामुन
शास्त्रीय नाव : Ujenia Jambolina
 • जांभूळ झाडाचे वर्णन : जांभळाची झाडे सर्वत्र वाढतात. जांभळाच्या झाडाचा रंग फिक्कट व भुरकट असतो. साल खडबडीत असते. जांभळाचे झाड ४० फुटांपासून ८० फुटांपर्यंत वाढते. चैत्र-वैशाखात जांभळाच्या झाडांना फळे येतात.
 • जांभूळ झाडाची पाने : जांभळाची पाने बकुळीच्या पानासारखी असतात. पानांचा आकार लांबट असून, ती जाड व सुगंधी असतात. पानांपासून तेल काढले जाते. ते औषधी असते.
 • जांभूळ झाडाची फुले : जांभळाची फुले पांढऱ्या रंगाची असून, फार नाजूक असतात. फुलांचे गुच्छ पाहून मन सुखावते.
 • जांभूळाचे फळ : जांभळाची फळे चैत्र-वैशाखात येतात. फळात एकच बी असते.
 • जांभूळ चव : जांभळाची चव गोड, थोडीशी आंबट व तुरट असते.
 • जांभूळ रंग : बाहेरून काळसर जांभळ्या रंगाची फळे आतून लाल तांबूस असतात.
 • आकार : जांभळे लहान किंवा मोठी गोलाकार किंवा लंबगोलाकार असतात.
 • जांभूळाचे उत्पादन क्षेत्र : जांभळाचे झाड महाराष्ट्रात सगळीकडे आढळते.
 • जांभूळाची उत्पादने : जांभळाच्या रसापासून आसव व सरबते बनवितात.
 • जांभूळाच्या जाती : राज जांभूळ व शूद्र जांभूळ अशा दोन जाती आहेत. गुलाब जांभूळ दिसण्यास अतिशय सुंदर व गुणांनी श्रेष्ठ असते. गुलाब जांभूळ बीविरहित, गुलाबी रंगाचे व गोलाकार असते. यांना गुलाबासारखा सुगंध येतो. ही जांभळे बंगाल व ब्रह्मदेशामध्ये येतात.
 • जांभूळ खाण्याचे फायदे : प्लीहा व यकृत विकार, पंडुरोग, मधुमेह व कावीळ यावर जांभळाचा औषधी उपयोग करतात. जांभळाच्या सेवनाने रक्त शुद्ध व लाल होते. जांभूळ वीर्यवृद्धी करणारे आहे.
 • जीवनसत्त्वे : जांभळामध्ये थोड्या प्रमाणात ‘ब’,’क’ जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिड व कॉलीनदेखील असते.
 • जांभूळाचे इतर उपयोग : जांभळाची पाने, फळे, बिया, मुळे आणि खोड असे सर्व अवयव औषधी असतात, जांभळाच्या बिया उगाळून घामोळ्यावर लावतात. हे फळ कफ, पित्त, दाह, वायू यांचा नाश करणारे आहे. जांभळाच्या पानांचे तेल औषधी असते. विंचू चावल्यास पानांचा रस काढून विंचू चावलेल्या जागी लावावे, वेदना व सूज नाहीशी होते. खोडाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचर तयार करण्यासाठी आणि शेतीच्या अवजारांसाठी करतात.
 • जांभूळाची साठवण व पिकाची निगा : जांभळीच्या फुलांप्रमाणेच फळेही नाजूक असतात. झाडावरून खाली पडताच ही फळे फुटतात, म्हणून झाडावर चढून झेल्याने ही फळे अलगद काढावी लागतात. जांभळे लाकडी पेटीत किंवा करंड्यात खालच्या बाजूला पाला, पाने घालून अलगद ठेवली जातात.

निष्कर्ष

वरील जांभूळ फळाची माहिती मराठी वाचून आपल्याला जांभूळ खाण्याचे फायदे आणि जांभूळ खाण्याचे तोटे या लेखातून आपल्याला समजले असेलच. Jambhul Information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Jambhul in Marathi हा लेख कसा वाटला व अजून जांभूळ बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Jambul Blackplum in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली जांभूळा विषयी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

अजून वाचा :

1 thought on “जांभूळ फळाची माहिती | Jambhul Information in Marathi”

Leave a Comment