जाहिरातीचे युग निबंध मराठी – Jahiratiche Yug Marathi Nibandh

आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जात आहे. आपल्याला सगळीकडे जाहिराती दिसतात. वर्तमानपत्रे, मासिके व अन्य नियतकालिके यांमध्ये जाहिराती असतात. रस्त्यावरून जाताना सर्वत्र जाहिरातींचे फलक दिसतात.

बसमध्ये व रेल्वेमध्येही जाहिराती असतात. यांतील काही जाहिराती खूप आकर्षक असतात. त्या बघत राहाव्यात असे वाटते. नभोवाणी व दूरचित्रवाणी यांवर तर सतत जाहिराती चालू असतात. काही वेळा दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचा राग येतो. कारण त्यांच्यामुळे कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येतो. पण काही जाहिराती सुंदर असतात. दूरचित्रवाणीवरील मालिकांपेक्षाही त्या चांगल्या असतात.

काहीही असले, तरी जाहिराती या हव्यातच. त्या आपल्या उपयोगी पडतात. एखादे नाटक वा सिनेमा कधी व कुठे आहे, हे आपल्याला जाहिरातींमुळे कळते. आपल्याला एखादी वस्तू हवी असेल, तर ती कुठे मिळते, हे जाहिरातींमुळे समजते. कोणत्या नवीन वस्तू बाजारात आल्या आहेत, त्यांपैकी आपल्याला उपयोगी कोणत्या, हे जाहिरातीच सांगतात. चांगल्या गोष्टी कोणत्या व निरुपयोगी कोणत्या हेही आपल्याला जाहिरातींमुळे कळते. तेव्हा हे जाहिरातींचे युग वाईट नाही. आपण फक्त जागृत राहिले पाहिजे. आपली फसवणूक होऊ दयायची नाही.

जाहिरात युग निबंध मराठी – Jahiratiche Yug Marathi Nibandh

आजचे युग जाहिरातीचे युग युग आहे. जाहिरात ही एक कला आहे. आकर्षक जाहिराती बनविण्यासाठी त्यात चित्रकला, लेखन कला, फोटोग्राफी अॅनिमेशन अशा इतर कलाप्रकारांची मदत घेतली जाते. त्यामुळे सामान्य वस्तूही असामान्य भासू लागते. जेव्हापासून उपभोक्ता संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झाला तेव्हापासून जाहिरातींचा भडिमार सुरू झाला. जिकडे तिकडे स्पर्धा आहेत म्हणून प्रत्येक उत्पादक कमी कमी किंमत ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवू इच्छितो. आपल्या वस्तूची विक्री वाढवून जास्त फायदा मिळविण्यासाठी व्यापारी जाहिरातींची मदत घेतात.

जाहिराती वर्तमानपत्रांत, मासिकांत, रेडिओवर, दूरदर्शनवर असतात. पाम्प्लेट वाटून, भिंतीवर लिहून, घोषणा देऊनही जाहिरात करतात. कित्येकदा आपल्या प्रचारासाठी कंपनी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा उपयोग करते. जाहिरातींची भाषा फार आकर्षक असते. जाहिराती साठी सुंदर स्त्रियांचा उपयोग केला जातो. तयार कपड्यांच्या जाहिरातीत स्मार्ट, मुले, स्त्रिया, मुली यांचा उपयोग केला जातो. जाहिरातदार विश्व सुंदरी, नट, नट्या, खेळाडूंचा आपल्या जाहिरातीत उपयोग करतात. जाहिरातींमुळेच वस्तुंचे भाव वाढतात. कितीदा अनेकदा जाहिरातीच्या भडकपणामुळे आपणास योग्य निर्णय घेता येत नाही. चैनीच्या वस्तुंच्या जाहिराती देऊन उत्पादक नफा कमावतात. औषधांच्या जाहिरातींच्या मोहात सापडून आपण आपले आरोग्य बिघडवून घेतो.

आज जाहिरातीत स्त्रियांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यात भडकपणा व अश्लीलता असते. अशा प्रकारच्या जाहिरातींवर बंदी घातली पाहिजे. जाहिरातीमागील आपला दृष्टिकोन निरोगी असला पाहिजे. तसेच जागोजागी चिटकवलेले पोस्टर्स, जाहिराती यांमुळे गावे, शहरे खराब दिसू लागतात. यावरही बंदी घातली पाहिजे.

जाहिरातबाजी निबंध मराठी – Jahiratiche Yug Marathi Nibandh

आमचा बंब्या म्हणजे माझा धाकटा भाऊ आहे ना, त्याचा जाहिरातींवर खूपच विश्वास बसतो. जाहिराती पाहून पाहून त्यानं किती नको नको त्या गोष्टी आईला विकत घ्यायला लावल्या आहेत. म्हणून कधी कधी मला ह्या जाहिरात प्रकरणाचा रागयेतो.

जगात एकुण चौसष्ट कला आहेत असे प्राचीन काळात म्हटले जात होते. आता त्यात आणखी एका कलेची भर पडली आहे. ती पासष्टावी कला म्हणजेच जाहिरात कला. असे म्हणतात की ओरडून जाहिरात करणा-याची माती खपते पण गप्प बसून राहाणा-याचे मोतीसुद्धा खपत नाहीत. एवढे जाहिरातीचे महत्व आहे. एवढेच नव्हे तर जाहिरात हाच आता स्वतंत्र उद्योग बनला आहे.

त्यातच यंत्रयुगानंतर वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. त्यामुळे त्या वस्तू विकण्यासाठी जाहिरात करणे अगदी गरजेचेच बनले. खरोखर जाहिरात ही एक कलाच आहे. आकर्षक आणि मनाला वेधून घेणाया जाहिराती बनवायच्या असतील तर त्यात चित्रकला, लेखन, फोटोग्राफी, ऍनिमेशन इत्यादींचा अगदी कल्पकतेने वापर करावा लागतो.

मात्र जाहिरातीचे काही तोटे असे की जाहिरात उत्तम केल्याने कधीकधी सामान्य वस्तूही असामान्य भासू लागते. जेव्हापासून उपभोग्य वस्तूंची संख्या वाढू लागली आणि चंगळवादी संस्कृतीचा प्रसार सुरू झाला तेव्हापासून जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाला. आज पहावे तिकडे आपल्याला जाहिराती दिसतात. अगदी महाबळेश्वरसारख्या निसर्गसुंदर ठिकाणी गेले तर तिथेही एखाद्या निसर्गरम्य स्थळी कुठल्यातरी शीतपेयाची किंवा गुटक्याची जाहिरात रंगवलेली आपला पिच्छा सोडत नाही.

आजचे युग स्पर्धेचे आहे म्हणूनच एकेका वस्तूचे अनेक बँड असतात आणि प्रत्येक उत्पादकाला आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री करून नफा मिळवायचा असतो. त्यासाठी त्यांना जाहिरात केल्याशिवाय काही इलाजच नसतो.

जाहिरात अनेक प्रकारे करता येतात. वृत्तपत्रे, मासिके ह्यात जाहिराती देता येतात. रेडियो, टीव्हीवर जाहिराती देता येतात. पॅम्प्लेट वाटून किंवा लाऊडस्पीकरवर ओरडूनही जाहिरात करता येते. हल्ली तर इंटरनेट, फेसबुक, गुगल इत्यादी सामाजिक माध्यमांवरूनही जाहिरात केली जाते.

जाहिरातींची भाषा फार आकर्षक असते. सुंदर स्त्रियांचा जाहिरातीसाठी वापर केला जातो. कधीकधी तर त्या उत्पादनाचा स्त्रीशी तसा संबंधही नसतो परंतु काहीतरी बादरायण संबंध जोडून स्त्रीला त्या जाहिरातीत घेतले जाते. कधीकधी जाहिरातदार लोकप्रिय नटनट्या आणि विश्वसुंदरी पदवी मिळालेल्या स्त्रियांचा आपल्या जाहिरातीत उपयोग करतात. अशा जाहिरातींसाठी भरपूर पैसे खर्च केल्यामुळे कधीकधी हकनाक वस्तूंच्या किंमती वाढतात. काही जाहिराती दिशाभूल करणा-या असतात. लहान मुलांना नजरेसमोर ठेवून बनवलेल्या जाहिरातींना मुले फशी पडतात आणि आपल्या आईवडिलांकडे त्या वस्तू विकत घेण्याचा हट्ट धरून बसतात. जाहिरातीमुळे वस्तूंची विक्री वाढत असल्याने जाहिरात करायला हवीच परंतु ती करताना तारतम्य बाळगले पाहिजे. भडकपणा, अश्लीलता

आणि खोटे दावे एखाद्या जाहिरातीत केलेले असल्यास त्याविरूद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रारही करता येते.

तर अशी आहे ही जाहिरातबाजी

जाहिरात युग निबंध मराठी – Jahiratiche Yug Marathi Nibandh

जगात एकुण चौसष्ट कला आहेत असे प्राचीन काळात म्हटले जात होते. आता त्यात आणखी एका कलेची भर पडली आहे. ती पासष्टावी कला म्हणजेच जाहिरात कला. असे म्हणतात की ओरडून जाहिरात करणा-याची माती खपते पण शांत बसून राहाणा-याचे मोतीसुद्धा खपत नाहीत.एवढे जाहिरातीचे महत्व आहे. एवढेच नव्हे तर जाहिरात हाच आता स्वतंत्र उद्योग बनला आहे.

त्यातच यंत्रयुगानंतर वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. त्यामुळे त्या वस्तू विकण्यासाठी जाहिरात करणे अगदी गरजेचेच बनले. खरोखर जाहिरात ही एक कलाच आहे. आकर्षक आणि मनाला वेधून घेणा-या जाहिराती बनवायच्या असतील तर त्यात चित्रकला, लेखन, फोटोग्राफी ह्यांचा अगदी कल्पकतेने वापर करावा लागतो.

जाहिरातीचे काही तोटे असे की जाहिरात उत्तम केल्याने कधीकधी सामान्य वस्तूही असामान्य भासू लागते. जेव्हापासून चंगळवादी संस्कृतीचा प्रसार सुरू झाला तेव्हापासून जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाला. आज पहावे तिकडे आपल्याला जाहिराती दिसतात. अगदी महाबळेश्वरसारख्या निसर्गसुंदर ठिकाणी गेले तर तिथेही कुठल्यातरी शीतपेयाची किंवा गुटक्याची जाहिरात रंगवलेली आपला पिच्छा सोडत नाही.

आजचे युग स्पर्धेचे आहे म्हणूनच एकेका वस्तूचे अनेक बँड असतात आणि प्रत्येक उत्पादकाला आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री करून नफा मिळवायचा असतो. त्यासाठी त्यांना जाहिरात केल्याशिवाय काही इलाजच नसतो.

जाहिरात अनेक प्रकारे करता येतात. वृत्तपत्रे, मासिके ह्यात जाहिराती देता येतात. रेडियो, टीव्हीवर जाहिराती देता येतात. पत्रके वाटून किंवा लाऊडस्पीकरवर ओरडूनही जाहिरात करता येते. हल्ली तर इंटरनेट, फेसबुक, गुगल इत्यादी सामाजिक माध्यमांवरूनही जाहिरात केली जाते.

जाहिरातींची भाषा फार आकर्षक असते. सुंदर स्त्रियांचा जाहिरातीसाठी वापर केला जातो. कधीकधी जाहिरातदार लोक लोकप्रिय नटनट्यांचा आपल्या जाहिरातीत उपयोग करतात. अशा जाहिरातींसाठी भरपूर पैसे खर्च केल्यामुळे कधीकधी हकनाक वस्तूंच्या किंमती वाढतात. काही जाहिराती दिशाभूल करतात. लहान मुलांना नजरेसमोर ठेवून बनवलेल्या जाहिरातींना आम्ही मुले फशी पडतो आणि आईवडिलांकडे त्या वस्तू विकत घेण्याचा हट्ट धरून बसतो.

जाहिरातीमुळे वस्तूंची विक्री वाढत असल्याने जाहिरात करायला हवीच परंतु ती करताना तारतम्य बाळगले पाहिजे. भडकपणा, खोटे दावे एखाद्या जाहिरातीत केलेले असल्यास त्याविरूद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रारही करता येते. तर असे आहे हे जाहिरातयुग.

जाहिरातीचे युग निबंध मराठी – Jahiratiche Yug Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply