इंदिरा गांधी निबंध मराठी | Indira Gandhi Nibandh in Marathi

_इंदिरा गांधी निबंध मराठी-Indira Gandhi Nibandh in Marathi

Set 1: इंदिरा गांधी निबंध मराठी – Indira Gandhi Nibandh in Marathi

इंदिरा गांधी ह्या पंडित नेहरू आणि कमला नेहरू ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी झाला. त्या लहान असताना पंडितजी बराच काळ तुरुंगात असत कारण ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते. तर आईला क्षयरोग झाल्यामुळे तिला विश्रामधामात ठेवलेले होते. त्यामुळे इंदिराजींचे बाळपण एकाकी स्थितीत गेले. परंतु पंडित नेहरू नेहमी आपल्या कन्येला तुरूंगातून पत्रे पाठवत असत. त्या पत्रांतूनच त्या बापलेकीतील नाते घट्ट होत गेले.

पंडितजी आणि गांधीजी ह्यांच्याकडे त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यामुळे नेहरूंच्या पश्चात् लालबहादुर शास्त्री ह्यांचे अचानक निधन झाले तेव्हा इंदिरा गांधी ह्याच भारताच्या तिस-या पंतप्रधान बनल्या. त्यांच्या पतीचे नाव फिरोझ गांधी असे होते आणि मुलांची नावे राजीव आणि संजय अशी होती.

१९७२ साली पाकिस्तानशी युद्ध करून त्यांनी बांगला देश ह्या नव्या देशाची निर्मिती केली. म्हणून त्यांना दुर्गादेवी अशी पदवी लोकांनी दिली. त्या खूप जिद्दी, करारी आणि कणखर पंतप्रधान होत्या. ३० ऑक्टोबर, १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांची हत्या केली.

Set 2: इंदिरा गांधी निबंध मराठी – Indira Gandhi Nibandh in Marathi

भारताच्या पोलादी नेत्या इंदिरा गांधी यांचा जन्म १९१७ साली झाला.

पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पिता आणि स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू हे त्यांचे आजोबा. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भारतात झाले. काही काळ त्या शांतिनिकेतनमध्ये शिकल्या. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. वडील व आजोबा यांच्यामुळे इंदिरा गांधी लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या.

बालपणीच त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी ‘चरखा संघ’ स्थापन केला. लहान मुलामुलींची ‘वानरसेना’ त्यांनी स्थापन केली. ‘छोडो भारत’ आंदोलनात त्या सहभागी झाल्या. स्वातंत्र्य चळवळीत त्या आघाडीवर होत्या.

इंदिरा गांधी तरुण वयात काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. १९६६ साली त्या पंतप्रधान झाल्या. भारताला प्रगतिपथावर नेणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. शीख अतिरेक्यांनी १९८४ साली त्यांची हत्या केली.

Set 3: इंदिरा गांधी निबंध मराठी – Indira Gandhi Nibandh in Marathi

अनेक भारतीय महिलांनी आपल्या क्षमता आणि विलक्षण निर्णयशक्तीने जगाला आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी संपूर्ण जगात भारताचे नाव गौरवाने फडकाविले आहे. या स्त्रियांपैकी श्रीमती इंदिरा गांधी यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. भारताच्या या प्रथम महिला पंतप्रधानांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ मध्ये अलाहाबाद येथे झाला. इंदिरा ही श्री. जवाहरलाल नेहरु व सौ. कमला नेहरु यांची कन्या. परिवारातील राजकिय वातावरणाचा त्यांच्या मनावर अतिशय परिणाम झाला होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अलाहाबाद व शांतीनिकेतन येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना ऑक्सफर्ड येथे पाठविण्यात आले. १९४२ मध्ये श्री. फिरोज गांधी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या जोडप्यास दोन मुले झाली-राजीव आणि संजय.

इंदिरा गांधीनी राजकारणात तरुपणीच प्रवेश केला. त्या नॅशनल इंडियन काँग्रेसच्या सभासद व पुढे अध्यक्ष बनल्या. वडिलांच्या मृत्युनंतर, श्री. लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या. वयाच्या अठेचाळिसाव्या वर्षी त्या भारताच्या पंतप्रधान बनल्या. श्रीमती गांधी या पदावर सुमारे सतरा वर्ष होत्या. या काळात देशाच्या भवित्याच्या दृष्टिने त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगला देशाची निर्मिती झाली. त्यांनी सर्व बँकांचे राष्ट्रियीकरण केले. पंजाबातुन दहशतवादाचे निर्मूलन केले. त्या खऱ्या अर्थाने एक सेक्यूलर नेत्या होत्या. त्यांच्या अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय धोरण अतिशय यशस्वी ठरले. त्या एक द्रष्टया व्यक्ति होत्या. एक करारी व ठाम नेतृत्व त्यांनी दिले.

जागतिक राजकारणातही त्यांना महत्त्वाचे स्थान होते. त्या NAM च्या मुख्य पदावर होत्या. त्यांनी कॉमनवेल्थ परिषद यशस्वीरित्या भरवली. तसेच देशात आशियायी खेळ भरविले. जागतिक शांततेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. या थोर नेत्याची त्यांच्याच शरीररक्षकांनी ३१ ऑक्टोबर, १९८४ मध्ये हत्या केली. देशाला त्यांची अत्यंत आवश्यकता असतानाच त्यांना मृत्यु आला. परंतु पुढिल अनेक पिढ्यांना त्यांचे नेतृत्व व आहुती प्रेरणा देत राहील.

Set 4: इंदिरा गांधी निबंध मराठी – Indira Gandhi Nibandh in Marathi

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांची पत्नी कमलादेवी ह्यांना १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी एका तेजस्वी कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे नाव त्यांनी कौतुकाने इंदिरा असे ठेवले. हीच इंदिरा पुढे मोठेपणी जग गाजवणारी एक प्रभावशाली स्त्री ठरली. अनेक भारतीय महिलांनी आपल्या कर्तृत्वाने सा-या जगाला विस्मयचकित केले आहे. इंदिराजी त्यांच्यातील एक होत्या.

परंतु त्यांचे बालपण फार एकाकी गेले. त्यांचे आजोबा मोतीलालजी आणि वडील जवाहरलाल नेहरू कायम कारावासात असत. त्यातच त्यांची आई कमला हिला क्षयाची बाधा झाल्यामुळे तीही आरोग्यधामात असे. परंतु पंडितजी आपल्या ह्या कन्येला तुरूंगातून पत्रे पाठवीत असत. वडिलांकडून येणा-या ह्या पत्रांचा चिमुकल्या इंदिरेला खूप आधार होता.

परिवारातच राजकारण असल्यामुळे त्यांना राजकारणाचे बाळकडूच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शालेय शिक्षण अलाहाबाद आणि शांतिनिकेतन येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना ऑक्स्फर्ड येथे पाठवण्यात आले. १९४२ साली त्यांनी फिरोज गांधी ह्यांच्याशी विवाह केला. ह्या विवाहातून त्यांना राजीव आणि संजय असे दोन पुत्र झाले.

इंदिराजींनी अगदी तरूणपणीच राजकारणात प्रवेश केला. त्या भारतीय कॉन्ग्रेसच्या सभासद होत्याच परंतु पुढे त्यांना कॉन्ग्रेसचे अध्यक्षपदही मिळाले. पंडितजींच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री ह्यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्रीपद भूषविले. वयाच्या अठेचाळीसाव्या वर्षी त्या भारताच्या पंतप्रधान बनल्या. त्या पदावर त्यांनी सतरा वर्षे काम केले.

ह्या काळात त्यांना कित्येक कठोर निर्णय देशाच्या हितासाठी घ्यावे लागले. १९७१ साली जेव्हा पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून तिथे अत्याचार करायला सुरूवात केली. तेव्हा लाखो निर्वासितांचा लोंढा भारतावर येऊन आदळू लागला. अमेरिकेसह सर्व मोठ्या देशांनी पाकिस्तानला रोखावे म्हणून इंदिराजी जगभरच्या नेत्यांना भेटल्या. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी धडाडीने नेतृत्व करून बांगला देशच्या युद्धात पाकिस्तानचा पाडाव केला आणि बांगला देशाची मुक्तता केली.

त्यांनी १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून रूपयाच्या अवमूल्यनासारखा धाडसी निर्णय घेतला. पंजाबातून दहशतवादाचे उच्चाटन केले. त्या एक दूरदर्शी आणि निधर्मी नेत्या होत्या. भारताला त्यांनी एक निश्चयी आणि करारी नेतृत्व दिले.

त्यांना जागतिक राजकारणातही मोठा मान होता. त्यांनी कॉमनवेल्थ परिषदेचे भारतात आयोजन केले. तसेच आशियाई खेळही देशात भरवले. अशा ह्या महान स्त्रीची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी केली. देशाला त्यांची गरज असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पुढील कित्येक पिढ्यांना त्यांचे नेतृत्व आणि त्यांचे हौतात्म्य स्फुर्तिदायक ठरेल.

Set 5: इंदिरा गांधी निबंध मराठी – Indira Gandhi Nibandh in Marathi

१९७१ साली जेव्हा इंदिरा गांधी ह्यांनी बांगला देशचे युद्ध जिंकले तेव्हा त्यांच्या रूपाने साक्षात् दुर्गाभवानीच अवतरली असा भारतीय जनतेला आभास झाला होता. इंदिरा गांधी ह्या खरोखरच भारताच्या तेजःपुंज नारीरत्नांपैकी एक होत्या.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांची पत्नी कमलादेवी ह्यांना १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी एका तेजस्वी कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे नाव त्यांनी कौतुकाने इंदिरा असे ठेवले. हीच इंदिरा पुढे मोठेपणी जग गाजवणारी एक प्रभावशाली स्त्री ठरली. अनेक भारतीय महिलांनी आपल्या कर्तृत्वाने सा-या जगाला विस्मयचकित केले आहे. इंदिराजी त्यांच्यातील एक होत्या.

परंतु त्यांचे बालपण फार एकाकी गेले. त्यांचे आजोबा मोतीलालजी आणि वडील जवाहरलाल नेहरू कायम कारावासात असत. त्यातच त्यांची आई कमला हिला क्षयाची बाधा झाल्यामुळे तीही आरोग्यधामात असे. परंतु पंडितजी आपल्या ह्या कन्येला तुरूंगातून पत्रे पाठवीत असत. वडिलांकडून येणा-या ह्या पत्रांचा चिमुकल्याइंदिरेला खूप आधार होता.

परिवारातच राजकारण असल्यामुळे त्यांना राजकारणाचे बाळकडूच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शालेय शिक्षण अलाहाबाद आणि शांतिनिकेतन येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना ऑक्स्फर्ड येथे पाठवण्यात आले. १९४२ साली त्यांनी फिरोज गांधी ह्यांच्याशी विवाह केला. ह्या विवाहातून त्यांना राजीव आणि संजय असे दोन पुत्र झाले.

इंदिराजींनी अगदी तरूणपणीच राजकारणात प्रवेश केला. त्या भारतीय कॉन्ग्रेसच्या सभासद होत्याच परंतु पुढे त्यांना कॉन्ग्रेसचे अध्यक्षपदही मिळाले. पंडितजींच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री ह्यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी ‘माहिती आणि प्रसारण’ खात्याचे मंत्रीपद भूषविले. वयाच्या अठेचाळीसाव्या वर्षी त्या भारताच्या पंतप्रधान बनल्या. त्या पदावर त्यांनी सतरा वर्षे काम केले.

ह्या काळात त्यांना देशहितासाठी कित्येक कठोर निर्णय घ्यावे लागले. १९७१ साली जेव्हा पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून तिथे अत्याचार करायला सुरूवात केली. तेव्हा लाखो निर्वासितांचा लोंढा भारतावर येऊन आदळू लागला. अमेरिकेसह सर्व मोठ्या देशांनी पाकिस्तानला रोखावे म्हणून इंदिराजी जगभरच्या नेत्यांना भेटल्या. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी धडाडीने नेतृत्व करून बांगला देशच्या युद्धात पाकिस्तानचा पाडाव केला आणि बांगला देशाची मुक्तता केली.

त्यांनी १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून रूपयाच्या अवमूल्यनासारखा धाडसी निर्णय घेतला. पंजाबातून दहशतवादाचे उच्चाटन केले. त्या एक दूरदर्शी आणि निधर्मी नेत्या होत्या. भारताला त्यांनी एक निश्चयी आणि करारी नेतृत्व दिले.

त्यांना जागतिक राजकारणातही मोठा मान होता. त्यांनी कॉमनवेल्थ परिषदेचे भारतात आयोजन केले. तसेच आशियाई खेळही देशात भरवले. अशा ह्या महान स्त्रीची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी केली. देशाला त्यांची गरज असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पुढील कित्येक पिढ्यांना त्यांचे नेतृत्व आणि त्यांचेहौतात्म्यस्फुर्तिदायक ठरेल.

पुढे वाचा:

Leave a Comment