हर्डल्स शर्यत माहिती मराठी | Hurdles Race Information in Marathi

हर्डल्स शर्यत माहिती मराठी, Hurdles Race Information in Marathi
हर्डल्स शर्यत माहिती मराठी, Hurdles Race Information in Marathi

हर्डल्स शर्यत माहिती मराठी – Hurdles Race Information in Marathi

१) हर्डल्स शर्यतीमध्ये प्रत्येक स्पर्धकाला दहा हर्डल्स ओलांडावे लागतात.

२) १०० मी. (महिला) व ११० मी. (पुरुष) या शर्यती सरळ पट्ट्यातच घ्याव्यात.

३) ४०० मी. हर्डल्स शर्यती ट्रॅकवर घ्याव्यात. त्या वेळी स्टॅगर्स द्यावेत.

४) हर्डल्सची उंची पुढीलप्रमाणे ठेवावी –

पुरुष –११० मी. शर्यत – १०६.७ सें.मी.
४०० मी. शर्यत – ९१.४ सें.मी.
महिला –१०० मी. शर्यत – ८४.० सें.मी.
४०० मी. शर्यत – ७६.२ सें.मी.

५) हर्डल्समधील अंतर पुढीलप्रमाणे असावे –

अ) पुरुष११० मी. ४०० मी.
आरंभ रेषेपासून पहिला हर्डल१३.७२ मी. ४५ मी.
शेवटचा हर्डल व अंतिम रेषा१४.०२ मी. ४० मी.
इतर हर्डल्समधील अंतर९.१४ मी. ३५ मी.
ब) महिला १०० मी. ४०० मी.
आरंभ रेषेपासून पहिला हर्डल१३.० मी. ४५ मी.
शेवटचा हर्डल व अंतिम रेषा१०.५० मी. ४० मी.
इतर हर्डल्समधील अंतर८.५० मी. ३५ मी.

६) हर्डलची रुंदी १.२० मीटरपेक्षा अधिक नसावी. वजन १० किलोग्रॅमपेक्षा कमी नसावे. हर्डलची वरची आडवी पट्टी लाकडी असते.

७) अडथळा पार करताना हर्डल्स पडले‚ तरी तो फाउल नाही. स्पर्धकाने बुद्धिपुरस्सर हाताने अगर पुढील पायाने हर्डल पाडले‚ असे सरपंचाचे नक्की मत झाले तर तो स्पर्धक बाद करावा.

८) स्पर्धकाने आपल्या पट्ट्यातीलच हर्डल्स ओलांडावयाची असतात. ९) हर्डल ओलांडताना पाय हर्डलच्या बाहेरच्या बाजूने घेतला‚ तर तो फाउल समजावा.

पुढे वाचा:

शेअर करा

Leave a Comment