कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार
कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

कापणे यासाठी प्रथमोपचार

१) लहानसहान कट्स

भाजी कापताना सूरी लागणे, खेळताना खरचटणे ई. गंभीर नसणाऱ्या लहान स्वरूपाच्या कट्स साठी पुढीलप्रमाणे प्रथमोपचार करावेत. सर्वात आधी जखम स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धुवून, डेटॉल किंवा इतर कोणतेही जंतुनाशक कापसाने लावून जखम स्वच्छ करावी. त्यानंतर त्यावर कट्ससाठी वापरले जाणारे कोणतेही अँटिसेप्टिक लावावे.

२) मध्यम आकाराच्या जखमा

जखम थोडी मोठी असल्यास, वरीलप्रमाणे सर्व क्रिया करून झाल्यानंतर त्यावर सर्जिकल कॉटन चा एक तुकडा ठेवून बँडेज गुंडाळून ठेवावे. त्यामुळे रक्तप्रवाह थांबेल. त्यानंतर डॉक्टरला दाखवावे.

३) मोठ्या आकाराच्या गंभीर जखमा

एखाद्या शस्त्राने झालेल्या मोठ्या जखमेतून रक्तस्त्राव फार जास्त प्रमाणात होतो. रक्तस्त्राव वेळेत थांबवला नाही तर जीवाला धोका असतो. त्यामुळे अशी जखम झाल्यास सर्वात आधी त्या जखमेवर थेट दाब देऊन रक्तप्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करावा. ते शक्य नसल्यास जखमेच्या वरच्या बाजूला एखादा कपडा किंवा बेल्ट घट्ट गुंडाळून ठेवावा. त्यामुळे जखमेपर्यंत येणारा रक्तप्रवाह कमी होतो. त्यानंतर जखम धुवून प्रथमोपचार करून तातडीने डॉक्टरला दाखवावे. टाके घालण्याची गरज अशा जखमांमध्ये असतेच!


भाजलेली जखम बरी होण्यासाठी उपाय

आपण फक्त भाजण्यावरचे प्रथमोपचार पाहणार आहोत. भाजण्याचे प्रकार, डिग्री या गोष्टी नाहीत.

१) कमी गंभीर स्वरूपाचे भाजणे

गरम इस्त्रीचा चटका, गरम भांड्याचा चटका, हे फार जास्त गंभीर नसते. मात्र उकळलेला चहा किंवा इतर कोणताही गरम द्रवपदार्थ सांडून होणाऱ्या जखमा नंतर गंभीर स्वरूप धारण करू शकतात. कारण कोणतेही असो, कोणतीही भाजण्यामुळे झालेली जखम सर्वात आधी स्वच्छ वाहत्या पाण्याखाली पूर्ण वीस मिनिटे धुवावी. घड्याळ नीट तपासावे. त्यानंतर त्या भागावर असणाऱ्या वस्तू, जसे अंगठी, ब्रेसलेट, बांगडी, नेकलेस, पैंजण, जोडवी, जे काही असेल ते आधी काढून घ्यावे. कधीकधी भाजलेल्या भागावर काही वेळानंतर पाण्याचे फोड येतात. त्यामुळे दागिने काढणे अशक्य होते. यानंतर जखम जंतुनाशकाने स्वच्छ करून, बरनॉल किंवा इतर कोणतेही भाजण्यावर लावण्याचे क्रीम लावून डॉक्टरला दाखवावे.

२) गंभीर स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा

रसायन अंगावर सांडून किंवा स्फोटात जखमी होण्याने फार गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊ शकतात. अशा वेळी पूर्ण अर्धा तास त्या भागावरून स्वच्छ पाणी वाहते ठेवावे. जखम चोळू नये. कपडे जखमेवर चिकटलेले असल्यास ते तसेच राहू द्यावेत. कारण काढण्याचा प्रयत्न केल्यास चामडी निघून येऊ शकते. पूर्ण तीस मिनिटे पाण्याचा वॉश घेतल्यानंतर कापसाच्या बोळ्याने अलगद हाताने जंतुनाशक लावून जखम स्वच्छ करावी. बरनॉल लावावे. जखम बांधू नये. ताबडतोब हॉस्पिटलला न्यावे.

अजून वाचा: घरगुती एलपीजी गॅस आणि सुरक्षा

भारताची राजधानी कोणती आहे | Bhartachi Rajdhani Konti

दिवाळी सणाची माहिती मराठीत | Diwali Information in Marathi

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

स्वच्छता विषयी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Cleanliness in Marathi

शेअर करा

Leave a Comment