Hashim Amla Information in Marathi : हाशिम मोहम्मद आमला दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. हाशिमचा जन्म ३१ मार्च १९८३ रोजी डरबन, नेटल प्रोव्हिंस, दक्षिण आफ्रिका येथे झाला. तो उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करतो.

हाशिमला ऑर्डर ऑफ इरवामांगा हा दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी खेळातील उत्कृष्ट कामगिरीकरता दिलेला सन्मान मिळाला आहे. त्याने सर्वात जलद २०००, ३०००, ४०००, ५०००, ६००० आणि ७००० आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यातील धावा करण्याचा विक्रम केला आहे. हे आकडे त्याचे सातत्य, परिश्रम आणि त्याची जिद्द, चिकाटी ह्यांचे द्योतक आहेत.

हाशिम आमला माहिती मराठी, Hashim Amla Information in Marathi
हाशिम आमला माहिती मराठी, Hashim Amla Information in Marathi

हाशिम आमला माहिती मराठी – Hashim Amla Information in Marathi

खरे नावहाशिम माहोमद आमला
टोपणनावहॅश
व्यवसायदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर (फलंदाज)
आंतरराष्ट्रीय पदार्पणकसोटी- २८ नोव्हेंबर २००४ विरुद्ध भारत कोलकाता येथे.
एकदिवसीय – ९ मार्च २००८ विरुद्ध बांगलादेश चटगांव येथे.
टी-२० – १३ जानेवारी २००९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे.
शेवटचा सामनाकसोटी – विरुद्ध श्रीलंका २१ फेब्रुवारी २०१९ रोजी सेंट जॉर्ज पार्क येथे.
एकदिवसीय- श्रीलंका विरुद्ध रिव्हरसाइड ग्राउंड येथे २८ जून २०१९ रोजी.
टी -२० – श्रीलंका विरुद्ध १४ ऑगस्ट २०१८ रोजी आर.प्रमदासा स्टेडियम.
आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्ती८ ऑगस्ट २०१९ रोजी त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली.
प्रशिक्षकहिल्टन अकरमॅन
जर्सी क्रमांक#१ (दक्षिण आफ्रिका)
#१ (आयपीएल, काउंटी क्रिकेट)
या विरुद्ध खेळणे आवडलेभारत आणि इंग्लंड
आवडता शॉटकव्हर ड्राइव्ह

दहा एक दिवसीय शतके सर्वात जलद गतीने करणारा तो एकमेव खेळाडू आहे. ८ डिसेंबर २०१३ रोजी ४००० धावा सर्वात वेगवान गतीने करणारा हाशिम हा एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला. आमला क्वचित ऑफ – ब्रेक गोलंदाजीही करतो. जून २०१४ ते जानेवारी २०१६ दरम्यान आमला आफ्रिकेचा कसोटी कर्णधार होता.

जुलै २०१२ मध्ये द ओव्हल, इंग्लंड येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद ३११ धावा केल्या. कसोटी सामन्यामध्ये त्रिशतक करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

२०१४ मध्ये ८६ व्या डावात त्याने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमधील १५ शतके केली. त्याच वर्षी ९४ सामन्यांमध्ये १६ शतके आणि ९८ सामन्यांमध्ये १७ शतके करण्याचा ‘महाविक्रम’ त्याने केला. १८ जानेवारी २०१५ रोजी १०२ सामन्यांमध्ये १८ शतके आणि ३ मार्च २०१५ रोजी एक दिवसीय सामन्यांमध्ये १०८ डावात २० शतके करून त्याने विक्रमाचे आणखी एक शिखर पादाक्रांत केले. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघाविरुद्ध त्याने शतक केले आहे आणि असे करणारा तो चौथा फलंदाज आहे.

Hashim Amla ODI batting

२०१३ मध्ये ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर सन्मानाने त्याला गौरवण्यात आले. २०१७ मध्ये आमलाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळतांना २ शतके केली. विक्रमाची एकेक पायरी गाठत ०३ जून २०१७ रोजी हाशिमने २५ एक दिवसीय क्रिकेटमधील शतके करण्याचा विराट विक्रम केला. १९ जानेवारी २०१८ रोजी विराट कोहलीचा विराट विक्रम मोडत एक दिवसीय क्रिकेटमध्ये ७ शतके सर्वात जलद गतीने करण्याचा पराक्रम त्याने केला.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

व्यक्तिगत जीवन

साऊथ आफ्रिकन मुस्लिम टर्क कुटुंबात जन्माला आलेल्या हाशिम आमलाचे पूर्वज गुजरात, भारत येथे होते. मध्यम वर्गीय हाशिमचे शिक्षण उच्चभ्रू डर्बन हायस्कूलमध्ये झाले. लान्स क्लूसनर आणि बॅरी रीचर्डस् हे देखील त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. हाशिमचा भाऊ अहमद आमला व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. अमहदने हाशिमच्या २ वर्ष आधी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नंतर काही काळ दोघे क्वाझुलू नटाल डॉल्फिन्स संघाकडून खेळले.

सुरुवातीचा काळ

डर्बन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यावर आमलाने प्रांतीय संघातून क्वाझुलू नटाल डॉल्फिन्स्मधून पदार्पण केले. लवकरच २००२ मध्ये न्यूझीलंड मध्ये १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकरंडकात आमलाने त्याच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले. सुरुवातीच्या वर्षात वेस्टर्न प्रॉव्हिंस संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक हिल्टन अॅकरमॅनचा हाशिमच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा होता. क्वाझुलू नटालकडून खेळतानाच आमलाकडे दक्षिण आफ्रिकेचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात होते. २०१३ मध्ये डॉल्फिन्सकडून केप कोब्राज संघात आमलाने स्थान मिळवले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२८ नोव्हेंबर २००४ मध्ये ईडन गार्डन्स कोलकाता येथे पदार्पण करतांना आमलाने इंग्लंड विरुद्ध मालिकेत केवळ ३६ धावा केल्या. मात्र २००६ मध्ये टीकाकारांना चुकीचे ठरवत त्याने न्यूलँन्डस् केपटाऊन येथे न्यूझीलंड विरुद्ध तडाखेबाज १४९ धावा केल्या. त्याच्या तुफानी खेळीमुळे सामना अनिर्णीत राहिला.

हाशिमने यशाची पुनरावृत्ती करत पुढच्या १९ कसोट्यांमध्ये १५९९ धावा लुटल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या क्रमाकांचा फलंदाज म्हणून आपले स्थान भक्कम केले. २७ मार्च २००८ रोजी चेन्नई येथे भारताविरुद्ध त्याने नाबाद १५९ धावा केल्या. २००८ ह्या वर्षातील आमलाच्या १०१२ धावांमध्ये अनेक शतकांचा समावेश होता. त्यात भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध केलेला धावांचा तुफानी माराही होता.

२००९ मधील दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये आमलाने दक्षिण आफिकेला ऑस्ट्रेलियावर मात करण्यात अभूतपूर्व योगदान दिले.त्याने ५१. ८० च्या सरासरीने कसोटीमध्ये २५९ धावा केल्या. एक दिवसीय मालिकेतही आमलाने कौतुकास्पद कामगिरी केली. त्यात सामना जिंकून देणाऱ्या ८० धावांचा समावेश होता.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

वर्ष २०१०

फेब्रुवारी २०१० मध्ये भारतामध्ये भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत आमलाने २५३ धावा केल्या. भारताला फॉलो-ऑन मिळाल्यावर दक्षिण आफ्रिका ६ धावा आणि एका डावाने जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात आमलाने ११४ धावा केल्या, तरीही दक्षिण आफ्रिकेला २९६ धावापर्यंतच मजल मारता आली. भारताने ६४३ धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्य पार करतांना दक्षिण आफ्रिकेचा संघ कोसळला तरीही आमलाने पुन्हा १२३ धावा करत आशा उंचावली परंतु दक्षिण आफ्रिका एका डावाने सामना हरला.

त्यानंतर आमला ५ एक दिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. पहिल्या एक दिवसीय सामन्यात आमलाने १०२ अशी सर्वाधिक धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला. त्यानंतर ९२ धावा दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये आमलाने केल्या व साऊथ आफ्रिकेने १७धावांनी विजय मिळवला. चौथ्या एक दिवसीय सामन्यामध्ये आमलाने ११५ चेंडू खेळत १२९ धावा केल्या. पाचव्या व शेवटच्या एक दिवसीय सामन्यामध्ये त्याने ४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका एका गड्याने जिंकली.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमलाची कामगिरी निराशाजनक होती.

झिंबाब्वेविरुद्ध ३ एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत आमलाच्या ११० धावा झाल्या. दक्षिण आफ्रिकेने झिंबाब्वेला ३५१ धावांचे लक्ष्य विजयासाठी दिले. दक्षिण आफ्रिका संघ ६४ धावांनी सामना जिंकला. दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये आमलाने ११० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखत विजयाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेने तिन्ही सामने जिंकत मालिका खिशात घातली.

उत्तम फॉर्म गवसला असता त्याने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक केले. तिसऱ्या सामन्यात आमलाने ११९ धावा केल्या.

अत्युत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आमलाची निवड भारताविरुद्ध टी-२० संघासाठी झाली.

वर्ष २०१२

दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यावर असतांना द ओव्हल येथे आमलाने नाबाद ३११ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने केलेली ती सर्वाधिक धावसंख्या होती आणि ते पहिले त्रिशतक ही होते. तिसऱ्या कसोटीमधील दुसऱ्या डावात लॉर्डस् येथे आमलाने १६ वे कसोटी शतक केले. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ५१ धावांनी हरवत मालिका २-० अशी जिंकली. आमला मालिकावीर ठरला. त्यानंतरच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात साऊथम्पटन येथे आमलाने १२४ चेंडूंमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम १५० धावा केल्या.

Hashim Amla test cricket batting

नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आमलाने १०४ धावा केल्या आणि कॅलीसच्या भागीदारीत तिसऱ्या विकेटसाठी गाबा येथे १६५ धावा केल्या. वाका येथे तिसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या डावात आमलाने १९६ धावा केल्या दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.

अजून वाचा: हार्दिक पंड्या माहिती मराठी

वर्ष २०१३

जानेवारी २०१३ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आमलाला कर्णधारपदासाठी विचरण्यात आले होते. परंतु त्याने प्रस्ताव नाकारला. ऑगस्ट २०१३ मध्ये आमलाने सरेकरीता खेळण्यासाठी मान्यता दिली.

वर्ष २०१४

जून २०१४ मध्ये ग्रॅमी स्मिथच्या निवृत्तीनंतर श्रीलंका दौऱ्याच्या आधी आमलाकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. पहिल्याच मालिकेत आमलाच्या नेतृत्वाखाली संघाने ऐतिहासिक विजय मिळवला.

वर्ष २०१५

जानेवारी २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत मालिका-वीराचा सन्मान आमलाला मिळाला. ऑगस्ट २०१५ मध्ये न्यूझीलंड- विरुद्ध शतक केल्यानंतर त्याला सामनावीर घोषित करण्यातआले. २०१५ मधील आफ्रिका टी-२० करंडकासाठी बोलंड क्रिकेट संघात आमलाची निवड करण्यात आली. २०१६ मध्ये आमलाची कामगिरी निराशाजनक होती.

वर्ष २०१७

१२ जानेवारी २०१७ रोजी आमलाने १०० वा कसोटी सामना खेळला. १०० कसोटी खेळणारा तो आठवा दक्षिण आफ्रिकन खेळाडू होता. १०० व्या सामन्यात आमलाने २६ वे शतक केले. १०० व्या कसोटीत शतक करणारा आमला आठवा कसोटी खेळाडू आणि ग्रॅमी स्मिथनंतर दुसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला.

ऑगस्ट २०१७ मध्ये वर्ल्ड ११ संघाकडून पाकिस्तानविरुद्ध लाहोर येथे २०१७ इंडीपेंडन्स कपमध्ये ३ टी-२० सामने खेळण्यासाठी त्याची निवड झाली.

Hashim Amla

टी-२० फ्रँचाईझी कारकीर्द

कॅरीबिअन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाकडून आमला टी-२० सामने खेळला आहे. ११ सामन्यांमध्ये त्याने ४१० धावा केल्या आहेत.

शॉन मार्श जायबंदी झाल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने २०१६ आय. पी. एल. साठी हाशिम आमलाची निवड केली. तेव्हापासून आमला संघाचा अविभाज्य घटक बनला आहे. १६ सामन्यांमध्ये ५७७ धावा करत त्याने २ शतक आणि ३ अर्धशतके केली आहेत.

ऑक्टोबर २०१८ मध्ये डर्बन हीट संघाकडून मेझन्सी सुपर लीग टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याकरता हाशिम आमलाची निवड झाली.

एप्रिल २०१८ मध्ये चान्सलर ऑफ नॅशनल ऑर्डर्स डॉ. कॅसियू लूबिसी यांनी ऑर्डर ऑफ इखामांगाच्या रजत पदकाने आमलाचा गौरव केला.

लूबिसी आमलाबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणाले, ‘आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचा सन्मान वाढवला आहे. तो आमच्या संघाचा आघाडीचा फलंदाज आहे.’

१० सप्टेंबर २०१३ रोजी आमलाचा ४ पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. त्यामध्ये ‘क्रिकेटर ऑफ द इअर ट्रॉफी’, ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ

द इयर’, ‘एस. ए. फॅन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ अशा पुरस्कारांचा समावेश होता.

हाशिम आमलाने क्रिकेटचे सर्वोच्च व्यासपीठ – विश्व करंडकामध्ये – २०१९ साली सर्वोच्च कामगिरी करावी अशी त्याच्या जगभरातील चाहत्यांची अपेक्षा आहे. आमलाने ‘मेहनतीच्या बळावर माणसाची कल्पनातित प्रगती होते’ हे वचन स्वत:च्या उदाहरणावरून खरे करून दाखवले आहे.

हाशिम आमलाला भावी कारकिर्दीकरता सर्व क्रिकेट प्रेमींकडून शुभेच्छा!

अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती

FAQ: Hashim Amla – हाशिम आमला माहिती

हाशिम आमलाची पत्नी कोण आहे?

सुमैया अमला

हाशिम आमला भारतीय आहे का?

हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सर्वात महत्वाच्या फलंदाजांपैकी एक हाशिम अमला गुजरातमधील एका कुटुंबातील आहे.

हाशिम आमला अजूनही क्रिकेट खेळतो काय?

८ ऑगस्ट २०१९ रोजी आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

हाशिम आमला पाकिस्तानी आहे का?

हाशिम आमला पाकिस्तानी नाही, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमला पाकिस्तान सुपर लीगचा एक भाग होता.

हाशिम आमला पीएसएल मध्ये खेळत आहे का?

पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचायझी पेशावर झल्मीने दक्षिण हाशिम आमलाला पीएसएल -६ साठी फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नेमले होते.

Leave a Reply