Hardik Pandya Information in Marathi : हार्दिक हिमांशु पंड्या हा भारताच्या राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिक घरेलू क्रिकेटमध्ये बरोडा आणि आय. पी. एल. मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.
हार्दिकचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी सुरत गुजरात येथे झाला. हार्दिक उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. कृणाल पांड्याचा तो धाकटा भाऊ आहे. कॉफी विथ करण या शो मधे विवादास्पद टिप्पणी केल्याबद्दल बी. सी. सी. आयने हार्दिकवर ५ आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांसाठी बंदी घातली होती.

हार्दिक पंड्या माहिती मराठी – Hardik Pandya Information in Marathi
खरे नाव | हार्दिक पांड्या |
टोपणनाव | हॅरी |
व्यवसाय | भारतीय क्रिकेटपटू (अष्टपैलू) |
जन्म तारीख | ११ ऑक्टोबर १९९३ |
वय (२०२१ पर्यंत) | २८ वर्षे |
जन्मस्थान | चोरयासी, गुजरात, भारत |
राशिचक्र | तुला |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मगाव | बडोदा, गुजरात, भारत |
कुटुंब | पिता – हिमांशू पांड्या (व्यापारी) आई – नलिनी पांड्या भाऊ – क्रुणाल पांड्या बायको – नशाता |
धर्म | हिंदु |
जाती | ब्राह्मण |


हार्दिक पांड्याच्या आवडी निवडी
आवडते क्रिकेटर्स फलंदाज | सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग |
गोलंदाज | हरभजन सिंग |
आवडते पदार्थ | गुजराती खाद्य |
आवडता अभिनेता | अक्षय कुमार |
आवडती अभिनेत्री | आलिया भट्ट |
आवडता सुपरहीरो | सुपरमॅन |
हार्दिक पंड्या शिक्षण आणि सुरुवातीचा काळ
हार्दिक आणि कुणाल खूप लहान असताना वडिलांनी गाव सोडले आणि मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी वडोदरामध्ये स्थायिक झाले. येथे त्यांनी आपल्या दोन मुलांना एम.के. विद्यालयमध्ये प्रवेश मिळाला. अभ्यासाबरोबरच कुणाल-हार्दिकने किरण मोरेची क्रिकेट अकादमी मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हार्दिकच्या कुटुंबाची स्थिती आर्थिक दुर्बल होती, म्हणून पांड्या कुटुंब गोरवा येथे भाड्याच्या घरात राहत होते. क्रिकेटमधील आवड असल्यामुळे हार्दिकने केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतले.

हार्दिकचे वडील हिमांशु पंड्या सुरतमध्ये कार फायनान्सचा व्यवसाय करत होते. हार्दिक ५ वर्षाचा असताना क्रिकेटचे उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने हार्दिकचे वडील वडोदऱ्याला आले. हार्दिक आणि कृणाल ह्या दोघांनाही हिमांशु पंड्या यांनी किरण मोरे क्रिकेट अकादमी मध्ये दाखल केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पंड्या कुटुंब गोरवा येथे भाड्याच्या घरात रहात होते. नवव्या वर्गापर्यंत हार्दिकचे शिक्षण एम. के. हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर क्रिकेटवर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने शाळा सोडली.

कनिष्ठ पातळीवरील क्रिकेटमध्ये हार्दिकने संथ गतीने प्रगती केली. कृणाल म्हणतो, ‘हार्दिकने अनेक सामने एक हाती जिंकून दिले.’ द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत कृणाल म्हणतो, ‘हार्दिकला राज्य संघातून त्याच्या जास्त खुल्या व्यक्तिमत्वामुळे वगळण्यात आले होते. हार्दिकबद्दल त्याने असेही सांगितले की त्याला व्यक्त होणे आवडते, भावना लपवून ठेवणे जमत नाही.’
१८ वर्षाचा होईपर्यंत हार्दिक लेग स्पिनर होता. नंतर बरोडा संघाचे प्रशिक्षक सनथ कुमार ह्यांच्या आग्रहामुळे तो फास्ट बॉलर झाला.
भारतीय मैदानांवरील कारकीर्द
बरोडा क्रिकेट संघाकडून खेळण्यास हार्दिकने २०१३ मध्ये सुरुवात केली. २०१३-१४ मध्ये सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बरोडाच्या विजयात हार्दिकचे मोलाचे योगदान होते.

आय. पी. एल.च्या २०१५ च्या मोसमात त्याने ८ चेंडू खेळत झटपट २१ धावा केल्या आणि ३ महत्त्वाचे झेल घेऊन चेन्नई सुपर किंग्ज्ला हरवण्यात संघाला फार मोठे योगदान दिले. मुंबईने सहा विकेट्सने सामना जिंकला. सामनावीर हार्दिक पंड्या ठरला. चेन्नई सुपर किंग्ज् विरुद्ध पहिल्या पात्रता सामन्यानंतर हार्दिक भारताकडून पुढील १८ महिने खेळणार असे सचिनने त्याला सांगितले. एका वर्षात हार्दिकची निवड २०१६ आशिया कप आणि २०१६ आय. सी. सी. वर्ल्ड टी-२० स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघामध्ये झाली.
नंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने ३१ चेंडू खेळत ६१ धावांची उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या चमकदार खेळीमुळे मुंबई संघ जिंकला आणि त्या हंगामातील दुसरे सामनावीराचे पदक त्याला मिळाले. त्याच सामन्यात हार्दिकला ‘येस बँक मॅक्झिमम सिक्सेस’ अवार्डही मिळाला.
जानेवारी २०१६ मध्ये यशोमालिका कायम ठेवत सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भ क्रिकेट संघाविरुद्ध आठ षटकार खेचत हार्दिकने नाबाद ८६ धावा केल्या आणि बरोडा क्रिकेट संघाला ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला.
अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२७ जानेवारी २०१६ ला २२ वर्षाचा असताना पंड्याने आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. त्या सामन्यात त्याने २ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-२० मधला पहिला बळी क्रिस लेनचा होता. राची येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने १४ चेंडूमध्ये २७ धावा केल्या. आशिया कप २०१६ मध्ये हार्दिकने १८चेंडू खेळत ३१ धावा केल्या. भारताने बांगलादेशविरुद्ध समाधानकारक धावसंख्या उभी केली. हार्दिकने एक गडी बाद करत विजयाला हातभार लावला

. पुढच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने ८ धावा देवून ३ गडी बाद करत पाकिस्तानचा संघ केवळ ८३ धावांवर रोखण्यात महत्वाचा वाटा उचलला. २३ मार्च २०१६ रोजी वर्ल्ड टी-२० सामन्यात बांगलादेश विरुद्ध पंड्याने सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या ३ चेंडूध्ये २ महत्त्वाचे गडी बाद करत भारताला बांगलादेशवर 1 धावेने विजय मिळवून दिला. ८ जुलै २०१८ रोजी हार्दिकने गोलंदाजीच्या कारकिर्दीतील सर्वोच्च सोनेरी कामगिरी करत तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध केवळ ३८ धावात ४ बळी घेतले आणि १४ चेंडू खेळत नाबाद ३३ धावा केल्या. विजयासाठी आवश्यक धावा हार्दिकने जॉर्डनच्या चेंडूवर षटकार खेचून काढल्या. टी-२० सामन्यामध्ये ३० च्या वर धावा आणि ८ बळी घेणारा हार्दिक पहिला भारतीय खेळाडू ठरला.
आंतरराष्ट्रीय एक दिवसीय कारकीर्द
१६ ऑक्टोबर २०१६ रोजी धर्मशाळा येथे न्यूझीलंड विरुद्ध पंड्याने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर होण्याचा मान मिळवणारा हार्दिक पंड्या संदीप पाटील, मोहीत शर्मा आणि के. एल. राहुल नंतर चौथा भारतीय खेळाडू ठरला. एक दिवसीय फलंदाजीच्या पदार्पणात त्याने ३२ चेंडूंना सामोरे जात ३६ धावा केल्या. आय. सी. सी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गट सामन्यात पावसामुळे खेळ थांबण्याआधी इमाद वसीमला लागोपाठ ३ चेंडूवर हार्दिकने षटकार खेचले. १८ जून २०१७ रोजी ओव्हल येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याने ४३ चेंडू खेळत ७६ धावा केल्या. भारताने सामना हरला.
एप्रिल २०१९ मध्ये २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघात हार्दिकचे नाव निश्चित झाले.
अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती
कसोटी कारकीर्द
२०१६ च्या शेवटी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या कसोटी संघात फलंदाज म्हणून पंड्याला स्थान दिले गेले, परंतु पी सी ए स्टेडियमवर सराव करतांना जायबंदी झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. जुलै २०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघामध्ये पंड्याची निवड झाली. २६ जुलैला गॅले येथे तो पहिला कसोटी सामना खेळला. तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले येथे खेळण्यात आला. पंड्याने त्याची पहिली शंभर धावांची खेळी भोजनापूर्वी केली. लंचपूर्वी शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. कसोटी सामन्याच्या एका षटकात सर्वाधिक (२६) धावा करण्याचा विक्रमही पंड्याने केला. पंड्याचे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिले शतक होते.

विवादाच्या चक्रात
जानेवारी २०१९ मध्ये हार्दिक पंड्याने कॉफी विथ करन’ शो मध्ये काही विवादास्पद विधाने केली. असभ्य, अश्लील अशा काही विधानांमुळे त्याचे चाहतेही त्याच्यावर नाखुश झाले. हार्दिकने नंतर सर्व जनतेची माफी मागत म्हटले, ‘शो मधील वातावरणाने मी भावनेच्या भरात काहीसे असभ्य बोलून गेलो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ‘प्रतिक्रिया देताना बी. सी. सी. आय. ने म्हटले, ‘आता असेही पहावे लागेल की अशा कार्यक्रमात जेथे क्रिकेटचा काही संबंध नाही, खेळाडूंना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी का नाही, निर्णय घ्यावा लागेल.

बी. सी. सी. आय. च्या अटी न राखल्यामुळे हार्दिकला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. पंड्या आणि राहुल दोघांनाही बेजबाबदार विधानांमुळे निर्णय होईपर्यंत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या दौऱ्यावरून त्यांना भारतात परत बोलवण्यात आले. १३ जानेवारी २०१९ ला जिलेटने हार्दिकशी असलेले ‘जिलेट मॅक-३’ चे ‘ब्रेन्ड असोसिएशन’ रद्द केले. २४ जानेवारी २०१९ ला पंड्या आणि राहुलवरील बंदी उठवण्यात आल्यावर न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाची बी. सी. सी. आयने घोषणा केली.
अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती
दिलखुलास व्यक्तिमत्त्व
मे २०१९ मध्ये ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पंड्या म्हणाला, ‘माझ्यात सकारात्मक बदल होतो आहे असे लोकांना वाटते आहे ही आनंदाची गोष्ट आहे. ‘व्यक्तिश: मला फार काही बदलले आहे असे वाटत नाही. मात्र माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात मी जाणीवपूर्वक बदल केला आहे.

गतवर्षीचा आय. पी. एल.चा हंगाम माझ्यासाठी फार समाधानकारक नव्हता. त्यामुळे मी निराश झालो होतो. ह्या मोसमातही, काही सामन्यांमध्ये मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो असे मला वाटते. २०१५ आय.पी.एल. पूर्वी हार्दिक पंड्या कुणालाही माहीत नव्हता. पण परिस्थिती बदलेल अशी मला खात्री होती आणि आज तसेच झाले आहे.’
हार्दिक पांड्याची बायको/पत्नी
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या मैत्रिणीचे नाव नतासा स्टॅनकोव्हिक आहे. नतासा स्टॅनकोव्हिक एक अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे.
तिचा जन्म ४ मार्च १९९२ रोजी (शनिवारी) युरोपच्या सर्बियामधील पोझरेवाक येथे झाला. हार्दिक पांड्या १ जानेवारी २०२० रोजी नतासा स्टॅनकोव्हिक बरोबर साखरपुडा झाला. हार्दिक पांड्या यांच्या पत्नीचे नाव नतासा स्टॅनकोविच आहे, तिला एक मुलगा देखील आहे.


हार्दिक पांड्या बद्दल काही मजेदार तथ्य
- हार्दिक पांड्या धूम्रपान करतो का? – माहित नाही
- हार्दिक पांड्या मद्यपान करतो काय? – होय
- पांड्या क्रिकेट मध्ये त्याच्या मोठ्या शॉट्स आणि निर्भयतेसाठी ओळखला जातो.
- २०१५ मध्ये जॉन राईटने यांनी त्याच्यात मोठी क्षमता पाहिली आणि त्याला मुंबई इंडियन्स आयपीएल संघात निवडले.
- हार्दिकची क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप योगदान दिले.
- ते सुरतहुन बडोदा येथे फक्त हार्दिकच्या क्रिकेट कारकीर्दीसाठी राहायला आले.
- हार्दिक पांड्याकडून किरण मोरेने पहिल्या ३ वर्षांत त्यांच्या अकादमीमध्ये कोणतीही फी घेतली नाही.
- तो बडोदा क्रिकेट संघाकडूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
- हार्दिक पंड्याला टॅटू खूप आवडतात आणि त्याचा आवडता बॉडी टॅटू म्हणजे “टाइम इज़ मनी”.
- तो इरफान पठाण आणि युसूफ पठाणचा चांगला मित्र आहे.
दिलखुलास पण मेहनती आणि प्रसंगी खेळाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या हार्दिक पंड्याच्या उत्कृष्ट कामगिरी करता सर्व क्रिकेटप्रेमींच्या शुभेच्छा !
अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती
हार्दिक पांड्याचे फोटो – Hardik Pandya Photo Gallery





FAQ: Hardik Pandya Information in Marathi
हार्दिक पांड्याच्या पत्नीचे नाव काय आहे?
नताशा स्तांकोविक
हार्दिक पांड्याचा जन्म कधी झाला?
11 ऑक्टोबर 1993
हार्दिक पांड्या कोणत्या खेड्यातील आहेत?
चोर्यासी गुजरात (सूरत)
हार्दिक पांड्याने किती शिकला आहे?
तो फक्त नववीत शिकला आहे, त्यानंतर त्याने १२ वी व त्यानंतर बीकॉमचा अभ्यास टीम इंडियाकडून खेळताना केला आहे. तथापि, आता परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या हार्दिकने आता एका वर्षात करोडो रुपये कमावले.