
हातोडा फेक माहिती मराठी – Hammer Throw Information in Marathi
१) हातोडाफेक वर्तुळातून करावयाची असते. (आकृती ८) वर्तुळाचा व्यास – २.१३५ मीटर सेक्टरचा कोन – ३४.९२० वर्तुळाबाहेरील कडे – जाडी ६ मि.मी. वर्तुळातील जमीन – टणक असावी आणि ती कड्यापेक्षा २ सें.मी खाली असावी.
२) हातोड्याचे वजन व हातोड्याची पूर्ण लांबी
वजन – | ७.२६० किलोग्रॅम (पुरुष) |
४ किलोग्रॅम (महिला) | |
हातोड्याची पूर्ण लांबी – | ११७.५ सें.मी (पुरुष) |
११६ सें.मी. (महिला) |
हातोडा फेक मैदान

३) प्रेक्षक‚ स्पर्धक आणि पंच यांच्या सुरक्षिततेसाठी हातोडाफेकीची स्पर्धा तारेच्या पिंजऱ्यात घ्यावी. पिंजरा ‘U’ आकाराचा असावा. पिंजऱ्याची उंची ५ मीटर असावी. फेकीच्या बाजूचे तोंड उघडे राहील व त्याची रुंदी ५.५ मीटर राहील.
४) स्पर्धकाला हातमोजे वापरता येतील. बोटांची टोके मात्र उघडी असावीत.
५) हातोडा फिरविण्यास सुरुवात करण्यापूर्वी हातोड्याचे टोक वर्तुळाबाहेर ठेवल्यास तो फाउल नाही.
६) हातोडा फिरविताना हातोड्याचा जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल नाही; परंतु जमिनीस स्पर्श झाल्यावर स्पर्धकाने हातोडा फिरविण्याचे थांबविले‚ तर तो फाउल आहे.
७) हातोडा फिरविताना तो हातातून निसटला‚ तर तो फाउल आहे.
८) इतर नियमांचे उल्लंघन न करता फेकलेला हातोडा हवेतच तुटला‚ तर तो फाउल नाही. त्या फेरीतील ती फेक करण्याची स्पर्धकाला पुन्हा संधी द्यावी.
पुढे वाचा: