गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती | Gopal Krishna Gokhale Information in Marathi

गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती : भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे  शिष्य समजले जातात.

1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.

गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती-Gopal Krishna Gokhale Information in Marathi
गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती, Gopal Krishna Gokhale Information in Marathi

गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती – Gopal Krishna Gokhale Information in Marathi

जन्म :​ 9 मे 1866

मृत्यू :​ 19 फेब्रुवारी, 1915

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा

संघटना : भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी

वडील : ​कृष्ण महादेव गोखले

आई : सत्यभामाबाई कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश

1884 मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी 1885 मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा राजकीय प्रवास

बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा कॉंग्रेसशी संबंध

इ.स. 1889 मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. 1905 सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. कॉंग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले.

गोपाळ कृष्ण गोखले यांची कायदेमंडळावर निवड

इ.स. 1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली.

भारत सेवक समाजाची स्थापना

भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने 13 जून, 1905 रोजी पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण देखील मिळावे हा उद्देश कायम ठेवला.

सार्वजनिक सभेच्या माध्यमातून कार्य

गोपाळ कृष्ण गोखले यांनी सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा

त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी भूषविलेली महत्वाची पद

 • मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व,
 • 1902 पासून केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व

प्रभाव :

न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत;

महात्मा गोखले / धर्मात्मा गोखले

गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेले लेखन

गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे ‘अंकगणित’ हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे. हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती.

गोपाळ कृष्ण गोखले यांना मिळालेले सन्मान

नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात Gokhale Institute Of Politics and Economics नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.

आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत 1916-17 या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर 94 वर्षांनी म्हणजे 2011 साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.

गोपाल कृष्ण गोखले यांचा जीवनप्रवास

 • जन्म : 9 मे 1866
 • 1884 : मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून बी.ए. (गणित) ची परीक्षा उत्तीर्ण
 • 1885 : पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 35 रुपये पगारावर त्यानी शिक्षकाची नोकरी पत्करली.
 • 1886 : कायद्याची पदवी मिळवली
 • 1886 : मध्ये पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीयसदस्य बनले.
 • 1887 : फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजी आणि इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले.
 • 1888 : ‘सुधारक’ या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाच्या संपादकाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांभाळली.
 • 1889 : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.
 • 1890 : सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.
 • 1895 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ‘फेलो’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
 • 1897 : गोखले यांनी वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला भेट दिली.
 • 1899 : मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणून ते निवडून आले.
 • 1902 : केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.
 • 1905 : ‘भारत सेवक समाज’ (सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी) ही संस्था स्थापन केली.
 • 1905 : बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
 • 1909 : त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. 1912 : भारतातील सनदी नोक-यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली.
 • 1912 : महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला साहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला होता.
 • मृत्यू : 19 फेब्रुवारी 1915

गोपाळ कृष्ण गोखले यांचा इतर महत्वाची माहिती

 1. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.
 2. भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
 3. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले.
 4. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजनीतिज्ञ होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता.
 5. ‘राजकारणाचे अध्यात्मीकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली.
 6. गोखले यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले.
 7. संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झाले.
VIDEO: गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती – Gopal Krishna Gokhale Information in Marathi

पुढे वाचा:

शेअर करा

Leave a Comment