150+ शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes in Marathi

Good Morning Quotes in Marathi मध्ये आपली विचार प्रक्रिया बदलण्याची शक्ती आणि क्षमता आहे. सकाळचा एक प्रेरणादायी Good Morning Message in Marathi तुम्हाला सकारात्मकता, आनंदीपणा आणि उर्वरित दिवसासाठी प्रेरणा देऊ शकतो. दिवसाच्या तास शून्यापासून सकारात्मक विचारांना चालना देऊन आपण इतरांमध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवू शकता. Good Morning Marathi Message आणि Good Morning msg in Marathi सर्वोत्तम संकलन या लेखामध्ये आ, हे जे आपण आपले मित्र, सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांसह शेअर करू शकता. शुभ सकाळ मराठी संदेश सह आपला दिवस सुरू करा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा.

Good Morning Quotes in Marathi-Good Morning in Marathi-शुभ सकाळ मराठी संदेश-good morning message in marathi

Good Morning Quotes in Marathi – शुभ सकाळ मराठी संदेश

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृद्य जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल तसेच उगवेल. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… जय महाराष्ट्र! शुभ प्रभात!!

“रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार! काम, क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश!
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ! मितभाषी असतो सदासुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी!
भगवंत नामास रोज स्मरावे, मायबापास कधी ना भुलावे! मनुष्य जन्म मिळतो एकवार, रामनामात सुख ते अपरंपार..!” शुभ सकाळ

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!! Good Morning!

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. !!सुप्रभात!!

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… शुभ सकाळ!

आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू दे… शुभ सकाळ !

😊हळूहळू वय निघून जातं…….. जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं. कधी कुणाची आठवण खूप सतावते. कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते. किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत. पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत……..😊 जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत …😊 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏

समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारं श्रीफळ आपल्याला संदेश देतं की, विश्वाचा खारटपणाही तू हृदयात साठव, पण लोकांना मात्र गोडपणा देत जा. स्वधर्म पालनात करवंटीप्रमाणे कठोर व अंतर्यामी मलईप्रमाणे नरम रहाण्याचा बहुमोल जीवनमंत्र श्रीफळ आपल्याला देतं. 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

लिहिल्याशिवाय✍🏻 दोन शब्दातील अंतर कळत नाही…. तसेच हाक 🗣 आणि हात 🤝🏻 दिल्याशिवाय माणसांची मनंही 💓 जुळत नाही… 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐शुभ सकाळ💐

Good Morning Message in Marathi – गुड मॉर्निंग शुभेच्छा

जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही..!! नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो… काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो..! 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 🍁*शुभ सकाळ *🍁

थोडक्यात पण मनापासून… शुभ सकाळ !

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील… शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो! शुभ सकाळ

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.. जिवनात जगतांना असे जगा कि, आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे… Good Morning!

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!! शुभ सकाळ..!

डोळयातून वाहणारं पाणी, कोणीतरी पाहणारं असावं.. हदयातून येणार दु:ख, कोणीतरी जाणणारं असावं.. मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं.. जीवनात सुख:दुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं.. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला, मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही, आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत, ती पण तुमच्या सारखी..! शुभ सकाळ!

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.. आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा.. सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा… सुप्रभात!

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे.. मला श्रीमंत होण्याची गरज नाही.. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती… शुभ सकाळ!

नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण… आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे… परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा… शुभ सकाळ!

Good Morning Marathi Message – गुड मॉर्निंग मराठी

शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!! जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…!

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरत असते… शुभ सकाळ!

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.. जन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं.. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो… शुभ सकाळ!

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही… शुभ सकाळ!

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात, एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो… मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… शुभ सकाळ!

टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीची वीणा.. माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… सुप्रभात!

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची, आठवण काढत नाही.. पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही… शुभ सकाळ!

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची… सकाळच्या सुंदर शुभेच्छा !

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ!

Good Morning msg in Marathi

“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.. शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…

एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते.. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी दया. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे.. बाई साडया घेऊन निघून जाते… थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.. ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया, मला माझ्या मालकिणीला दयायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नात..!! सांगा खरा “श्रीमंत” कोण? शुभ सकाळ!

आपण ज्याची इच्छा करतो, प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही… परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते, ज्याची कधीच अपेक्षा नसते… यालाच आपण, केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो… “शुभ सकाळ”

कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे… शुभ सकाळ!

न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर, कधी कधी “नशीब” सुद्धा हरते… पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच… शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!! “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे… शुभ सकाळ Friends!

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे… सुप्रभात!

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्याबरोबर आहे… नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत… गुड मॉर्निंग!

“साखरेची गोडी सेकंदच राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र, शेवटपर्यंत मनात घर करून जाते…” शुभ सकाळ!

Good Morning Marathi SMS – शुभ सकाळ संदेश

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.. आणि म्हणूनच ती समाधानी असतात. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत… शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात जावो…

मनाला जिंकायचे असते, “भावनेने” रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने” अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने” अपयशाला जिंकायचे असते, “धीराने” संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने” माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने” शुभ सकाळ! आपला दिवस आनंदी जावो…

हळवी असतात मने, जी शब्दांनी मोडली जातात.. अन शब्दच असतात जादूगार, ज्यांनी माणसे जोडली जातात… शुभ सकाळ!

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं उंच उंच वाढत राहावं…. 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏 🍁शूभ सकाळ🍁

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 एकदा मीपणा विकून पहा….. जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…??? जगावं तर इतरांसाठी…. स्वतःसाठी तर सगळेच जगतात…. ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास… घात तर सारेच करतात…! दुःखामधे सुद्धा रहावं हसत वेळ तर सर्वाँचीच येते…. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राख तर सर्वाँचीच होते… 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

💐💐💐💐💐💐💐💐💐💐 संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……….. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁! शुभ सकाळ !🍁

हळू हळू एक एक शब्द वाचा, प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे,
अश्रू सांगून जाते, दुःख किती आहे ?
वैराग्य सांगून जाते, जोडीदार कसा आहे?
गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे?
संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे?
वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे?
विवाद संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे?
ठेच सांगून जाते, लक्ष ते कुठे आहे?
डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे ?
स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे ?
आणि वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत!
🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

Marathi Good Morning Messages for Whatsapp

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.. नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर, बस मध्ये पण भेटतात.. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात… शुभ सकाळ!

गोड माणसांच्या आठवणींनी, आयुष्य कसं गोड बनतं, दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर, नकळत ओठांवर हास्य खुलतं.. शुभ प्रभात.. शुभ दिवस!

“शुभसकाळ” म्हणजे केवळ, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर, दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची, काढलेली “आठवण” आहे… शुभ सकाळ!

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी.. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल… आपला दिवस आनंदात जाओ!

देवाने प्रत्येकाचे आयुष्य कसे छान पणे रंगवले.. आभारी आहे मी देवाचा कारण, माझे आयुष्य रंगवताना देवाने, तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय… शुभ सकाळ!

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात, प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते… शुभ सकाळ !

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले, मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले, म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून, हे छोटेसे पत्र पाठवले… सुप्रभात!

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा, काहीतरी देण्यात महत्व असतं… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं… शुभ सकाळ!

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!! शुभ सकाळ!

Good Morning Marathi Status – शुभ सकाळ शुभेच्छा

पहाट झाली! पहाट झाली! चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली… त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली, उठा… Whatsapp बघायची वेळ झाली…! शुभ सकाळ!

मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..! कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..! त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही, जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!! मन वळू नये, अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी, कधी विसरू नये, अशी नाती हवी… शुभ सकाळ!

रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चिलमील किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली… शुभ प्रभात… शुभ दिन!

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालतांना सावलीची गरज असते, जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते, आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

“उत्तर” म्हणजे काय ते, “प्रश्न पडल्याशिवाय” कळत नाही… “जबाबदारी” म्हणजे काय हे, त्या “सांभाळल्याशिवाय” कळत नाही… “काळ” म्हणजे काय हे, तो “निसटून गेल्याशिवाय” कळत नाही… जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो… जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो… जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो… आणि जी माणसं, माणसं जोडतात, तीच आयुष्यात यशस्वी होतात… आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच माझ्यासाठी अनमोल आहे, शुभ सकाळ!

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ!

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ… शुभ सकाळ !

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, ही सकाळ आपले स्वागत करत आहे… शुभ सकाळ !

शुभ सकाळ…!! प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी… आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना… माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते… कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते… विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते… शुभ सकाळ!

Good Morning Marathi Suvichar – शुभ सकाळ मराठी मेसेज

💥चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

जगाचा मालक सोबत असतांना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला .आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असतांना माञ अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्या पेक्षा मोठी आहे हे कळले .. 👏 त्यामूळे आपल्या जवळ जे आहेत त्यांची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही.जे आहे त्यात आनंद घ्या,जे नाही त्याचा मोह टाळा 🙏आपला दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

परिवर्तन से डरना और संघर्ष से कतराना मनुष्य की सबसे बड़ी कायरता है जीवन का सबसे बड़ा गुरु वक्त होता है क्योंकि जो वक्त सिखाता है वो कोई नहीं सीखा सकता 🙏आपका दिन मगंलमय हो🙏 🍁शुभ प्रभात🍁

मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!! शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो… कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ 🍁

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते… शुभ प्रभात!

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning!

🙏 जितके मोठे मन❤ तितके सोपे जीवन… वादाने अधोगती संवादाने प्रगती… जग काय म्हणेल हा विचार करु नका. कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात. आणि यशस्वी लोकांना विरोध करतात.!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो 🙏 🍁शुभ सकाळ🍁

कुटुंब एकत्र ठेवा भाऊ सोबत नसल्यामुळे महाप्रतापी रावण देखील हरला आणि भाऊ सोबत असताना प्रभु रामांना विजय मिळाला मग, आपल्याला अहंकार नक्की कशाचा आहे असा प्रश्न मनात येतो. त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर नेहमी कुटुंबासोबत राहा, भाऊ-भाऊ मिळून इतिहास घडवा. कुटुंब कधीही विभागलं जाणार नाही, असा प्रयत्न करा. 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 💐शुभ सकाळ 💐 🙏🙏🙏

👫आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे, जो कठिण रोल नेहमी बेस्ट अँक्टरलाच देतो. 🙏* तुमचा दिवस सुखाचा जावो*🙏 🍁 शुभ सकाळ🍁

🙍🏻‍♂️ माणूस थांबला आहे🙍🏻‍♂️ बियांचं रुजणं थांबलं नाही रोपाचं वाढणं थांबलं नाही, फुलाचं फुलणं थांबलं नाही, फळांचं पिकणं थांबलं नाही फक्त आधुनिकतेने पछाडलेला, माणूस थांबला आहे चिमण्यांची चिव चिव थांबली नाही कोकिळेची कुहू कुहू थांबली नाही वासरांचं हम्बरणं थांबलं नाही, मोराचं नाचणं थांबलं नाही फक्त निसर्गा पासून दूर गेलेला माणूस थांबला आहे. 🍁 शुभ सकाळ🍁

Good Morning Marathi Quotes – शुभ सकाळ स्टेटस

नदी जब निकलती है, कोई नक्‍शा पास नहीं होता की सागरकहां है। बिना नक्‍शे के सागर तक पहुंच जाती है। इसलिए कर्म करते रहिये, नक्शा तो भगवान् पहले ही बनाकर बैठे है । हमको तो सिर्फ बहना ही है ।। 🙏आपका दिन मगंलमय हो 🙏 🍁शुभ प्रभात🍁

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो., त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.. नशीबापेक्षा… कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा… कारण उद्या येणारी वेळ… आपल्या नशीबामुळे नाही… तर कर्तृत्वामुळे येते… 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 🍁।।शुभ सकाळ।।🍁

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका… कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

असे म्हणतात… हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा …, हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ 🍁

एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे… 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

💖जगण्याचं एक मंत्र आहे💖 दुःखाला डोळ्यात आणि सुखाला मनात साठून ठेवावं, म्हणजे अश्रूंसोबत दुःख वाहून जाईल आणि मनामध्ये सुख हे साठतच राहील, जगाच्या पाठीवर कुठेच पूर्णतः सुखी व्यक्ती मिळणार नाही, पण आयुष्यभर दुसऱ्याला सुखी ठेवणाऱ्या तुमच्या सारख्या व्यक्ती काही नशीबवान लोकांनाच मिळतात, आणि देवाने या गोष्टीत तरी माझं नशीब छान बनवलं आहे, तुमच्यासारख्या व्यक्तींना माझ्या आयुष्याच्या वाटेत गुंफून ठेवलं आहे. 🍁* शुभ सकाळ*🍁

आयुष्य फार लहान आहे.. जे आपल्याशी चांगले वागतात, त्यांचे आभार माना.. आणि जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांना हसून माफ करा.. जीवनात अडचणी येणे हे Part of life आहे.. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही Art of life आहे.. 🍁शुभ सकाळ🍁

पावसाला माहीत सुध्दा नसतं……! मातीतुन काय उगवणार……..!! तो फक्त मनसोक्त कोसळून जातो…………..!!! आयुष्य सुद्धा असच जगावं……………. काय होणार, कसं होणार, कधी होणार……..! हे न पाहताच…………!! मनसोक्त जगावं……………….!!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ प्रभात🍁

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात आपल्या भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे. 😀हसत रहा. आनंदी रहा.😃 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल…! मी दुनियेबरोबर लढु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे… !! 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 🍁शुभ सकाळ🍁

Good Morning Quotes Marathi – शुभ सकाळ टेटस

जगात दोन अशी रोपं आहेत, जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही. पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. यशस्वी व्हायचे असेल, तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते. पण.. यशाचे शिखर गाठायचे असेल, तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते. गर्वाशिवाय बोलणं, हेतुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे. हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत.
🍁शुभ सकाळ🍁

काळजी घेत जावा स्वतःची. कारण तुमच्याकडे माझ्या सारखे खुप असतील, पण.. माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही. तुम्ही जसे आहात तसेच रहा. कारण Original ची किंमत, Copy पेक्षा जास्तच असते. 🙏आपला दिवस आंनदात जावो🙏

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत. नेहमी आनंदाने जीवन जगा.. चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… 🍁शुभ सकाळ🍁

❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. ❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवाअसतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो* 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ 🍁

हसने आणि हसवने प्रयत्न आहे माझा… प्रत्येकजन आनंदी रहावे हीच इच्छा आहे माझी… भले माझी कोणी आठवण काढु अथवा न काढु… परंतु प्रत्येक आपल्या मानसांची आठवन करने ही , सवय आहे माझी…!!! 🙏आपला दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा.., लोकांच्या उपयोगी पडा.., पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल.., पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल
हेच सत्य आहे…!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे सुंदर रूप स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे नाते स्वस्त आहे पण टिकवणे महाग आहे 🍁आपला दिवस सुखाचा जावो🍁 💐शुभ सकाळ 💐

एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, ” देवा ” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस. तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे ? तुझेच तुला कसे अर्पण करणार ?” भगवंताने स्मित उत्तर दिले ,” बाळा, *तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही . तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल .” 💐शुभ सकाळ💐

देवाने तर पहिलेच सांगुन ठेवले आहे. माझ्याकडे मागून मिळालं असतं तर, भिकाऱ्याला भिक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..! फक्त निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर,थकुन जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो..! पण…मनापासून कुठलही काम करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या कर्माची आठवण का ढा,प्रत्येक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल…! ‼शुभ प्रभात‼

Good Morning Thoughts marathi – मराठी शुभ सकाळ संदेश

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ….. ? शोधला तर अर्थ आहे ……!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे ..!! चांगली भुमिका, चांगली ध्येये आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही .. शब्दांतही .. आणि आयुष्यातही .. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..! 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 🍁शुभ सकाळ 🍁

सुंदर काय असतं ??? जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं… ते मन सुंदर… चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात… ते विचार सुंदर… आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते… *ते नाते सुंदर…! 🍁शुभ सकाळ🍁

ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते…. माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते….. 🍁 आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण नाती अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही….. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ🍁

रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो . ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात, तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो, त्यालाच जीवन जगणे म्हणतात..! 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!🙏 🍁*शुभ सकाळ *🍁

सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत … वारंवार येतील आणि जातील … जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार … जीवन खुश राहून जगायला शिका …. कारण ….. रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते…!!

हसून काहीतरी बोलत जा,हसून काहीतरी टाळत जा!! खूप सा-या अडचणी आहेत, आपल्या सर्वांनाही, पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!! कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.!!!!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

Sweet Good Morning SMS in marathi – मराठी शुभ सकाळ मेसेज

दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख…… खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव…. देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप…… छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण जमीन….म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत…..🙏 🙏आपला दिवस आनंदात जावो🙏

इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते… पडलेल्या माणसांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते… श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते… कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी…. म्हणुन…. पैशापेक्षा जिवाला जिव देणारी जिवाभावाची माणसं जोडा आणि जपा… तीच आपली खरी संपत्ती आहे. 🙏आपला दिवस सुखाचा जावो🙏

दु:ख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक… आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी… आपल्या माणसांना विसरतात. किती अजब आहे ना…?? माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं…. आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. 💖आपला दिवस सुखाचा जावो💖 💐शुभ सकाळ💐

नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो 💧थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥ आपुलकीच नातं दुधात🥛🍼 मिसळलेल्या साखरेसारखे असत कितीही प्रयत्न केले *तरी वेगळ होणं शक्य नसतं. मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज!! 🙏आपला दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

नशीबआकाशातून पडत नाही. किंवा जमिनीतूनउगवतनाही. नशीबआपोआप निर्माणहोत नाही. तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च घडवत असतो…. नशीबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू त्याप्रमाणेच नशीब घडेल यावर विश्वासठेवा…. 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

आनंदा पेक्षाही मोठा असा एक आनंद आहे , तो त्यालाच मिळतो, जो स्वतःला विसरून इतरांना आनंदीत करतो. समजणं आणि सम-जून घेणं यात खूप फरक आहे.. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन ! ! ! आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हे गरजेचे आहेत , कारण यामुळेच पेटून उठतो.तुमचा स्वाभिमान त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा रहातो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्द माणूस.. 🙏आपला दिवस सुखाचा जावो🙏

आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचे आहे. शत्रुला क्षमा द्या. प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या. मित्राला ह्रदय द्या. मुलांना तुमचं उदाहरण द्या. वडिलांना पुज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या. स्वत:ला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही ह्याला साक्षी आहे. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!! लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!! मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!! श्रिमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!! आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन …. विसरलेल्यांना आठवतो….!! पैसा आणी सौंदर्य याला महत्व देण्यापेक्षा माणसांनी आपल्यातील चांगल्या गुणांना महत्त्व दिले पाहिजे माणुस कसा दिसतो ह्यापेक्षा, कसा आहे ह्याला महत्व असतं… कारण शेवटी, सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर, गुणाचं आयुष्य, मरणापर्यंत असतं…

.आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं, मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं…✍🏻 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

Good Morning in Marathi Language – शुभ सकाळ मित्रांनो

डोळे हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात. अहंकार हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो. दुश्मनी ही बीज नाही, तरीपण उगवली जाते. ओठ हे कापड नाहीत, तरीपण शिवले जातात. निसर्ग हा बायको नाही, तरीपण कधीतरी रुसतो. बुध्दी ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो. माणूस हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो.।। 🌹 काळजी घ्या 🌹 आयुष्य खूप सुंदर आहे 💐 बंध आपुलकीचे 💐 💐 नाते माणुसकीचे 💐 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो. आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. म्हणून फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण अनंदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे… 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो. 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐शुभ सकाळ💐

पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो, पण, माणूस पैसाला वर घेवून जावू शकत नाही !💰 . . . . पैशांचा संग्रह करण्या पेक्षा माणसांचा संग्रह करा !👬 पैशा पेक्षा माणसांचे मोल हे , अनमोल आहे !👬 🌺तुमचा दिवस सुखाचा जावो🌺 💐शुभ सकाळ 💐

चुक झाली तर माफ करा.. पण प्रेम कमी करू नका…. कारण चूक हे आयुष्याच एक पान आहे.. पण नाती आयुष्याच पुस्तक आहे… 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐शुभ सकाळ 💐

माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपडयाचीं स्तुति लोक करतात आणी स्वच्छ मनाची स्तुति परमेश्वर क़रतो 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐*शुभ सकाळ *💐

गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो…… गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो…. तसेच चांगले विचार व चांगली माणसं समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही…… 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

समज हा साखरेप्रमाणे असतो तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याने त्याने ठरवावे कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले म्हणून तेच खरे असे मानू नका अनुभवाने खात्री करा जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

गरीब जमिनीवर बसला तर त्याची परीस्थिती आणि श्रीमंत बसला तर मोठेपणा.. ?? हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे, माणूस हा फक्त माणूस असतो..!! तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणार्‍या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल. पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल… हेच सत्य…!! 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

Good Morning Marathi

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करायला हवा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस गाजवायला जन्माला आलोय. 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐 शुभ सकाळ💐

आपल्या आयुष्यात कोण येणार हे काळ ठरवतो, आपल्याला आयुष्यात कोण हवं; हे आपल मन ठरवतं. आणि आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार; हे आपली वागणूक ठरवतं. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ 💐

गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे……… शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐 शुभ सकाळ💐

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं… पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं… एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते… 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐*शुभ सकाळ *💐

सर्वांपेक्षा मोठा…तो वरती बसलाय….. हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..! स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे….. रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो 🙏

भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. * आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिचं आपली श्रीमंती असते 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते…. पडलेल्या माणसांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते… श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते… कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी…. म्हणुन…. पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा… तीच आपली खरी संपत्ती आहे 🙏सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐शुभ सकाळ💐

आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर नेहमी त्यांच्यापेक्षा लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता. लहान होणं याचा अर्थ कमीपणा घेणं असा नव्हे तर लहान होणं म्हणजेच महान होणं असतंं… 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे.. जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात.. नाती जपत चला,कारण.. आज माणूस एवढा एकटा पडलाय की.. कुणी फोटो काढणारा पण नाही.. सेल्फी काढावी लागते.. ज्याला लोक फॅशन समजतात… 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

निसर्गाचा नियम आहे कि एका जागी दुसरी गोष्ट आली की पहीली निघुन जाते. प्रकाश आला की अंधार निघुन जातो… पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते.. हवा आली की उष्णता निघुन जाते… त्याच प्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात.. म्हणून नेहमी चांगले, पॉझिटीव्ह विचार करुया.. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

Good Morning in Marathi

दुखाःने सुखाला म्हटले–तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. सुखाने हसून म्हटले–भाग्यवान मी नाही तू आहेस..! दुखाःने आश्चर्याने विचारले- ते कसे? सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

हो” आणि “नाही” हे दोन* छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!! 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

आयुष्यात समाधान शोधत चला कारण सुखांची यादी कधी संपतच नाही… ठेचा तर लागत राहणार त्या पचवायची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा. माणसाला स्वतःचे छायाचित्र काढायला वेळ लागत नाही. पण स्वतःचे चारित्र्य घडवायला खूप वेळ लागतो. समजूतदारपणा… ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.. खूप लोक आपल्याला ओळखतात.. पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.. ⚜शुभ सकाळ⚜

माणसाला चमकायच असेल तर त्याला स्व:ताचाच * प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्व:ताचेच तेज निर्माण करता आले पाहीजे… झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही… कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर विश्वास असतो.. 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुध्दा पुजारी होतो, फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही भस्म होते. निरांजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरु होतो. जीव शिव होतो. म्हणूनच देवाचिया द्वारी, बसावे क्षणभरी…. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे… पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे..! नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खुप अवघड आहे….! 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐 शुभ सकाळ 💐

मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे…… माणसाने ती करायला शिकल पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही..!! तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!! 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ🙏

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून.. संकट जात नाही. आणि संकट आल्या शिवाय,.. डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,… तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात … 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात पण माणसातच माणुस का दिसत नाही…? ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल…त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 💐शुभ सकाळ💐

💕कार्यछोटेअसले_तरी… #प्रयत्ननेहमीमोठेअसावेत….💝 👊जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!😍 💝गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!💕 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏*शुभ सकाळ *🙏

परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका कारण तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ🙏

ज्याच्याजवळ पवित्र तन…… स्वच्छ मन…. आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.. 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🌻शुभ सकाळ🌻

भरोसा जेवढा मोठा असतो धोका त्याच्याही पेक्षा मोठा असतो. लक्षात ठेवा , फूल कितीही सुंदर असू द्या .कौतुक त्याच्या सुगंधाचेच होते…. माणूस कितीही मोठा झाला तरी , कौतुक त्याच्या गुणाचे व विश्वासाचेच होते. चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने* ही नाती जन्मभर टिकून राहतात. 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

💖चांगली माणसं 💕 शंभर वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा. कारण किमती मोत्याची माळ जितक्या वेळा तुटते, तेवढया वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏

कोणाला आपलसं बनवायचे असेल, तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही, लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते, असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे… कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते.. पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते…!!! 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. सेवा करायची असेल तर, घड्याळ्यात पाहू नका ! प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका! संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका! विनंती करायची असेल तर,स्वार्थ पाहू नका! समर्पण करायचे असेल तर,खर्च किती झाला बघू नका! दान करायचे तर ,गरज पाहू नका ! 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो… कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही… ते आपोआप जोडलं जातं…. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते…. हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!!! 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ प्रभात🙏

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात… संयम आणि माफ करण्याची ताकत मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते.. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही.. फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते.. 🙏शुभ सकाळ🙏

जेव्हा तुम्ही चंद्र 🌝 पहात असता तेव्हा तुम्ही देवाचे सौंदर्य पहाता . जेव्हा तुम्ही सूर्य 🌞 पहाता तेव्हा तुम्ही देवाचे सामर्थ्य पहाता . जेव्हा तुम्ही आरशात पहाता तेव्हा तुम्ही परमेश्र्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पहाता . म्हणूनच स्वत:वर विश्वास ठेवा !!! आपण सगळेच् प्रवासी आहोत , आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे . हे जीवन ही एक सहल समजून जीवनाचा आनंद घ्या . 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 💐सुप्रभात 💐

दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मुर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मुर्ती…… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏

💥लाखमोलाचं वाक्य💥 ✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं . 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏

जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं… कोण लहानपणापासून पार पाडतो… तर कुणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो… जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो…. पण जो घामाने अंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏🙏शुभ सकाळ🙏🙏.

पुढे वाचा:

Leave a Comment