Generic Drugs Information in Marathi : अनेकदा सर्वसामान्य रुग्णांचा असा समज असतो की महागडी बँडेड औषधे जेनेरिक औषधांपेक्षा चांगली असतात. जेनेरिक औषधाने लवकर गुण येत नाही. परंतु हे सत्य नाही. कोणत्याही औषधाची स्ट्रेंथ त्याच्यातल्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियन्ट म्हणजेच एपीआय वरून ठरते. हे एपीआय बँडेड आणि जेनेरिक औषधांमध्ये सारखेच असते. दोन्ही बनवण्यासाठी एकच पद्धत असते. सारखीच काळजी घेतली जाते. त्यामुळे दर्जाच्या बाबतीत जेनेरिक मेडिसिन्स बँडेड मेडिसिन्सच्याच दर्जाची असतात.

जेनेरिक औषधांबद्दल माहिती – Generic Drugs Information in Marathi

Generic Drugs Information in Marathi , जेनेरिक औषधांबद्दल माहिती मराठी मध्ये, बँडेड आणि जेनेरिक ड्रग्स
जेनेरिक औषधांबद्दल माहिती मराठी मध्ये, बँडेड आणि जेनेरिक ड्रग्स

एखादे नवे मेडिसिन बाजारात आणण्यासाठी कंपनीला दहा ते वीस वर्ष संशोधन करावे लागते. हा खर्च वसूल करता यावा म्हणून कंपनी पेटंट फाईल करते. पेटंट व्हॅलिड असेपर्यंत त्या मेडिसिनवर त्या कंपनीची मक्तेदारी राहते. त्यानंतर इतर कंपन्या सुद्धा ते मेडिसिन बनवू शकतात. साहजिकच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चढाओढ लागते.

तरीही काही लोकांना जेनेरिक औषधाने लवकर गुण येत नाही. परंतु त्याचे कारण मेडिसिनमधले एपीआय नसून बायन्डर्स आणि फिलर्स आहेत ! अर्थात अतिरिक्त प्रमाणातले, कारण टॅबलेट बनवण्याच्या प्रक्रियेपासून ती शरीरात योग्य अवयवांकडे रक्तामार्फत पोहोचवण्याच्या क्रियेपर्यंत अत्यंत महत्वाची भूमिका हे बाइंडर्स बजावतात. त्याशिवाय टॅबलेट बनूच शकत नाही. हे बाइंडर्स इनॅक्टिव्ह आणि नॉन हॅझार्डस असतात.

परंतु काही खालच्या दर्जाच्या कंपन्या टॅब्लेटमधले बाइंडर्सचे प्रमाण नफ्याच्या लोभापायी वाढवतात. ही एकप्रकारची भेसळच असते. 500 mg च्या टॅबलेट मध्ये 250 mg असल्यावर कसा सारखाच गुण येईल ? त्यामुळे जेनेरिक मेडिसिन्सचा कमी दर्जा अशा भेसळीमुळे असतो. परंतु दोन्हीमधले एपीआय सारख्याच दर्जाचे आणि एकच असते. प्रमाण कमी असल्यामुळे गुण लवकर येत नाही. काही प्रामाणिक कंपन्या अत्यंत चांगल्या दर्जाचे जेनेरिक्स बनवतात, त्यामुळे जेनेरिक मेडिसिन्स फालतू असतात अशा गैरसमजात राहू नये.

अजून वाचा: अन्नामधून विषबाधा, रक्तदाबाचे, मधुमेहाचे, आणि हृदयविकाराचे झटके यांसाठी प्रथमोपचार

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय? । What is Oral Cancer in Marathi

बर्ड फ्लू मराठी माहिती | Bird Flu Information in Marathi

पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

Leave a Reply