लठ्ठपणा कमी करण्यासाठी वजन कमी करण्याच्या यंत्रावर सारखे आपले लक्ष केंद्रित करू नका. खरं तर झटपट वजन कमी करून लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करणारे शरीरातील फॅट्स् कमी करून लठ्ठपणा कमी करीत नाहीत, तर शरीरातील पाणी कमी करून वजन घटवितात आणि आपले वजन कमी झाले म्हणजे लठ्ठपणा कमी झाला या गोड गैरसमजाखाली पाणी कमी करण्याची किंमत मोजता.

त्यामुळे झटपट वजन कमी करून लठ्ठपणा कमी करणाऱ्या जाहिरातींना न भुलता लठ्ठपणा कमी करण्यासाठी फॅट्स् कमी करण्याच्या पद्धतीचा स्वीकार करा.

फॅट्स् म्हणजे काय, फॅट्स् वाढण्याची कारणे आणि उपाय

फॅट्स् म्हणजे काय?

आपण करीत असलेल्या कामांसाठी तसेच शरीरांतर्गत चालणाऱ्या विविध क्रियांसाठी ऊर्जा लागत असते. ऊर्जा मिळाल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आपल्या शरीराला विविध प्रकारची अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची कामे करण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण सेवन केलेल्या अन्नापासून मिळते. आपण अन्नाचे सेवन केल्यानंतर त्याचे पचन होते, तेव्हा त्यापासून ऊर्जा तयार केली जाते. त्यातील आवश्यक तेवढी ऊर्जा खर्च केली जाते, तर उर्वरित ऊर्जा साठवून ठेवण्याची आपल्या शरीरात खास सोय आहे. या शिल्लक राहिलेल्या ऊर्जेचे फॅट्स् मध्ये रूपांतर होते आणि फॅट्स् साठवून ठेवले जातात.

हे फॅट्स् शरीरात साठून राहणे म्हणजेच स्थूलपणा किंवा लठ्ठपणा वाढणे होय.

आपल्या शरीरातील इतर पेशी, उत्ती, स्नायू आणि हाडे यांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेत फॅट्स्चे वजन खूप कमी असते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर फॅट्स् चे वस्तुमान कमी आणि आकारमान जास्त असते.

आपल्या शरीराच्या एकूण वजनात स्नायू आणि हाडांचे वजन अधिक शरीरात साठलेल्या चरबीचे वजन यांचा समावेश होतो. वजन कमी करण्यासाठी शरीराची उपासमार केल्यामुळे काही प्रमाणात चरबीचे वजन कमी होते तसेच स्नायू आणि हाडांचे वजनही कमी होते. स्नायू आणि हाडांचे वजन कमी होणे म्हणजे वय वाढणे. डाएट संपल्यानंतर वजनात वाढ होते तेव्हा चरबीचे वजन वाढायला लागते. तुलनेत स्नायू आणि हाडांचे वजन मात्र वाढत नाही. त्यामुळे वजन वाढते; पण आरोग्य काही मिळत नाही.

तशा या फॅट्स् आपल्या शरीरात सर्व ठिकाणी त्वचेखाली साठवून ठेवण्यात येतात; पण जिथे स्नायू जास्त असतात तिथे त्या अधिक प्रमाणात साठवून ठेवल्या जातात. विशेषत: पोट, नितंब, हनुवटीखालचा भाग, गळा, दंड, मांड्या, पोटऱ्या या ठिकाणी फॅट्स् जास्त प्रमाणात साठवले जातात. त्यामुळे शरीराचा प्रमाणबद्ध आकार निघून जातो आणि शरीर बेंगरूळ दिसायला लागते.

थोडक्यात काय तर स्थूलपणा किंवा लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण शरीरात जमा होणाऱ्या फॅटस् आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यापेक्षा फॅट्स् कमी करण्याला महत्त्व द्या.

हे वाढलेले वजनच शेवटी आपल्याला भानावर आणते आणि मग काहीही करून वाढलेले वजन कमी करायची धडपड सुरू होते. महागडे जिम, औषधं योगा, डाएटिंग जे जे ऐकू येईल ते ते करून पाहिले जाते. सुरुवातीला खरंच फरक जाणवला की, हळूहळू केसगळती, रुक्ष त्वचा, चिडचिडेपणा, थकवा अशी लक्षणे दिसू लागतात. मग काही दिवसांनी असे लक्षात येते की, वजन कमी करत असताना आपण व्यायामाबरोबर जितका आहार घेत होतो तितकाच आहार घेऊनही व व्यायाम करूनही वजन कमी होत नाही. तर असे कार्यक्रम मध्येच सोडून दिल्याने बहुतांश वेळा वजनवाढीच्या समस्येलाच सामोरे जावे लागते; पण असे का होते याचा फारसा विचार केला जात नाही.

डाएटिंगच्या खुळामुळे किंवा अशी औषधं घेण्याने पाणी, चरबी आणि पेशी या क्रमाने सुरुवातीला शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असते; पण वजनवाढीला खरोखरच आळा घालायचा असेल तर चरबीचे वजन व आकारमान कमी व्हायला हवे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चरबीच्या पेशी या शरीराच्या खूप अंतर्गत भागात असतात, लठ्ठपणा कायमस्वरूपी घालवायचा असेल या पेशींवर सातत्याने न थकता पुन्हा-पुन्हा आघात करायला हवा. त्यासाठी चिकाटी हवी, आपल्या आहारात कायमस्वरूपी बदल करण्याची मानसिकता हवी आणि दैनंदिन जीवनात हालचालींना प्राधान्य हवे.

फॅट्स् वाढण्याची कारणे – चरबी कशामुळे वाढते

 1. मनात ताण असताना किंवा चित्त समाधानी नसताना अन्न खाल्लं की त्याचं रूपांतर चरबीत होतं. आपले शरीर ताणाला शत्रू मानते आणि शत्रू समोर दिसत असला की, अन्नाचे चरबीत रूपांतर करून ती आणीबाणीसाठी साठवून ठेवणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे
 2. आहारात तेला-तुपाचा अतिरिक्त वापर करणे.
 3. गरजेपेक्षा जास्त खाणे.
 4. घेतलेल्या उष्मांकांचे व्यायामाद्वारे ज्वलन न करणे.
 5. आहारात नेहमीच गोड पदार्थांचा समावेश असणे.
 6. एकाचवेळी खूप खाणे.

शरीरात फॅट्स् चे प्रमाण योग्य राखण्यासाठी काही उपाय – चरबी कमी करण्यासाठी

 1. मानसिक ताणावर नियंत्रण मिळवा.
 2. व्यायामाला पर्याय नाही.
 3. गरजेपेक्षा एक घासही अधिक खाऊ नका.
 4. गोड खा; पण आठवड्यातून एकदा व तेही अगदी थोडे.
 5. थोड्या थोड्या वेळाने थोडे-थोडे खा.

असे केल्याने शरीरातील अनावश्यक चरबीचा नाश व्हायला मदत होईल. शिवाय फक्त शरीरातील केवळ पाणी कमी न होता, चरबी कमी होईल. अशा प्रकारे वजन कमी करताना दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार नाही.

चरबी कमी करण्याचा सोप्पा उपाय

अजून वाचा:

Leave a Reply