फॅशन आणि विद्यार्थी भाषण मराठी – Fashion Ani Vidyarthi Bhashan in Marathi

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे व त्यामुळे समाजात वावरतांना तो स्वत:ला नेहमी काळानुरूप दर्शवू इच्छितो.

बदलत्या समाजाबरोबरच माणसाचे राहणीमान आणि पोशाख ही बदलत राहिले. आरंभापासूनच सौंदर्य आणि पोशाखाचे जवळचे नाते आहे. यालाच फॅशन म्हणतात. शरीराच्या अभावांच्या पूर्तीसाठी, सौंदर्य दर्शविण्यासाठी जी कृत्रिम साधने वापरली जातात त्यालाच फॅशन हे नाव दिले. विशेषतः स्त्रियांना आपला पोशाख किंवा फॅशन्स बदलत रहाणे अधिक आवडते.

फॅशनचा संबंध संपूर्ण मानव समाजाशी आहे. प्राचीन काळापासून मनुष्याचा फॅशनकडे कल आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या जन्मापासून आजपर्यंत फॅशनचा एक प्रवाह दिसून येतो. सुरवातीला मनुष्य हाडांच्या माळा परिधान करीत होता. नंतर दगडांच्या मण्यांच्या माळा घालू लागला. प्राचीन मूर्ती पाहिल्यावर हे कळते की भारतीय स्त्रिया निरनिराळ्या प्रकारच्या केशरचना करीत होत्या, स्त्री-पुरुष स्वत:ला सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी मोरपंख, फुले, पाने, कवड्या इत्यादींनी आपले शरीर सजवीत असत. त्या काळात भारतात तयार झालेल्या वस्त्रांची विदेशांत निर्यात होत असे. रोमच्या स्त्रियांना भारतीय पोशाखाचा खास मोह होता.

फॅशनचा संबंध संस्कृती आणि हवापाण्याशी आहे. फॅशनच्या मागे परिवर्तनशीलता, नावीन्य, सहजता, उपयोगिता आणि सौंदर्यबोध इत्यादी अनेक घटक असतात. प्रत्येक नव्या फॅशनच्या मागे हेच घटक क्रियाशील असतात. नव्या समाजाच्या नव्या आवश्यकता आणि नव्या काळानुरूप स्वत:ला बनविण्यासाठी मनुष्य निरंतर प्रयत्नशील असतो. तरुणपणी तर ही इच्छा सर्वात प्रखर असते.

नव्या फॅशनसाठी विद्यार्थ्यांचे मन आसुसलेले असणे स्वाभाविक आहे. परंतु विद्यार्थी जीवन हा भविष्य घडविण्याचाही काळ असतो. शक्ती वाढविण्याचा काळ असतो. तो नुसता स्वप्नरंजनात किंवा नटण्यामुरडण्यात घालवून कसते चालेल? विद्यार्थी जीवनात ज्या मुलामुलींनी कठोर श्रमाने आपली मन, बुद्धी सशक्त केली नाही तर त्यांचे भविष्य उज्वल कसे बनेल? हाच तो काळ आहे जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये उच्च संस्कार सामाजिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव विकसित होते. तेव्हा या वयात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या विकासाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

आज फॅशनची व्याप्ती खूप वाढली आहे. विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान फॅशन म्हणून केले जाते. अशा दूषित फॅशनपासून विद्यार्थ्यांनी स्वत:चा बचाव केला पाहिजे. बरेचदा फॅशन हास्यास्पद वाटते. विद्यार्थ्यांनी केवळ अशीच फॅशन केली पाहिजे जी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी, स्वास्थ्यासाठी आणि स्फूर्तीसाठी योग्य असेल. अशा फॅशनमुळे सौंदर्याबरोबरच उपयोगिताही दिसते. जी शारीरिक विकासास बाधक असेल अशा फॅशनचा विद्यार्थ्यांनी त्यागच केला पाहिजे. सुरुचिपूर्ण फॅशन केली आणि साधेपणालाही जीवनात स्थान दिले तर अशी संतुलित फॅशन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसण्यास सहायक ठरेल.

फॅशन आणि तरूण मुले निबंध

परवाच माझ्या दीदीला आजी ओरडत होती,” काय ग पोरी तुझे हे कपडे. पँट काय घालता पुरूषांसारख्या?”

आमची दीदी कसली खट? ती आजीला म्हणते कशी, ” पण आजी, ही फॅशन आहे हल्लीची. आणि मीसुद्धा हल्लीचीच मुलगी आहे ना?”

अग, पण मी म्हणते की पंजाबी ड्रेस घालावा. साडी नेस असं तर कुणी म्हणत नाही ना तुला?”

त्यावर दीदीनं अंगावर शहारे आल्याचे नाटक केले, ” आज्जी, पंजाबी ड्रेस हल्ली आमच्या आईच्या वयाच्या बायका घालतात. आमच्या वयाच्या मुली फक्त लग्नाबिग्नाला गेल्या तरच पंजाबी ड्रेस घालतात.”

त्या दोघींचा हा वाद आणखीही रंगला असता परंतु दीदीला कॉलेजला जायचे होते म्हणूनच तो थांबला. दीदी निघून गेल्यावर मी आजीशी बोलू लागले.

“आजी, तुमच्या वेळेस काय ग होती फॅशन? सांग ना मला? त्यावर आजी खुलली आणि म्हणाली,” अग, आमच्या वेळेस ते बेलबॉटम होते, त्यावर आम्ही टॉप घालायचो. लग्न झाल्यावर मात्र सुरूवातीला साडीच नेसावी लागली. पण हळूहळू आम्ही पंजाबी ड्रेस घालणं सुरू केलं. आता मी साडी पण नेसते आणि पंजाबी ड्रेसही घालते.”

बोलता बोलता आजीच्या आणि माझ्याही लक्षात आलं की आजीचे कपडेही कालानुसार बदलले आहेत. मग तिच्या नातीचे का नाही बदलणार? हा विचार मनात आल्यावर माझे डोके फॅशन ह्या विषयाकडे धावू लागले. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा,’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. खरोखर, माणसाला फॅशन का करावीशी वाटते? त्याचं साधंसोपं कारण असं की आपण चांगले दिसावे अशी इच्छा सर्वांनाच मनातून वाटत असते. तरूण वयात ही भावना जास्तच प्रबळ असते. म्हणूनच वयात आलेल्या मुली सतत आरशात पाहातात. लेटेस्ट फॅशन काय आहे तसे कपडे घालण्याचा प्रयत्न करतात. माझ्या आजोबांच्या काळातले तरूण केस लांब वाढवत असत.

बेलबॉटम पँट तेही घालत असत. आत्ताचे तरूण केस एकदम बारीक करतात, घट्ट पॅट घालतात. तेव्हाच्या मुली पंजाबी ड्रेस घालणे ही फॅशन समजत होत्या. त्या केसांच्या दोन वेण्या घालत. आत्ताच्या मुली जीन्स घालतात आणि केसांचा बॉबकट करतात.

त्याच त्याच फॅशन्स काही काळाने परत परत येतात.म्हणजे बेलबॉटम पँटपासून घट्ट पँटपर्यंतचा प्रवास पुन्हापुन्हा येत असतो. शिवाय पूर्वीच्या काळी मुलींच्या आयांना वेळ असल्यामुळे मुलींच्या वेण्याफण्या करणे त्यांना जमत असे. आता मुलींच्या आयाही नोकरीव्यवसाय करीत असल्याने मुलींचे आणि स्वतःचेही केस फार लांब ठेवणे त्यांना शक्य होत नाही. म्हणूनच तर जिकडे तिकडे पोनीटेल आणि बॉबकट दिसतात.

शिवाय हल्ली मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स ह्यासारख्या सौंदर्यस्पर्धा भरवल्या जातात. कपड्यांच्या आणि सौंदर्यप्रसाधनांच्या तर एवढ्या कंपन्या निघाल्या आहेत की त्या जाहिरातींच्या बळावर लोकांनी काय घालावे, काय वापरावे हे ठरवू लागल्या आहेत. आपल्या भारतात तरूणांची संख्या खूप असल्याने त्यांचा माल इथे खपणार आहे. असे आहे हे सगळे फॅशनचे तंत्र.

आजच्या जगाची ओळख फॅशन निबंध

माणूस फॅशन का करतो? चांगलं दिसण्यासाठीच ना? वेड्यागबाळ्या अवतारात बाहेर पडायला कुणालाच म्हणजे अगदी आजीआजोबांच्या वयाच्या माणसालाही आवडत नाही. पण तरीही नव्या मुलांना त्या विषयावरून धारेवर धरायची संधी ही मोठी माणसं कधी म्हणजे कधीच सोडत नाहीत. परवाच माझ्या दीदीला आजी ओरडत होती,” काय ग पोरी तुझे हे कपडे.पँट काय घालता पुरूषां- सारख्या?”

आमची दीदी कसली हुशार, ती आजीला म्हणते कशी, ” पण आजी, हीच फॅशन आहे ग हल्लीची. आणि मीसुद्धा हल्लीचीच मुलगी आहे ना? तुझ्यासारखी परवाची मुलगी नाहीये म्हटलं…”

अग, पण मी म्हणते की पंजाबी ड्रेस घालावा. साडी नेस असं तर कुणी म्हणत नाही ना तुला?”

त्यावर दीदीनं अंगावर शहारे आल्याचा अभिनय केला, ” आज्जी, पंजाबी ड्रेस हल्ली आमच्या आईच्या वयाच्या बायका घालतात. आमच्या वयाच्या मुली फक्त लग्नाबिग्नाला गेल्या तरच पंजाबी ड्रेस घालतात. ।”

त्या दोघींचा हा वाद आणखीही रंगला असता परंतु दीदीला कॉलेजला जायचे होते म्हणूनच तो थांबला. दीदी निघून गेल्यावर मी आजीशी बोलू लागले.

“आजी, तुमच्या वेळेस कायगहोती फॅशन? सांग ना मला?” “

त्यावर आजी खुलली आणि म्हणाली,” अग, आमच्या वेळेस ते बेलबॉटम होते, त्यावर आम्ही टॉप घालायचो. लग्न झाल्यावर मात्र सुरूवातीला साडीच नेसावी लागली. पण हळूहळू आम्ही पंजाबी ड्रेस घालणं सुरू केलं. आता मी साडीपण नेसते आणि पंजाबी ड्रेसही घालते.” 11

बोलता बोलता आजीच्या आणि माझ्याही लक्षात आलं की आजीचे कपडेही कालानुसार बदलले आहेत. पण मग तिच्या नातीचे का नाही बदलणार? त्यासाठी आजीनं तिला कारागवावं?

हा विचार मनात आल्यावर माझं डोकं फॅशन ह्या विषयाकडे धावू लागले. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा,’ असे म्हणतात ते काही खोटं नाही. खरोखर, माणसाला फॅशन का करावीशी वाटते? त्याचं साधंसोपं कारण असं की आपण चांगलं दिसावं अशी इच्छा सर्वांनाच मनातून वाटत असते. तरूण वयात ही भावना जास्तच प्रबळ असते. म्हणूनच वयात आलेल्या मुली सतत आरशात पाहातात. लेटेस्ट फॅशन काय आहे तसे कपडे घालण्याचा प्रयत्न करतात. माझ्या आजोबांच्या काळातले तरूण केस लांब वाढवत असत. बेलबॉटम पँट तेही घालत असत. आत्ताचे तरूण केस एकदम बारीक करतात, घट्ट पॅट घालतात. तेव्हाच्या मुली पंजाबी ड्रेस घालणे ही फॅशन समजत होत्या. त्या केसांच्या दोन वेण्या घालत. आत्ताच्या मुली जीन्स घालतात आणि केसांचा बॉबकट करतात.

त्याच त्याच फॅशन्स काही काळाने परत परत येतात. म्हणजे बेलबॉटम पँटपासून घट्ट पँटपर्यंतचा प्रवास पुन्हापुन्हा येत असतो. शिवाय पूर्वीच्या काळी मुलींच्या आयांना वेळ असल्यामुळे मुलींच्या वेण्याफण्या करणे त्यांना जमत असे. आता मुलींच्या आयाही नोकरीव्यवसाय करीत असल्याने मुलींचे आणि स्वतःचेही केस फार लांब ठेवणे त्यांना शक्य होत नाही. म्हणूनच तर जिकडे तिकडे पोनीटेल आणि बॉबकट दिसतात. जुन्या मंदिरातील शिल्पांत आणि चित्रांतही हल्लीच्या काही फॅशन्स दिसलेल्या आहेत, आता बोला.

शिवाय हल्ली मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स ह्यासारख्या सौंदर्यस्पर्धा भरवल्या जातात. कपड्यांच्या आणि सौंदर्यप्रसाधनांच्या तर एवढ्या कंपन्या निघाल्या आहेत की त्या जाहिरातींच्या बळावर लोकांनी काय घालावे, काय वापरावे हे ठरवू लागल्या आहेत. आपल्या भारतात तरूणांची संख्या खूप असल्याने त्यांचा माल इथे खपणार आहे.

असे आहे हे सगळे फॅशनचे तंत्र.

पुढे वाचा:

Leave a Reply