डॉ. जगदीशचंद्र बोस निबंध मराठी – Dr Jagdish Chandra Bose Nibandh in Marathi
डॉ. जगदीशचंद्र बोस हे भारतातील एक थोर वनस्पतीशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर, १८५८ रोजी पूर्व बंगालमध्ये मैमनसिंग ह्या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बंगाली भाषेतच झाले. नंतर त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेवियर्स कॉलेजातून बीए केले आणि ते उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले. तिथे त्यांना केंब्रिज विद्यापीठात अभ्यास करण्याची संधी मिळाली. तिथून ते १८८५ साली भारतात परतले तेव्हा कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
त्यांनी आपल्या संशोधनाने सा-या जगाला थक्क करून सोडले. वनस्पतींना संवेदना असतात, त्यांनाही अन्य प्राण्यांप्रमाणे उष्णता, थंडी, सुख, दुःख, भावना असतात हे त्यांनीच सर्वप्रथम सिद्ध केले. त्याशिवाय त्यांनी अनेक वैज्ञानिक यंत्रांचाही शोध लावला. त्यापैकी क्रेस्टोग्राफ हे यंत्र फारच महत्वाचे आहे. वनस्पतींच्या अत्यंत सूक्ष्म क्रियाही हे यंत्र हजारो पटीने मोठ्या करून दाखवते. ह्या यंत्राच्या मदतीनेच बोस ह्यांनी सिद्ध करून दाखवले की प्राणी आणि वनस्पती ह्या दोन प्रकारच्या सजीवांत अनेक बाबतीत सारखेपणा असतो.
लंडन येथील रॉयल सोसायटी ह्या वैज्ञानिक संस्थेत ह्या यंत्राची संपूर्ण तपासणी करण्यात आली तेव्हा ते यंत्र सर्व चाचण्यांना उतरले. त्या यंत्रामुळे पुराव्यानिशी सिद्ध झाले की सर्व सजीवांमध्ये संचालन, आकुंचन, प्रसरण, स्पंदन अशा क्रिया चालू असतात. प्राण्यांमध्ये रक्ताभसिरण होते तसेच वनस्पतीत वेगवेगळ्या रसांचे अभिसरण होते. शिवाय डॉ. बोसनी हेसुद्धा सिद्ध करून दाखवले की अचेतन पदार्थांवरही बाह्य उत्तेजनेचा प्रभाव पडतो.
अचेतन आणि सचेतन, प्राणी आणि वनस्पती ह्यांच्या सूक्ष्म रहस्यांचा भेद करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या थोर कार्याने, त्यांनी लिहिलेल्या पांडित्यपूर्ण लेखांनी, पुस्तकांनी आणि संशोधनाने सारे जग विस्मयचकित झाले होते. त्यांनी वायरलेस टेलिग्राफीचाही शोध लावला होता परंतु मार्कोनी ह्या शास्त्रज्ञाने त्या शोधाचे पेटंट आधी घेतल्यामुळे त्याचे श्रेय डॉ. जगदीशचंद्र बोस ह्यांना मिळाले नाही.
डॉ. बोसनी लंडन, पॅरिस आणि युरोपात अन्य ठिकाणी विज्ञान परिषदांच्या निमित्ताने भरपूर प्रवास केला. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना भाषण करण्यासाठी सन्मानाने आमंत्रित केले जात होते.
१९१५ साली त्यांनी बोस विज्ञान मंदिर ही संस्था कलकत्ता येथे स्थापन केली आणि आपले कार्य चालूच ठेवले. २३ नोव्हेंबर, १९३१ रोजी वयाच्या ७९ वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.
भारतमातेच्या ह्या थोर सुपुत्राला त्रिवार वंदन आहे.
पुढे वाचा:
- डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध
- गुरू नानक निबंध मराठी
- राजगुरू मराठी निबंध
- संत एकनाथ मराठी निबंध
- विठ्ठल कामत मराठी निबंध
- इंदिरा गांधी निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- कल्पना चावला मराठी निबंध
- अपंग आणि मी निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी