दप्तराचे मनोगत निबंध मराठी – Daptarache Manogat Nibandh Marathi

शाळा सुटल्यावर मी तडक घरी आलो. कोपऱ्यात दप्तर भिरकावले आणि लगेच खेळायला निघालो. दिवसभराचा अभ्यासाचा ताण थोडा कमी करायचा होता ना ! माझी पावले खोलीबाहेर पडतात ना पडतात तोच कोपऱ्यातून आवाज आला. मी क्षणभर थबकलो मागे वळून पाहिले तर दप्तरच माझ्याशी बोलत होते.

“शुभम्… तुला आश्चर्य वाटले ना ! मी दप्तरच बोलतेय. तू माझ्या बखोट्याला धरून भिरकावलंस. त्याच्या मला किती वेदना होतात, याची कल्पना आहे का तुला? मला तू चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे माझे आयुष्य कमी होते. माझी कोणतीतरी बाजू उसवते. त्यातून तुझ्याच पेन, . कंपासपेटी यासारख्या वस्तू पडतात. मग वेंधळा म्हणून आईची बोलणी तुलाच खावी लागतात ना !

आणि हो… आणखीन् बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्या राहिल्या. कागदाचे गोळे, चॉकलेट खाल्लेले कागद सारे काही तू माझ्याकडेच जणू ठेवायला देतोस. वह्या, पुस्तके कधी नीट भरतोस का? आठवड्यातून निदान एक वेळा तरी दप्तरातील साऱ्या वस्तू बाहेर काढून त्या नीट लावायला नको का? नीटनेटकेपणा तुझ्यापासून आणि माझ्यापासून सुरू होतो. हे नेहमी लक्षात ठेव. मला नेहमी सरस्वतीस्थानी मानलेस तर सरस्वतीदेवी नक्कीच तुझ्यावर प्रसन्न होईल. “

दप्तराचे मनोगत ऐकून मी चिंतामग्न झालो आणि त्याच क्षणापासून दप्तराची नीट काळजी घेण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

दप्तराचे मनोगत निबंध मराठी – Daptarache Manogat Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply