दहशतवाद एक समस्या निबंध मराठी – Dahashatwad Ek Samasya Marathi Nibandh

आपल्या देशाचे दोन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी आणि कै. राजीव गांधी ह्या दोघांचाही बळी दहशतवादानेच घेतला आहे हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही.

वाढत्या दहशतवादाची समस्या ही केवळ भारतातलीच नव्हे तर जगभरातली समस्या होऊन बसली आहे. आज सारे जगच ह्या ना त्या प्रकारे दहशतवादाच्या मगरमिठीत सापडले आहे. भीती दाखवून, दहशत निर्माण करून, देशात तणाव निर्माण करणे आणि आपल्या मागण्यांसाठी हजारो निरपराध व्यक्तींचा बळी घेणे हे दहशतवादी कारवायांचे स्वरूप असते. दहशतवाद हा राष्ट्रविरोधी असतो, मानवताविरोधी असतो आणि ख-या धर्माच्याही विरोधीच असतो.

जगभरात आणि आपल्या भारतातही दहशतवादाच्या घटना कुठेतरी घडलेल्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. दहशतवादी स्वतःच्या स्वार्थासाठी दहशत पसरवतात आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. ते बॉम्बस्फोट करून बस, गाड्या उडवतात, स्वयंचलित बंदुका घेऊन गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करतात. त्यांच्याकडे जगातली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात. ह्यात कितीतरी निरपराध माणसे बळी पडतात. मानवी हक्क तर अक्षरशः पायदळी तुडवले जातात. लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होते. व्यापारउदीम बंद पडतो आणि देशाची आर्थिक प्रगती कुंठीत होते.

दहशतवाद हा वाळवीसारखा आहे. सर्वसामान्य लोकांचे सुखी जीवन नष्ट करीत तो देशादेशातून पसरत चालला आहे. आपल्या भारतात काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील काही राज्ये दहशतवादाची शिकार बनली आहेत. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे त्या दहशतवादाला चिथावणी देत आहेत. त्यामुळे ह्यावर ठोस उपाय योजणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या सिरिया येथे आयसीस ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. मुसलमानातील शिया आणि सुन्नी हे दोन पंथ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे सिरियातून आणि इराकमधून अनेक गोरगरीब लोक जीवाच्या भीतीने युरोपात निर्वासित म्हणून जात आहेत. युरोपातील काही देश त्यांना घेत आहेत तर काही देशांनी आपले दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले आहेत.

दहशतवाद हा वाईटच. सध्याचा दहशतवाद हा धार्मिक दहशतवाद आहे. तरूणांना धर्माच्या नावावर चिथवले जाते आणि भडकवले जाते. आपल्या देशात तसे होऊ नये ह्यासाठी सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, कौशल्ये शिकवली पाहिजेत आणि रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे तरूण लोक भरकटणार नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. दोन धर्मांत तणाव निर्माण करणा-यांना कडक सजा फर्मावली गेली पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना जागवली पाहिजे. हाच दहशतवाद रोखण्याचा ठोस उपाय आहे.

शस्त्रास्त्रविक्री आणि अंमली पदार्थांची विक्री हे दहशतवादाला पैसे पुरवणारे मुख्य स्त्रोत आहेत, ते मार्ग बंद केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरची फूसही दहशतवादाला कारणीभूत असते. सर्वच राष्ट्रे तात्पुरता फायदा बघत दहशतवादा कडे कानाडोळा करतात. तसे नाही झाले तर हा दहशतवाद नक्कीच आटोक्यात येईल.

वाढता दहशतवाद मराठी निबंध – Dahashatwad Nibandh in Marathi

वाढत्या दहशतवादाची समस्या ही केवळ भारतातलीच नव्हे तर जगभरातली समस्या होऊन बसली आहे. आज सारे जगच ह्या ना त्या प्रकारे दहशतवादाच्या मगरमिठीत सापडले आहे. भीती दाखवून, दहशत निर्माण करून, देशात तणाव निर्माण करणे आणि आपल्या मागण्यांसाठी हजारो निरपराध व्यक्तींचा बळी घेणे हे दहशतवादी कारवायांचे स्वरूप असते. दहशतवाद हा राष्ट्रविरोधी असतो, मानवताविरोधी असतो आणि ख-या धर्माच्याही विरोधीच असतो.

जगभरात आणि आपल्या भारतातही दहशतवादाच्या घटना कुठे ना कुठे घडलेल्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. दहशतवादी स्वतःच्या स्वार्थासाठी दहशत पसरवतात आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. आपल्या देशाचे दोनपंतप्रधान कै. इंदिरा गांधी आणि कै.राजीव गांधी ह्या दोघांचाही बळी दहशतवादानेच घेतला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.

दहशतवादी बॉम्बस्फोट करून बस, गाड्या उडवतात, स्वयंचलित बंदुका घेऊन गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करतात. त्यांच्याकडे जगातली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात. ह्यात कितीतरी निरपराध माणसे बळी पडतात. मानवी हक्क तर अक्षरशः पायदळी तुडवले जातात. लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होते. व्यापारउदीम बंद पडतो आणि देशाची आर्थिक प्रगती कुंठीत होते.

दहशतवाद हा वाळवीसारखा आहे. सर्वसामान्य लोकांचे सुखी जीवन नष्ट करीत तो देशादेशातून पसरत चालला आहे. आपल्या भारतात काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील काही राज्ये दहशतवादाची शिकार बनली आहेत. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे त्या दहशतवादाला चिथावणी देत आहेत. त्यामुळे ह्यावर ठोस उपाय योजणे अवघड होऊन बसले आहे.

सध्या सिरिया येथे आयसीस ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. मुसलमानातील शिया आणि सुन्नी हे दोन पंथ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे सिरियातून आणि इराकमधून अनेक गोरगरीब लोक जीवाच्या भीतीने युरोपात निर्वासित म्हणून जात आहेत. युरोपातील काही देश त्यांना घेत आहेत तर काही देशांनी आपले दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले आहेत.

दहशतवाद हा वाईटच. सध्याचा दहशतवाद हा धार्मिक दहशतवाद आहे. तरूणांना धर्माच्या नावावर चिथवले जाते आणि भडकवले जाते. आपल्या देशात तसे होऊ नये ह्यासाठी सर्वांना शिक्षण दिले पाहिजे, कौशल्ये शिकवली पाहिजेत आणि रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे तरूण लोक भरकटणार नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. दोन धर्मांत तणाव निर्माण करणा-यांना कडक सजा फर्मावली गेली पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना जागवली पाहिजे. हाच दहशतवाद रोखण्याचा ठोस उपाय आहे.

दहशतवाद मराठी निबंध – Dahashatwad Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply