ब्लड कॅन्सरची कारणे | Causes of Blood Cancer in Marathi

ब्लड कॅन्सरची कारणे

शास्त्रज्ञ अजूनही यांचा शोध घेत आहेत. कारण तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर, सिगारेट मुळे फुप्फुसांचा कॅन्सर, या गोष्टी जितक्या सुस्पष्ट आहेत, तितकी ब्लड कॅन्सरची कारणे स्पष्ट नाहीत.

ब्लड कॅन्सरची कारणे, Causes of Blood Cancer in Marathi
ब्लड कॅन्सरची कारणे, Causes of Blood Cancer in Marathi

Causes of Blood Cancer in Marathi

शास्त्रज्ञांच्या मते दोन गोष्टींच्या एकत्रीकरणामुळे ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो.

  1. अनुवंशिकता
  2. वातावरणातील घटक

लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर सर्रास दिसतो. याचे प्रमुख कारण फॅमिली हिस्ट्री आहे. फॅमिलीत कुणाला ब्लड कॅन्सर होऊन गेला असेल तर ते जीन्स मुलांमध्ये आलेले असतातच ! शिवाय, आईवडिलांची जीवनशैली चांगली नसेल तर ते कमकुवत झालेले जीन्स सुद्धा मुलात येतात. अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की लहान मुलांना ब्लड कॅन्सर होऊ शकतो. यात वातावरणातील घटक जास्त जबाबदार नसतात.

परंतु जितक्या सर्रासपणे लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर आढळतो, तितकाच तो बरा होण्याचे प्रमाणही जास्त म्हणजे 90 टक्के आहे ! याचे कारण म्हणजे लहान मुले ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या शरीरातील सर्व अवयव सुस्थितीत असतात. म्हणजेच प्रौढ होईपर्यंत आपण काहीही खाऊन, पिऊन, कसेही जगून आतल्या अवयवांची जशी वाट लावतो. ते लहान मुलांनी केलेले नसते. शिवाय त्यांच्यात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. त्याच प्रमाणावर कोणत्याही शारीरिक आजाराचा बरा होण्याचा रेट ठरतो ! ( आता समजले, मी चांगल्या डाएटवर आणि फळांवर नेहमी भर का देत असते?)

प्रौढांना होणाऱ्या ब्लड कॅन्सरचे बरे होण्याचे प्रमाण कमी आहे.

वातावरणातील कोणते घटक यास जबाबदार आहेत हे पाहू.

  1. प्रदूषण, घातक केमिकल्स
  2. सतत एक्सरे चा अतिरेक (सोनोग्राफी वेगळी असते )
  3. चांगल्या संतुलित आहाराचा अभाव, फळांची चीड
  4. व्यायामाचा अभाव, अपुरी झोप

यांपैकी कोणतेही कारण आणि अनुवंशिकता एकत्र आल्या, की ब्लड कॅन्सर होऊ शकतो.

अनुवांशिकतेवर इलाज नाही. परंतु इतर गोष्टी टाळता येऊ शकतात.

अजून वाचा:


पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

आपल्याला भूक का लागते? – भूक म्हणजे काय?

लठ्ठपणा कशामुळे होतो? | लठ्ठपणा मुळे होणारे आजार

शेअर करा

Leave a Comment