
अवचित मिळालेला मोकळा तास मराठी निबंध
इंग्रजीचा तास होता. त्यामुळे सगळेजण वही, पुस्तके काढून तयार होते. कारण मुळ्ये मॅडमची तशी शिस्तच होती. आणि अचानक मुळ्ये मॅडमऐवजी भागवत सर वर्गात आले. भागवत सर विदयार्थ्यांचे आवडते. त्यामुळे सर्वांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या.
भागवत सर येताच सर्वांनी ‘गोष्ट सांगा’, ‘विनोद सांगा’ असा गलका सुरू केला. त्यांनी प्रथम सर्वांना शांत केले. मग त्यांनी आपली एक कल्पना सांगितली. एकेकाने उभे राहून स्वत:चे नाव सांगायचे, पण प्रत्येकाने स्वत:चे नाव उलटे सांगायचे. आणि मग मात्र एकेक गंमतच घडू लागली. प्रत्येकजण अडखळू लागला.
चुकीचे उच्चार करू लागला. काहीजणांचे नाव उलट्या क्रमाने वाचल्यामुळे फारच गमतीदार शब्द निर्माण होत होते. या सगळ्या प्रकारामुळे प्रत्येकाची तारांबळ उडत होती आणि वर्गात हास्याचा कल्लोळ निर्माण होत होता.
मग सरांनी एक वेगळाच कार्यक्रम सुरू केला. त्यांनी आम्हांला तीन कोडी घातली. वर्ग चिडीचूप होऊन कोडी सोडवू लागला. पण कुणालाच कोडी सुटत नव्हती. वेळ कसा गेला कळलाच नाही. तास संपला, सर निघून गेले. आता पुन्हा केव्हा तरी ‘ऑफ पिरियड’ मिळेल, तेव्हाच कोडी सुटणार!
पुढे वाचा:
- रस्त्यावरील अपघात मराठी निबंध
- मी पाहिलेला अपघात निबंध
- अपघात कसे टाळता येतील निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- मकरसंक्रांत निबंध मराठी
- प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी