
आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी – Athavada Madhe Ravivar Nasta Tar Marathi Nibandh
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. या दिवसाचे सगळे रूप, सगळे वागणे इतर दिवसांपेक्षा नक्कीच वेगळे. असा हा रविवार आठवड्याच्या वेळापत्रकातून हरवला तर…? तर सगळीच गंमत नाहीशी होईल.
‘रोज रोज शाळा। मनाला येई कंटाळा।।’ रविवारी शाळा नसते. त्यामुळे उशिरापर्यंत गादीवर लोळायला मिळते. मी जरा आळस केला की, आई रागावते. मात्र रविवारी ती म्हणते, “झोपू दया त्याला. रोज लवकर उठावे लागते.” रविवारी दुपारी आई अभ्यास घेऊ लागली, तर बाबा म्हणतात, “अग आज रविवार, आज अभ्यासाला सुट्टी!’ असा रविवार कोणाला आवडणार नाही? “
रविवारी आईच्या कचेरीला सुट्टी असते. मग ती मस्त जेवण बनवते. दुपारी बाबांबरोबर बुद्धिबळ, कॅरम यांसारखे खेळ रंगतात. दर रविवारी आम्ही संध्याकाळी फिरायला जातो. कधी कधी दूर कुठे तरी. कधी कधी नातेवाईकांकडे जातो. मग बाहेरच जेवण. त्यांतही प्रत्येक वेळी वेगळेपणा असतो. असा हा रविवार संपला की, वाईट वाटते. मग रविवार नसेल, तर आठवडा कसा आवडेल?
पुढे वाचा:
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी
- अस्वच्छता आणि प्रदूषण मराठी निबंध
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- रस्त्यावरील अपघात मराठी निबंध
- अशी झाली माझी फजिती मराठी निबंध
- अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी
- अवचित मिळालेला मोकळा तास मराठी निबंध